Pm Kisan 14th Installment: पी एम किसान योजना 14 व्या हप्त्याचे 2000 जमा झाले का? ते असे चेक करा

अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता कधी वितरित केला जातो याची प्रतीक्षा करत होते,परंतु शेतकऱ्यांची चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पडेल ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर 14 वा हप्ता आला की नाही हे चेक करावे लागेल.

पीएम किसान योजनेअंतर्गत 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला की नाही हे चेक कशा पद्धतीने करायचे हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल, शेतकऱ्यांना 14 हप्ता त्यांच्या खात्यावर आला की नाही हे चेक करण्याची एक अत्यंत सोपी पद्धत आहे, त्यानुसार संपूर्ण प्रोसेस फॉलो करून शेतकरी पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला की नाही चेक करू शकणार आहे

 

पी एम किसान योजना 14 वा हप्ता खात्यावर आला की नाही ते चेक करा

 

  • पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला की नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम मध्ये किंवा गुगलमध्ये जाऊन, Pmkisan.gov.in ही वेबसाईट ओपन करावी लागेल.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला beneficiary status हे ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर टाका तसेच रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा त्या ठिकाणी मागितला जाईल, जर काही शेतकऱ्यांना आपला रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर, तो काढावा लागेल.
  • पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी know your registration number या ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तिथे दिलेला कॅपच्या कोड जशास तसा टाका. गेट मोबाईल ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करा.
  • गेट डेटा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ओपन होईल. तो रजिस्ट्रेशन त्यांनतर पुन्हा याच staus  पर्यावरण वापस येऊन मोबाईल नंबर वर किंवा रजिस्ट्रेशन नंबर ॲड करा.
  • तुमच्या पी एम किसान योजनेचे संपूर्ण स्टेटस तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. त्यामध्ये संपूर्ण हप्ता बद्दलमाहिती दिलेली असेल.
  • आता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्ता संदर्भात एक कॉलम दिसत असेल. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला यापूर्वी किती हप्ते प्राप्त झालेले आहे याची सुद्धा माहिती दिसेल.
  • ज्या ठिकाणी चौदाव्या हप्त्याची माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी जर सर्व रीमार्क ओके असतील, आणि फंड  डिस्टर्बेट किंवा कोणतेही रिजेक्शनचे कारण दिलेले नसेल, तर शासनाकडून तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहे.
  • तुम्ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान चे पैसे चेक करू शकतात.

Pm Kisan 14th Installment: पी एम किसान योजना 14 व्या हप्त्याचे 2000 जमा झाले का? ते असे चेक करा

खरीप हंगाम 2023 ई पिक पाहणी सुरू, या तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी सातबारावर त्यांच्या पिकाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करावी

Havaman Andaj: पावसाचा मुक्काम आणखी वाढला, या तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम, या जिल्ह्यात पावसाची शक्यता