सलोखा योजना महाराष्ट्र सुरू, GR जाहीर; संपूर्ण माहिती जाणून घ्या | Salokha Yojana Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात भाऊबंदकीचे वाद मिटवणारी, जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित भांडण, तंटे मिटवणारी तसेच वर्षापासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद सोडवणारी महत्वपूर्ण अशी सलोखा योजना महाराष्ट्र ही आपल्या राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. सलोखा योजना संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. सलोखा योजना संदर्भात नवीन GR काढून ही योजना राज्यात राबविण्यास मंजुरी दिली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Salokha Yojana 2023 Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

सलोखा योजना महाराष्ट्र सुरू, GR जाहीर; संपूर्ण माहिती जाणून घ्या | Salokha Yojana Maharashtra

 

सलोखा योजना काय आहे? What is Salokha Yojana

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जमिनीच्या वादाची अनेक प्रकरने आहेत. जमिनीच्या वादाची अनेक प्रकरणे आहेत अनेक प्रकरणे न्यायालयामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. राज्य जमिनीच्या हक्काबाबतचे अनेक वाद आहेत. अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्यामुळे अनेक प्रकारचे वाद निर्माण झालेले आहे. शासकीय योजनेतील त्रुटी तसेच जमिनीच्या रस्त्याची वाद तसेच जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, भावा- भावांतील वाटणीचे वाद आहेत. शेत जमीन ज्याच्या नावावर आहे तो जमीन वाहणारा नसून ती जमीन वाहणारा दुसराच आहे. अनेक शेतजमीन ताबे शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आहे.

अशा प्रकारचे अनेक जमिनीचे वाद असून सुद्धा यंत्रणेअभावी हे वाद आत्तापर्यंत संपुष्टात आलेली नाही. कुटुंबात असलेल्या जमिनीशी संबंधित वादामुळे कुटुंबात तसेच समाजात दुरावा निर्माण होत आहे. अनेक वेळा जमिनीच्या वादामुळे अनेक प्रकरणी सुद्धा घडलेली आहे त्यामुळे जमिनीशी संबंधित हे वाद संपुष्टात यावे तसेच समाजात शांतता राहावी सौख्य नांदावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सलोखा योजना राबविण्यात येत आहे. सलोखा योजना महाराष्ट्र अंतर्गत शेती संबंधित वरील प्रकारचे सर्व वाद मिटवण्यात येणार आहे. सलोखा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वरील सर्व जमिनीशी संबंधित वाद मिटवण्याकरिता अत्यंत कमी मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेत जमिनीचे सर्व वाद मिटवणारी तसेच भाऊबंदकीचे वाद मिटवणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी Salokha Yojana Maharashtra आहे.

सलोखा योजना अंतर्गत मुद्रांक शुल्क किती आहे? Salokha Yojna 2023

तालुका योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत त अनेक प्रकारचे शेत जमिनीशी संबंधित प्रकरणी सोडवण्याकरिता शेतकऱ्यांकडून केवळ 1000 रुपये मुद्रांक शुल्क व नोंदणी फी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आता राज्यात सुरू झालेली आहे.

सलोखा योजना महाराष्ट्र अटी व शर्ती:-

सलोखा योजना 2023 (Salokha Yojana Maharashtra 2023) च्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

1. सलोखा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे शेत जमिनीशी संबंधित प्रकरणे सोडविण्यासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत ही दोन वर्ष लागू असेल. शासन निर्णय लागू झाल्याच्या तारखेपासून.
2. जर शेत जमिनीच्या ताब्या संदर्भात प्रकरण असेल तर जमिनीचा ताबा हा किमान 12 वर्षापासून असला पाहिजे.
3. अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही.
4. Salokha Yojana अंमलात येण्यापुर्वीच अशा प्रकारच्या प्रकरणासाठी जर शेतकऱ्याने मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर ते परत मिळणार नाही. केवळ या योजनेअंतर्गत प्रकरणे मुद्रांक शुल्क सवलतीस पात्र असतील.
5. दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित झालेली असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील.

