शेतकरी बांधवांना मान्सूनचा कालावधी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वीज पडून जीवित हानी होण्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. साधारणता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडत असते त्यामुळे राज्यातील तसेच देशातील अनेक नागरिक या विजेच्या त्यामुळे मृत्युमुखी पडतात. परंतु आता केंद्र शासनाने वीज कुठे पडणार आहे याची माहिती घेणार आहे दामिनी नावाचे एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेली असून याच्या माध्यमातून आपल्याला विज पडण्याच्या पूर्वीच वीज पडणार आहे का? याची माहिती मिळवता येते.
विज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी मिळवा वीज कुठे पडणार याची माहिती:
विजेच्या पडल्यामुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील जीवित हानिला रोखण्यासाठी त्यावर उपाय म्हणून भारत सरकारने Damini Lightning Alert App तयार केलेले आहे हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येत असून जीपीएस लोकेशन च्या माध्यमातून तुम्हाला Vij पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी विजेची स्थिती दर्शवण्यात येणार आहे.
हे ॲप भारत सरकारने लॉन्च केलेले असून याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. याबाबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच जर एखाद्या ठिकाणी वीज पडण्याचा अंदाज ॲप मध्ये दाखवण्यात येत असेल तर त्या ठिकाणावरून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला तसेच कोणतेही झाडाच्या खाली उभे न राहण्याचा सल्ला देण्यात यावा अशी सुद्धा सांगण्यात आलेले आहे.
दामिनी ॲप कसे काम करते?
भारत सरकारच्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी ने हे दामिनी नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे. विजेचा अचूक अंदाज घेता याव्या यासाठी 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारण्यात आलेले आहे. ॲपच्या माध्यमातून प्रोसेसर मधून येणारे सिग्नल रिसिव्ह करण्यात येते आणि त्यानुसार कोणत्या ठिकाणी वीज पडणार याचा अंदाज घेण्यात येतो. त्याच्या माध्यमातून अचूक ठिकाण ओळखण्यात येते वीज पडणार आहे की नाही याची सूचना देखील हे ॲप देते.
Free Ration Yojana: मोफत रेशन धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा झटका, योजना होणार बंद
ॲप कसे डाऊनलोड करावे?
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे हे दामिनी नावाचे ॲप जर तुम्हाला डाऊनलोड करायचे असेल तर ते प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये हे ॲप डाऊनलोड करा. याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली असून तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून मोबाईल मध्ये ते इन्स्टॉल करू शकता.
अशाप्रकारे आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी माहिती या लेखात जाणून घेतलेली आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.