मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र अंतर्गत कुक्कुट विकास गट स्थापन करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे. याकरिता अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळावी याकरिता सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना व्हावी व त्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास व्हावा या दृष्टीने कुक्कुटपालन योजना 2023 महाराष्ट्र ही राज्यात राबविण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Kukut Palan Yojana Maharashtra संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत आहोत.
कुक्कुट पालन योजना 2023 महाराष्ट्र | Kukut Palan Yojana 2023 Maharashtra |
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र Kukut Palan Yojana :-
आपल्या महाराष्ट्र राज्यात कुक्कुट पालन व्यवसायाला चालना मिळावी तसेच कुकूटपालन व्यवसायाची वाढ व्हावी तसेच जास्तीत जास्त लोकांनी कुकुट पालन हा व्यवसाय करून त्यांचा स्वतःचा आर्थिक विकास करून घ्यावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने त्याचबरोबर ah mahabms, नाविन्यपूर्ण योजना यांच्यामार्फत वेळोवेळी कुक्कुटपालन योजना राबविण्यात येत असतात. या योजनांच्या माध्यमातून कुकूटपालन करिता अनुदान तसेच कुक्कुटपालन पक्षांच्या खरेदी करिता अनुदान वितरित करण्यात येत असते.
अशाच प्रकारची कुक्कुटपालनाची महत्त्वाची योजना म्हणजे सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याची महत्त्वाची योजना आहे. सार्वजनिक तसेच खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुकुट विकास गटाची स्थापना या kukut palan yojana 2023 अंतर्गत करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 302 तालुक्यांपैकी प्रति तालुका एक याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्याकरिता या योजनेअंतर्गत सध्या अर्ज सुरू झालेले आहे.
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अर्ज करण्याचा कालावधी:-
कुक्कुट पालन योजना 2023 अंतर्गत सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याची योजना सुरू आहे. कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत कुक्कुट विकास गट स्थापन करणे या kukut palan yojana maharashtra करिता अर्ज हा अर्जदारांना 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे.
महत्वाचं अपडेट: या शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस जाहीर; आत्ताच नाव चेक करा
कुक्कुट पालन योजना 2023 अर्ज कुठे करायचा? Where to Apply for Poultry Farming Scheme 2023?
कुक्कुट पालन योजनेच्या कुक्कुट विकास गटाची स्थापना या घटकांतर्गत अर्जदारांनी अर्ज हा 10 जानेवारी 2023 या अंतिम तारखेच्या आत त्यांच्या पंचायत समिती मधील पशुसंवर्धन विभागाकडे सादर करायचा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या kukut palan yojana maharashtra 2023 च्या विविध योजनांकरिता अर्ज सुरू झाल्यानंतर ते अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने योजनेच्या नुसार सबमिट करावे लागत असतात.
कुक्कुट पालन योजना करिता आवश्यक कागदपत्रे Documents For Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुट पालन योजनेच्या कुकूट विकास गटाची स्थापना या घटकाकरिता अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असावी लागतात.
1. आधार कार्ड
2. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
3. सातबारा व आठ अ उतारा
4. ग्रामपंचायत नमुना नंबर 4
5. अर्जदार अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्याबाबत जातीचे प्रमाणपत्र
6. कुकुट व्यवसायाबद्दल प्रशिक्षण घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र
कुक्कुट पालन योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते?
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत जे लाभार्थी कुक्कुटपालन हा व्यवसाय पूर्वीपासून करत आहेत. तसेच ज्या लाभार्थ्यांकडे लघु अंडी उगवणूक यंत्र उपलब्ध आहेत अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. Kukutpalan Yojana अंतर्गत उमेदवारांनी कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण मिळवणे आवश्यक आहे. कुकुट पालन योजना अंतर्गत स्वयंरोजगार मिळवू इच्छिणारे सुद्धा अर्ज करू शकतात. कुकुट पालन व्यवसाय बद्दल ज्ञान असलेल्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
कुक्कुट पालन योजना अधिक माहिती करिता संपर्क:
मित्रांनो कुक्कुट पालन योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा नवीन योजना सुरू झालेली आहे का? याबद्दल माहिती करिता तुम्ही जिल्हा पशुसंवर्धन विभाग तसेच तालुका पशुसंवर्धन विभाग किंवा पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधू शकतात.
आजच्या पोस्टमध्ये आपण कुक्कुटपालन योजनेच्या कुक्कुट विकास गट स्थापन योजना संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेतली आहे. येणाऱ्या पुढील पोस्टमध्ये आपण राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कुक्कुटपालन योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.