कुकुट पालन योजना 2023 महाराष्ट्र सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

सलोखा योजनेचे फायदे Benifits of Salokha Yojana Maharashtra:-

Salokha Yojana 2023 Maharashtra  चे अनेक प्रकारचे फायदे आहेत, त्यापैकी काही फायदे आता आपण जाणून घेऊया.

1. जमिनीच्या वादामुळे मतभेद असलेल्या कुटुंबातील जमिनीशी संबंधित वाद मिटल्यास मतभेद दूर होईल.
2. जमिनीशी संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली लागतील.
3. जमिनीच्या वादामुळे कुटुंबात आलेली कटुता दूर होईल.
4. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.
5. या योजनेअंतर्गत शासनाकडे मुद्रांक शुल्क प्राप्त होईल.
6. या salokha yojna अंतर्गत ज्या जमिनीशी संबंधित वाद मिटल्यास शेतकऱ्यांना न्यायल्यात जाण्याची आवश्यकता पडणार नाही, परिणामी शेतकऱ्यांना येणार खर्च वाचेल.
7. भू माफियांचा शिरकाव तसेच हस्तक्षेप होणार नाही.

अनेक फायदे या योजनेअंतर्गत आहेत, ते आपण gr वाचून माहीत करून घेऊ शकतात.

सलोखा योजना शासन निर्णय डाऊनलोड Salokha Yojana GR PDF:-

Salokha Yojana संदर्भातील अधिकृत GR हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून सलोखा योजना शासन निर्णय डाऊनलोड करून घ्या.

Gr download link

वरील सलोखा योजनेच्या शासन निर्णयात योजने संदर्भात विस्तृत माहिती दिलेली आहे. वरील सर्व माहिती वाचण्यासाठी gr download करावा.

सलोखा योजना संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न:-

1. तालुका योजनेअंतर्गत जमिनीच्या ताब्याची अदलाबदल प्रकरण असल्यास जमिनीचा ताबा हा एकमेकांकडे बारा वर्षापेक्षा कमी कालावधी करिता असल्यास मुद्रांक शुल्क सवलत मिळेल का? – नाही

2. सलोखा योजना अंतर्गत अकृषिक जमिनीचे अदलाबदलीचे व्यवहार करता येईल का? – नाही

महत्वाचं अपडेट: शेतकरी योजना 2023 महाराष्ट्र सुरू; असा करा अर्ज

सलोखा योजना पात्रता तसेच नियम:-

1. Salokha Yojana अंतर्गत पंचनामा करण्याकरिता तलाठी यांच्याकडे अर्ज करायचा .
2. सलोखा योजनेअंतर्गत तुमच्या जमिनीचा पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी तसेच तलाठी प्रत्यक्ष सर्वे करताना तुमच्या जमिनीवर हजर राहतील.
3. सलोखा योजने अंतर्गत अंतर्गत कोणत्याही प्रकरणाच्या निकालाकरिता तलाठी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या कार्यालयीन वेळेत तुमच्या जमिनीचा पंचनामा तलाठी यांना करावा लागेल.
4. सलोखा योजना अंतर्गत तुमचे समाधान न झाल्यास तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागु शकतात.

सलोखा योजना मुळे राज्यात अस्तित्वात असलेल्या जमिनीशी संबंधित वाद व तंटे मिटणार आहे. या योजनेअंतर्गत अत्यंत कमी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे भांडण तंटे असलेले दोन्ही पक्ष ते सहजतेने सोडवू शकतात. राज्यात जमिनीशी संबंधित वाद सोडवून सलोखा निर्माण या salokha yojana अंतर्गत करण्यात येणार आहे.

सलोखा योजना 2023 महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. सलोखा योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारा. अश्याच प्रकारच्या योजना विषयक माहिती करिता आमच्या या वेबसाईटवर भेट देत रहा.