MSKVY Yojana: आता शेतकऱ्यांना 12 तास वीज, तसेच वार्षिक हेक्टरी 1 लाख 25 हजार भाडे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा शुभारंभ

शेतकरी बांधवांना आपल्या राज्यात शेतकऱ्यांना शेतीच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने महाराष्ट्र शासन वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध व्हावी तसेच जे शेतकरी त्यांची जमीन भाड्याने देतील त्यांना निश्चित व दरवर्षी वाढीव दराने भाडे मिळावी यासाठी महत्त्वाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत असते. आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा शुभारंभ करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना आता खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

 

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सौर उर्जेवर आधारित यंत्रणा तयार करण्यासाठी मोठी पावले उचललेली आहे. आता राज्यात Mukhymantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर करून 7000 मेगा वॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. 2025 पर्यंत तीस टक्के कृषी फीडर्स सौर उर्जेवर चालवण्याची शासनाचे मिशन असून उर्वरित उद्दिष्ट अतिशय वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 MSKVY Yojana

महाराष्ट्र शासनाची उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा शुभारंभ करण्यात आलेला असून सौर ऊर्जा तयार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच योजनेच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी भर द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी त्याचबरोबर सचिव तसेच महावितरण चे अध्यक्ष आणि इतर सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा एक महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी समाविष्ट होऊन आपल्या जमिनी भाड्याने द्याव्या असे आवाहन देखील उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा फायदा

MSKVY Maharashtra योजनेच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर कृषी वाहिनी प्लांट स्थापित करणार आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध होईल तसेच जे शेतकरी त्यांची जमीन शासनाकडे भाड्याने देतील अशा शेतकऱ्यांना एका हेक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपये इतका मोबदला मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्या दरवर्षी काही टक्के दराने वाढ होणार आहे.

 

गाय व म्हैस वाटप योजनेला मंजुरी, आता मिळवा 1 लाख 34 हजार अनुदान, असा करा अर्ज

 

सौर ऊर्जेद्वारे निर्माण होणारे वीज ही कमी दरात उपलब्ध होते त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा कमी दरामध्ये ही वीज उपलब्ध झाल्यानंतर त्यांची येणारे वीजबिल देखील कमी होईल. 

 

आता तुमच्या शेतात गाळ टाकण्यासाठी शासन देणार अनुदान; असा करा अर्ज