शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेळी पालन योजना 2023 ही राबवण्यात आलेली होती. या शेळी पालन योजना महाराष्ट्र नुसार यापूर्वी अर्ज केलेल्या अर्जदारांची लाभार्थी तसेच प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण Sheli Palan Yojana 2023 लाभार्थी यादी डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
शेळी पालन योजना 2023 लाभार्थी यादी जाहीर; लगेच डाउनलोड करा | Sheli Palan Yojana 2023 Maharashtra |
मित्रांनो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना 2022 ही राबविण्यात आलेली होती. या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याकरिता विविध पशुपालनांच्या योजनांकरिता अर्ज मागविण्यात आलेले होते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अनेक शेतकऱ्यांनी Sheli Palan या घटकाकरिता सुद्धा अर्ज केलेले होते. शेळी पालन योजना 2023(sheli palan yojana 2023) अंतर्गत अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असून महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ah mahabms या पोर्टलवर पशुसंवर्धन विभागाच्या योजनेच्या लाभार्थी याद्या जाहीर करण्यात आलेले आहे.
अर्ज केलेल्या अर्जदारांची लाभार्थी यादी तसेच प्रतीक्षा यादी आपण घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतो. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कुक्कुट पालन योजना तसेच दुधाळ गाई म्हशींचे वाटप करणारी योजना 1000 मांसल कुकुट पक्षाचे वितरण करणारी योजना, तालंगा गट वाटप योजना तसेच शेळीपालन योजना राबविण्यात आलेली होती. दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वरील योजना नाविन्यपूर्ण योजनेच्या घटकांतर्गत ah mahabms या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असतात.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तसेच पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून पशुपालन करावे व आपल्या आर्थिक स्थैर्य मिळवावी याकरिता या प्रकारच्या अनेक योजना या राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना या दोन प्रकारांमध्ये राबविण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या योजना अंतर्गत लागण्याकरिता ग्रामीण भागातील अनेक पशुपालकांनी तसेच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. वरील प्रकारच्या अनेक योजनांकरिता प्रत्येक घटकाचे लक्षांक ठरवून देण्यात आलेले आहे. त्या दरवर्षीच्या लक्षांकचा विचार करता त्या प्रमाणात लाभार्थी निवड करण्यात येत असते.
या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत तुमच्या जिल्ह्याकरिता विविध घटकांकरिता प्राप्त झालेली एकूण अर्ज तसेच प्रवर्गानुसार प्राप्त झालेल्या अर्ज यांची सर्वांची यादी तसेच उपलब्ध असलेल्या लक्षांक आपल्याला ऑनलाइन चेक करता येतो.
शेळी पालन योजना महाराष्ट्र अनुदान किती? Sheli Palan Yojana Anudan :-
शेळी पालन योजना तसेच नाविन्यपूर्ण योजना करिता शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान वितरित करण्यात येत असते.
शेळी पालन योजना अंतर्गत लाभ कसा मिळवायचा?
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वेळोवेळी शेळीपालनाच्या अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत Sheli Palan Yojana 2023 चा लाभ मिळवायचा असेल तर नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला ah mahabms या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. या पोर्टलवर शेळीपालनाच्या दोन प्रकारच्या योजना राबविण्यात येतात एक म्हणजे राज्यस्तरीय आणि दुसरा म्हणजे जिल्हास्तरीय. यापैकी कोणत्याही योजना अंतर्गत अर्ज करा, जर तुम्ही योजना अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्यास तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला 75 टक्के पर्यंत अनुदान मिळते.
महत्वाचं अपडेट: शेत जमिनीचे वाद सोडवण्याकरिता शासनाने सुरू केली सलोखा योजना; पाहा सविस्तर माहिती
शेळी पालन योजना 2023 यादी डाउनलोड कशी करायची? Sheli Palan Yojana 2023 Benificery List
मित्रांनो जर तुम्हाला नाविन्यपूर्ण योजनेच्या शेळी पालन या घटकाची तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करायची असेल तर खालील प्रमाणे यादी डाऊनलोड करता येते. नाविन्यपूर्ण योजना जिल्हास्तरीय sheli palan yojana तसेच राज्यस्तरीय sheli palan yojana या दोन प्रकारात राबवण्यात येत असल्यामुळे दोन्ही प्रकारची यादी आपण डाउनलोड करू शकतात.
1. सर्वप्रथम नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. नवीन पूर्ण योजना अधिकृत संकेतस्थळ ah.mahabms.com हे आहे.
3. राज्यस्तरीय योजना तसेच जिल्हास्तरीय योजना असे दोन पर्याय दिसतील.
4. या दोन पैकी तुम्हाला ज्या योजनेची यादी पाहायचे आहे त्या पर्यायावर क्लिक करा.
5. आता तुमच्यासमोर विविध जिल्हे आहेत त्यापैकी ज्या जिल्ह्याची यादी पाहिजे त्या जिल्ह्यासमोरील यादी डाऊनलोड करा.
शेळी पालन योजना यादी डाऊनलोड येथे करा-
शेळी पालन योजना 2023 महाराष्ट्र यादी डाऊनलोड करण्यासंदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळीपालनाची लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. अशाच प्रकारच्या विविध योजना विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.