मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवा बीबीएफ पेरणी यंत्र अनुदानावर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध व्हावे आणि आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी करावी यासाठी बीबीएफ पेरणी यंत्रावर शासन अनुदान देत आहे. बीबीएफ पेरणी यंत्राच्या योजनेमध्ये बदल करून आता मागेल त्याला बीबीएफ पेरणी यंत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा, BBF Yantra Anudan Yojana वर मिळणारे अनुदान या संदर्भात विस्तृत माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
रुंद सरी वाफा पेरणी यंत्र म्हणजेच बीबीएफ पेरणी यंत्र वापरून शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. पावसाचा खंड किंवा जास्त पाऊस तसेच कमी पाऊस याचा परिणाम बीबीएफ पेरणी यंत्राच्या माध्यमातून पेरणी केल्यास होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळते व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.
मागेल त्याला बीबीएफ पेरणी यंत्र योजना सुरू BBF Yantra Anudan Yojana 2023 Maharashtra:
महाराष्ट्र शासनाने सन 2023 24 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी योजनेला मागेल त्याला या घटकांमध्ये टाकलेले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला बीबीएफ पेरणी यंत्राच्या माध्यमातून अनुदान मिळणे शक्य झाले आहे.
बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अनुदान किती मिळते? Magel Tyala BBF Yantra Anudan
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या मागील त्याला बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन प्रकारचे बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अनुदान मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त 35 हजार किंवा बीबीएफ पेरणी यंत्राच्या एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते. या पैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळते.
पिक विमा कंपनीने नाकारलेल्या पीक विम्याच्या तक्रारीची फेर तपासणी, या शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल
पेरणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा? How to Apply For BBF Yantra?
जर तुम्हाला सुद्धा अनुदानावर बीबीएफ पेरणी यंत्र मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. खालील प्रमाणे अर्ज करा.
1. सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी शेतकरी पोर्टलचे अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
2. आता तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नोंदणी करायची आहे त्यानंतर लॉगिन करायचा आहे.
3. आता तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आता तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या पर्यावर क्लिक करायचं आहे.
4. आता तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर पावर चलीत अवजारे या पर्यायावर क्लिक करा. आता पेरणी व लागवड यंत्र या पर्यावर क्लिक करा.
5. त्यानंतर तुम्हाला जे बीबीएफ यंत्र पाहिजे त्या बीबीएफ वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा अर्ज जतन करायचा आहे.
6. याच वेबसाईट वर पुन्हा येऊन तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर यापूर्वी अर्ज भरलेला नसेल तर पेमेंट करायचं आहे, पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे.