शेतकरी बांधवांनो केवळ भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर एल निनो संकट येत आहे. एल निनो संकटाचा आधीच अंदाज वर्तवण्यात आलेला होता. संपूर्ण जगावर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची वेळ या एल निनो मुळे येणार आहे. या EL Nino Effect संकटामुळे शेतीतील उत्पादन घडणार असून अनेक देशांवर खाद्य संकट सुद्धा येणार आहे.
या एल निनो मुळे शेतीमधील उत्पादन घडणार असून महागाई देखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. देशाच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल असा देखील अंदाज काही संस्थांनी वर्तवलेला आहे. अमेरिकेमधील एका हवामान अभ्यासात संस्थेने या एल निनो चे आगमन त्यांच्या देशात झाल्याचं जाहीर केलेला आहे. त्यामुळे हे el Nino संकट भारतावर देखील वाढवण्याची शक्यता आहे.
एल निनो चा थेट परिणाम हा मान्सूनवर होणार असून याचा परीणाम जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये देखील याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. आता तुम्ही या एल निनो मुळे येणाऱ्या संकट बद्दल थोडक्यात माहिती मिळवलेली आहे परंतु आता हा एल निनो काय आहे याची माहिती मिळवू या.
एल निनो काय आहे? What is EL Nino?
दर तीन किंवा सात वर्षांनी निर्माण होणारी एक नैसर्गिक हवामान घटना म्हणून एल निनो ला ओळखले जाते. यावर्षी एल निनो चा प्रादुर्भाव आहे, अमेरिकेमध्ये एल निनो चे आगमन झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या देशावर येण्याची शक्यता असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
आपल्या भारत देशामध्ये यापूर्वीसुद्धा एल निनो आलेला होता त्यामुळे त्यावेळेस दुष्काळ पडला होता. देशामध्ये 2002 ला तसे 2004 ला त्याचबरोबर 2009 आणि 2012 या वर्षांमध्ये देखील एल निनो आला होता.
शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट!
आपल्या भारत देशाला यावर्षी एल निनो चां फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून त्यामुळे देशामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील जास्तीत जास्त शेतकरी नैसर्गिक शेती करतात म्हणजेच पावसावर अवलंबून असतात त्यामुळे जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर उत्पादनामध्ये घट होईल. काही तज्ञांनी मोठ्या प्रमाणात एल निनो चा प्रभाव असेल असा अंदाज वर्तवलेला आहे, परंतु काही तज्ञांनी तेवढ्या प्रमाणात राज्याला परिणाम होणार नाही असे देखील वर्तवलेले आहे.
Mansoon Andaj: शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, मान्सून पुन्हा लांबणीवर! IMD ने मान्सून बाबत केला नवीन अंदाज