Gay Mhais Watap Yojana: गाय व म्हैस वाटप योजनेला मंजुरी, आता मिळवा 1 लाख 34 हजार अनुदान, असा करा अर्ज

शेतकरी बांधवांनो ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गाय व म्हशीचे वाटप करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गाय व म्हशीचे गट वाटप करण्यात येतात ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंदा उपलब्ध होतो तसेच येणाऱ्या जोडधंद्यातून चांगले उत्पन्न मिळून शेतकऱ्यांना समृद्ध बनता येते. गाय व म्हैस पालन हा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय Gay Mhais Watap Yojana करिता शासनाने अनुदान देण्याचे ठरवले आहे.

 

गाय म्हशी वाटप योजनेला मंजुरी:

शेतकऱ्यांना गाय व म्हशीचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येते. आता या योजनेअंतर्गत दोन दुधाळ गाई म्हशींच्या वाटपाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली असून योजना आता सन 2023 24 Gay Mhais Watap Yojana Maharashtra मध्ये राबविण्यात येणार आहे.

 

त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नावीन्यपूर्ण योजना या घटकांतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या गाय व म्हैस वाटप योजना ला मिळणारे अनुदान देखील वाढवण्यात आलेले आहे.

 

अनुदान किती मिळेल? Gay Mahis Anudan

नाविन्यपूर्ण योजना या घटकांतर्गत मिळणाऱ्या गाय व म्हशीचे वाटपाला आता पूर्वीपेक्षा जास्त अनुदान मिळणार आहे ते खालील प्रमाणे.

1. एस सी व एसटी प्रवर्गांना- 1 लाख 34 हजार अनुदान

2. जनरल आणि ओबीसी प्रवर्गांना- 89000 अनुदान

 

योजना राबविणे संदर्भात शासन निर्णय जाहीर Navinya Purna Yojana Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नाविन्यपूर्ण योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 27 एप्रिल 2023 रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करून ही योजना राज्यात राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे.

 

योजनेचा संपूर्ण शासन निर्णय तसेच अनुदानाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया

नवीन पूर्ण योजना करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर चे प्राधान्य क्रमाने लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

1. महिला बचत गटातील लाभार्थी

2. अल्पभूधारक शेतकरी

3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)

 

गाय व म्हैस गट वाटप योजने करिता अर्ज कसा करायचा?

शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत त गाय व म्हैस वाटप योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

100 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजनेचे अर्ज सुरू; असा करा अर्ज, ही आहे पात्रता, आत्ताचं येथे अर्ज करा

http://ah.mahabms.com/ या वेबसाईट वरून संबंधित शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यावेळेस योजनेअंतर्गत नवीन अर्ज मागविण्यात येत असतात त्यावेळेस शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतो. योजनेअंतर्गत केवळ शेतकरीच नाही तर महिला बचत गटातील लाभार्थी

 

Farmer Scheme Maharashtra: शेळीपालन व कुकुट पालनासाठी सरकार देणार लाखो रुपये अनुदान, असा करा केंद्र सरकारच्या या योजने अंतर्गत अर्ज

 

आणि सुशिक्षित बेरोजगार सुद्धा अर्ज करू शकतात.