Jamin Mojani: आता बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांना बसेल आळा, फक्त 15 दिवसात शेत जमीन मोजून मिळणार, महत्वाचा निर्णय

शेतकरी बांधवांनो राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यात होणाऱ्या बांध कोरीच्या घटनेला आणा घालण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी महत्त्वाची शक्कल लढवली आहे. आता शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये त्यांची जमीन मोजून मिळणार असून या Jamin Mojani संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी बांधवांनो राज्यात शेत जमिनीशी संदर्भात अनेक प्रकारचे वाद निर्माण झालेले आहेत. अनेक वेळा शेतकरी शेत जमिनीच्या प्रश्नावरून एकमेकांशी भांडत असतात. यावर राज्य सरकारने एक महत्त्वाची उपाययोजना केलेली असून आता शेतकऱ्यांना काही अडचण आल्यानंतर Shet Jamin Mojani करावी लागते त्यावेळेस आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ही जमीन पंधरा दिवसाच्या आत मधून मिळणार आहे.

 

बांध कोरीला आळा घालण्यासाठी काय आहे उपाय योजना?

शेतकऱ्याच्या क्षेत्रावरून अनेक प्रकारचे वाद निर्माण होत असल्याने राज्य सरकारने आता एक जुलै पासून सॅटॅलाइटच्या माध्यमातून जमीन मोजणी करण्याचे ठरवले आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांकडून जमीन मोजणी झाल्यानंतर करून देण्यात आलेल्या खानाखुंना काढून टाकण्यात येतात, त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार शेत जमिनीची मोजणी करावी लागते तसेच यामुळे शेत जमिनीच्या मोजणी संदर्भात तसेच इतर संदर्भात अनेक वाद निर्माण होतात त्यामुळे या सर्व प्रश्नांवर तोडगा जमिनीची मोजणी आधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

 

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

 

सॅटेलाईटच्या माध्यमातून जमीन मोजणी करण्याचे फायदे

आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजे सॅटॅलाइट च्या माध्यमातून जमिनीची मोजणी करण्यात येत असल्यामुळे खालील फायदे शेतकऱ्यांना होणार आहे.

1. जमीन मोजणी करण्यासाठी कमी कालावधी लागेल

2. शेतकऱ्यांना आता अक्षांश व रेखांशासह मोजणीचे नकाशे मिळणार आहे.

3. पूर्वीपेक्षा अचूक मोजणी होणार आहे.

4. शेतकऱ्यांना जमीन मोजणी करण्यासाठी लागणारा खर्च वाचेल

5. वारंवार मोजणी करायची आवश्यकता नसेल

6. जमीन मोजणी केल्यानंतर खानाखुणा मिटवण्याच्या समस्या निर्माण होणार नाही

Crop Insurance Update: पिक विमा कंपनीने नाकारलेल्या पीक विम्याच्या तक्रारीची फेर तपासणी, या शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल

 

आता केवळ 15 दिवसात शेत जमिनीची मोजणी

शेतकरी बांधवांनो आता आधुनिक पद्धतीने शेत जमिनीची मोजणी होणार असल्यामुळे सॅटलाईटच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांनी एक वेळ कृषी विभागांमध्ये जमीन मोजणीचा अर्ज दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत मोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जमीन मोजणी करून घेण्यासाठी पूर्वीप्रमाणे जास्त वेळ थांबण्याची आवश्यकता नाही. तसेच जमीन मोजणी केल्यानंतर अक्षांश व रेखांश मिळत असल्यामुळे बांधकोरीच्या घटनेला आळा बसेल.

 

तुमची शेत जमीन मोजा घरबसल्या मोबाईल वरून; जमिनीची अचूक मोजणी करा मोबाईल वरून