EL Nino: देशात आणखीन एक मोठं संकट येणार, चक्रीवादळ, भूकंप आणि महामारी झाली, आता हे नवीन संकट! शासनाची चिंता वाढली

संपूर्ण जगभरात कोरोना महामारी आल्यानंतर मोठमोठी संकटे अनेक देशांवर आलेली होती, कोरोना या जागतिक महामारीनंतर अनेक प्रकारचे घातक विषाणू देखील आले होते. माणसांवरच नाही तर जनावरांवर देखील मोठमोठी संकट आणि आजार आले होते. संपूर्ण जगाचे हवामान मोठ्या प्रमाणात बदलत असून त्यामुळे शेतकऱ्यांवर देखील मोठी संकट निर्माण होत आहे. दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानातील वाढ ही सर्वांसाठी घातक आहे. देशात चक्रीवादळ तसेच भूकंप आणि अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या आणि आता एवढ्यातच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व देशातील लोकांवर el Nino चे हे एक मोठे संकट येणार आहे.

 

नुकतेच बिपरजॉय चक्रीवादळाने संपूर्ण देशात थैमान घातलेला आहे. या चक्रीवादळाचा फटका देशातल्या नऊ मोठ्या राज्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. दरवर्षी निर्धारित वेळेत येणारा मान्सून हा आठ ते दहा दिवस लेट होऊन सुद्धा अजून पर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये पोहोचलेला नाही. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत परंतु मान्सून अजून पर्यंत त्यांच्याकडे पोहोचलेला नाही. आणि काही हवामान अभ्यासात कंपन्यांनी किंवा हवामान अभ्यासात विभागांनी यावर्षी सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस असल्याचा देखील अंदाज वर्तवलेला होता. त्यामुळे हे सुद्धा शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट आहे.

 

त्याचबरोबर गेल्या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली असून ती अजून वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वागायला वाढण्याची शक्यता असून त्यामध्ये साखर, तसेच डाळी त्याचबरोबर पालेभाज्या व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

 

देशावर एल निनो चे नवीन संकट: el nino effect in marathi

यावर्षी एल निनो प्रभाव मोठ्या प्रमाणात होणार आहे. या एल निनो मुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा नुकसान होणार आहे. आपल्या देशाला EL Nino चां धोका वाढवण्यात आलेला असून अनेक ठिकाणी दुष्काळ पडण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर यामुळे मान्सूनवर देखील परिणाम होणार आहे. त्याचबरोबर हा एल निनो देशातील खाद्यपदार्थांचे किमती वाढवणार आहे त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल.

khatache bhav: रासायनिक खतांचे 2023 चे भाव पहा ऑनलाईन, जाणून घ्या कोणत्या खताचा किती दर आहे, यापेक्षा जास्त किमतीत खते खरेदी करू नका

शासन सतर्क:

सध्या महागाई ही 25 महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेली असून ही महागाई घाऊक मागायचा विचार केल्यास तीन टक्क्या पेक्षा खाली आलेली आहे. त्यामुळे या महागाईला वेळेमध्ये नियंत्रण करणे महत्त्वाचे असून त्या दृष्टीने शासनाने देखील काही महत्त्वाची पावले उचललेली आहे. देशामध्ये येणारा हा महत्त्वाचा धोका लक्षात घेऊन शासनाने यापूर्वी त्या el Nino संदर्भात तोंड देण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे.

Namo Shetkari Yojana: अखेर नमो शेतकरी योजनेचा GR आला, शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार, फक्त या शेतकऱ्यांना मिळेल लाभ

या एल निनो चा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बसणार असून सर्वसामान्यांना पहिला झटका म्हणजे महागाई, शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा झटका तर अन्नधान्याची टंचाई अशा प्रकारच्या अनेक समस्या येत आहेत याला वेळीच रोखणे आणि त्याच्यावर प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरणार आहे.