देशामध्ये समान नागरी कायदा लागू करावा अशी अनेक जणांची इच्छा होती तसेच त्या संदर्भात अनेक चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होत्या. परंतु आत्तापर्यंत शासनाने समान नागरी कायदा देशात लागू करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची महत्त्वाची पावले उचललेली नव्हती. परंतु आता शासनाने saman nagari kayda प्रत्यक्षात लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे. संपूर्ण देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून प्रायोगिक तत्त्वावर सुरूवातीला हा Uniform Civil Code कायदा चार राज्यात लागू करण्यात येणार आहे.
समान नागरी कायदा देशभरात लागू होणार? Uniform Civil Code:
केंद्र सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली असून सुरुवातीला चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा कायदा लागू करण्यात येईल त्यानंतर या कायद्यामधील असणाऱ्या अडचणी तसेच उनिवा चेक करून त्या दूर करण्यात येतील आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात हा कायदा लागू करण्यात येणार आहे.
या राज्यात सर्वात प्रथम लागू होईल कायदा Saman Nagari Kayda
मित्रांनो उत्तराखंड या राज्यात सर्वात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर समान नागरी कायदा लागू करण्यात येणार आहे. हा समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भातील मसुदा तयार करण्यात आलेला असून हा कायदा संसदेत मंजूर करण्यापूर्वी सुरुवातीला चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येईल.
या चार राज्यात समान नागरी कायदा:
समान नागरी कायदा खालील चार राज्यात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे.
1. उत्तराखंड
2. गुजरात
3. उत्तर प्रदेश
4. आसाम
आता सर्व धर्मांना एकच समान नागरी कायदा:
मित्रांनो आपला देश हा संविधानानुसार चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक दिवस मोठ्या प्रमाणात मेहनत करून आपल्या देशाचे संविधान लिहिले आहे. संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिलेले आहे. त्यामुळे देशात धर्मानुसार वेगवेगळ्या कायदा असू नये. हा कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक धर्मासाठी एकच कायदा असेल.
समान नागरिक कायदा लागू करण्याचे शुभकाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून हे काम यापूर्वीच व्हायला होते परंतु ते करण्यात आले नाही असेही केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.