Nuksan Bharpai: सतत चा पाऊस नुकसान भरपाई संदर्भात या जिल्ह्याचे महत्वाचे अपडेट, शेतकऱ्यांची यादी

सततचा पाऊस तसेच अतिवृष्टी हे नैसर्गिक आपत्ती म्हणून शासना अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच 20 जून 2023 ला एक जीआर निर्गमित करण्यात आलेला होता व त्या जीआर नुसार, राज्यामधील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली होती. राज्यातील एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटींची ची नुकसान भरपाई आहे. तसेच नुकसान भरपाईच्या मदतीच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा चालू करण्यात आलेली आहे.

 

धाराशिव जिल्ह्यासाठी एवढा निधी

जून 2023 रोजी निघालेल्या जीआर नुसार धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण 2 लाख 16 हजार 13 शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आलेली आहे तसेच या पात्र शेतकऱ्यांसाठीचा एकूण निधी, 137 कोटी 7 लाख रुपये एवढी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. व त्यानुसार निधी वितरित करण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच या जीआर नुसार धाराशिव जिल्ह्यातील एकूण 1 लाख 99 हजार 907 शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे. तसेच धाराशिव तालुक्यामधील एकूण 74 हजार 824 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

भूम तालुक्यातील 21572 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. परांडा तालुक्यामधील एकूण, 27 हजार 834 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच कळंब तालुक्यातील 45 हजार 222 शेतकऱ्यांचा समावेश असून वाशी तालुक्यातील 30 हजार 455 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच एकूण 1 लाख 99 हजार 907 शेतकरी पात्र आहे पण त्या शेतकऱ्यांनी पैकी 1 लाख 8 हजार 270 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानित करण्यासंबंधी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Nuksan Bharpai: सतत चा पाऊस नुकसान भरपाई संदर्भात या जिल्ह्याचे महत्वाचे अपडेट, शेतकऱ्यांची यादी

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्ज वसुली ची सक्ती न करण्याच्या दिल्या बँकांना सूचना