आता तुमच्या शेतात गाळ टाकण्यासाठी शासन देणार अनुदान; असा करा अर्ज | Galyukt Shivar Yojana 2023

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यात गाळ युक्त शिवार योजना राबविण्यात येत असते. या गाळ युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च प्रतीचा गाळ मिळतो, तसेच यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे राज्यातील शेतकरी समृद्ध होऊ शकतात. आता राज्य शासनाने गाळ युक्त शिवार योजना 2023 अंतर्गत महत्त्वपूर्ण बदल केलेला असून आता शेतकऱ्यांना शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी अनुदान मिळणार आहे. एकंदरीत ही योजना काय आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कोणते अनुदान कसे मिळणार या Galyukt Shivar Yojana 2023 Maharashtra संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे देशातील जास्त धरणे व जलसाठा असलेले राज्य आहे. तसेच आपल्या राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असलेला असून दिवसेंदिवस धरणांच्या पाणी साठवण क्षमतेत घट होत आहे. धरणांमध्ये साठवून असणारा हा उच्च प्रतीचा गाळा असून हा गाळ जर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी मिळाला तर त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणाची मूळ पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल, तसेच शेतकऱ्यांना गाळ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न वाढेल.

 

महाराष्ट्र शासनाने ही बाब लक्षात घेऊन धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजना सुरू केलेली आहे. या Galyukt Shivar Yojana 2023 ची मुदत 2021 मध्ये संपलेली होती परंतु आता नवीन शासन निर्णय काढून पुन्हा तीन वर्षाकरिता योजनेची मुदत वाढवण्यात आलेली आहे.

 

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

या Galyukt Shivar योजनेच्या माध्यमातून अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये गाळ देण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

तसेच गाळ उपसा करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री व इंधनावरील खर्च देखील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

 

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अल्पभूधारक त्याचबरोबर विधवा महिला शेतकरी व अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांना लाभ देण्यात येईल. या व्यतिरिक्त बहुभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे.

100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजनेचे अर्ज सुरू; असा करा अर्ज, ही आहे पात्रता

 

अनुदान किती मिळेल?

योजनेच्या अंतर्गत शेतामध्ये टाकण्यात येणाऱ्या गाळाच्या रुपये 37.75 प्रति घनमीटर प्रमाणे 15 हजार रुपयांच्या मर्यादित लाभ देण्यात येईल. हे अनुदान अडीच एकर पर्यंत मिळणार असून 37500 रुपये जास्तीत जास्त असणार आहे.

 

गारपीट व अवेळी पाऊस नुकसान भरपाई साठी 27 कोटी रुपये मंजूर; या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल लाभ

Leave a Comment