मिलिटरी भरतीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग आणि 10,000 रु महिना, या योजने अंतर्गत आत्ताच अर्ज करा | Military Bharti Traning 2023

विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यातील विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच विविध परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य पुरस्कृत संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाज्योती तसेच बर्टी व सारथी या संस्थांचा समावेश आहे. महा ज्योती या संस्थेमार्फत Military Bharti Traning 2023 तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि विद्या वेतन सुद्धा देण्यात येत आहे.

 

 

कोणत्या योजनेअंतर्गत मिलिटरी भरतीसाठी मोफत प्रशिक्षण आणि दहा हजार मिळणार?

महाराष्ट्र राज्य पुरस्कृत असणाऱ्या महा ज्योती या संस्थेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती च्या तयारीसाठी millitary free training आणि स्कॉलरशिप देण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महिना दहा हजार रुपये मिळणार आहे.

 

जर तुम्ही मिलिट्री भरतीची तयारी करत असाल किंवा सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी ट्रेनिंग मिळवू इच्छित असाल तर तुमच्याकरिता ही एक महत्त्वाची संधी आहे. भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजनेचा लाभ कसा मिळवायचा त्याकरिता आवश्यक कागदपत्रे अटी व शर्ती आणि पात्रता या Military Bharti Traning ची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये खाली जाणून घेणार आहोत.

 

कोणते विद्यार्थी लाभ मिळवू शकतात?

Mahajyoti मार्फत राबविण्यात येणाऱ्या या मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणांतर्गत राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी तसेच भटक्या जमाती आणि विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी लाभ मिळवू शकतात.

 

प्रशिक्षण कसे असेल?

या millitary bharti training अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अनिवासी पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाच्या कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा मिळते. विद्या वेतनाची रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे.

 

प्रत्येक महिन्याला किती रुपये मिळणार?

या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका असणार असून या प्रशिक्षणाच्या कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन म्हणजेच पूर्ण प्रशिक्षण होणे पर्यंत साठ हजार रुपये विद्या वेतन विद्यार्थ्यांना मिळतील. विद्यार्थ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये मिळवण्यासाठी 75 टक्के उपस्थित असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या कालावधी दरम्यान एक वेळा 12 हजार रुपये इतका आकस्मिक निधी सुद्धा मिळणार आहे.

या प्रशिक्षणा अंतर्गत एकूण 1500 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

लाभ मिळण्यासाठी आवश्यक पात्रता?

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असायला पाहिजे.

1. सर्वात महत्त्वाचा म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. अर्जदार हा ओबीसी प्रवर्ग किंवा विमुक्त जाती किंवा विमुक्त भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.

3. विद्यार्थी हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.

4. विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेला असावा.

5. यापूर्वी योजनेअंतर्गत लाभ मिळाला असेल तर नवीन लाभ मिळणार नाही.

6. वयोमर्यादा ही 17 ते 21 वर्षे आहे.

 

विद्यार्थ्यांची निवड कशी करण्यात येईल?

विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही छाननी परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहे. छाननी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतील त्यानुसार विद्यार्थ्यांची निवड होईल. त्याकरिता काही वैद्यकीय अहर्ता सुद्धा आहे याची माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून मिळू शकतात.

 

आवश्यक कागदपत्रे:

1. कास्ट सर्टिफिकेट

2. रहिवासी दाखला

3. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

4. Marksheet

5. पासबुक

महत्वाची बातमी, देशात लवकरच समान नागरी कायदा लवकरच लागू होणार, या राज्यात सर्वात प्रथम लागू होणार | Uniform Civil Code

अर्ज कसा करायचा? How to Apply For Mahajyoti Free Training?

योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या व लाभ मिळवू इच्छिणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2023 आहे. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून पोस्टद्वारे पाठवलेले किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यात असणाऱ्या पैशांवर कोणाचा हक्क असतो? जाणून घ्या कायद्यानुसार कोणाला मिळणार पैसे | Bank Balance