मित्रांनो सौर कृषी पंप योजना अंतर्गत कुसुम सोलर पंप मिळवण्यासाठी अर्ज सुरू झाल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून आपल्याला कुसुम योजनेचा अर्ज करायचा आहे हाच शब्द ऐकायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुसुम कुसुम हा शब्द ऐकायला मिळेल कारण की योजनेअंतर्गत अर्ज सुरू झाल्यानंतर काही दिवसातच वेबसाईट प्रॉपर काम करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अडचणी येत आहे. शेतकऱ्यांच्या मनात कोटा संपण्यासंदर्भात धाकधूक आहे परंतु आतापर्यंत फक्त दहा दिवसात अनेक अर्ज प्राप्त झालेले आहेत या संदर्भात एक अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांना Kusum Yojana अंतर्गत सौर कृषी पंप मिळवण्यासाठी नवीन अर्ज 17 मे 2023 पासून मागविण्यात आलेले होते. महा ऊर्जेच्या ऑनलाईन वेबसाईटवरून सौर कृषी पंप योजनेचे अर्ज करण्यात येत आहे. वेबसाईट सुरू होऊन फक्त दहा ते अकरा दिवस पूर्ण झालेले असून एवढ्या कमी कालावधीत राज्यातून 23 हजार 584 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. यामध्ये यवतमाळ तसेच पुणे तसेच सोलापूर, सांगली व अहमदनगर तसेच हिंगोली व संभाजीनगर त्या पाठोपाठ बुलढाणा हे जिल्हे अग्रेसर आहेत.
जिल्हा निहाय कुसुम योजना प्राप्त अर्जाची संख्या:
खालील प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामधून कुसुम योजनेचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.
1. यवतमाळ 1140
2. छत्रपती संभाजीनगर 779
3. नंदुरबार 1036
4. सांगली 1820
5. पुणे 2602
6. सोलापूर 1450
7. अहमदनगर 1419
8. नाशिक 1769
9. सातारा 1369
10. रत्नागिरी 1
11. कोल्हापूर 158
12. सिंदुदुर्ग 1
13. ठाणे 10
14. रायगड 1
15. पालघर 8
16. वाशीम 773
17. बुलढाणा 735
18. अकोला 272
19. गडचिरोली 54
20. गोंदिया 94
21. भंडारा 420
22. नागपूर 30
23. चंद्रपूर 20
24. अमरावती 61
25. वर्धा 02
26. धुळे 1113
27. जळगाव 996
28. जालना 919
29. लातूर 826
30. धाराशिव 500
31. नांदेड 952
32. हिंगोली 907
33. बीड 936
34. परभणी 731
अशाप्रकारे एकूण 23 हजार 584 अर्ज कुसुम योजना अंतर्गत प्राप्त झालेले आहेत.
अर्ज कधीपर्यंत करता येणार?
शेतकरी बांधवांना Kusum Yojana 2023 अंतर्गत आता शेतकऱ्यांना कधीही ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, यावेळेस उपलब्ध असणारा कोटा संपल्यानंतर नवीन कोटा उपलब्ध होईल त्यानंतर शेतकरी पुन्हा अर्ज करू शकतील त्यामुळे आता अर्ज करण्याची कोणतीही लिमिट नसणार आहे.
कुसुम योजना संपर्क:
शेतकरी मित्रांनो kusum solar Yojana संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा काही अतिरिक्त मदत हवी असल्यास किंवा काही ऑनलाइन अर्ज करताना अडचणीत असल्यास तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
संपर्क क्र. 020-35000456 किंवा 020-35000457
पुढील 5 वर्षात 5 लाख सौर कृषी पंपाचे वाटप होणार:
यावर्षी Pm Kusum Yojana अंतर्गत एक लाख सौर कृषी पंप वाटपाचे राज्य शासनाची उद्दिष्ट होते तर येणाऱ्या पुढील पाच वर्षात प्रत्येक वर्षी एक लाख म्हणजेच पुढील पाच वर्षांमध्ये पाच लाख कृषी पंच शेतकऱ्यांना वाटप करण्याची उद्दिष्ट शासनाने ठेवलेले आहे.