Warkari Vima Yojana: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकारकडून विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू, जाणून घ्या काय आहे योजना

वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो वारकरी संपूर्ण राज्यभरातून पंढरपूरला जातात. टाळ आणि मृदुंगाचा गजर करत मोठ्या आनंदाने हे वारकरी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला रवाना होतात. विशेष म्हणजे हे वारकरी पायी चालत पंढरपूर पर्यंत जातात. त्यामुळे आता अशा वारकऱ्यांना राज्य शासनाच्या मार्फत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या Warkari Vima Yojana संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

राज्यातील लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने जातात परंतु एकाध्या वेळेस वेळा पंढरपूरची वारी करत असताना एखाद्या वारकऱ्याला जखम होते किंवा तो जखमी होतो, किंवा एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यामुळे अशा वेळेस त्या वारकऱ्यां च्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कुठल्याही प्रकारची दिली जात नव्हती परंतु आता राज्य शासनाने सुरू केलेल्या या Warkari Vima Yojana Maharashtra अंतर्गत या वारकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

योजनेचे नाव काय? विमा कोणाला मिळणार?

दरवर्षी आषाढी वारीमध्ये पंढरपूरच्या वारीकरिता सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना हे विमा संरक्षण देण्यात येणार असून या योजनेचे नाव विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना असे आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा… pic.twitter.com/RMx10WmTXt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2023

विमा योजनेत खालील बाबींचा समावेश:

विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

1. जर एखाद्या वारकऱ्याचा वारीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

2. जर एखादा वारकरी वारीदरम्यान आजारी पडला तर त्याच्या औषधोपचारासाठी 35 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मिळणार आहे.

3. वारीदरम्यान वारकऱ्याला कायमची अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येणार आहे.

4. जर अंशतः किंवा अल्पशा अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये मदत मिळणार आहे.

NFBS Yojana: नवीन योजना, आता कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मिळेल 20 हजार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया व पात्रता

वारकरी विमा छत्र योजनेचा शासन निर्णय जारी:

महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली असून त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील काढलेला आहे. जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे.

योजनेचा शासन निर्णय पहा

Nuksan Bharpai: या 14 जिल्ह्यातील 26.50 लाख शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रु मंजूर, सततचा पाऊस अनुदान वाटपास मंजुरी, GR आला