पशुसंवर्धन विभाग योजना 2023 महाराष्ट्र | pashu samvardhan Yojana 2023 Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात पशुधनाची संख्या वाढावी तसेच शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करावे याकरिता पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने पशुसंवर्धन योजना या राबविण्यात येत असतात. राज्यात विविध प्रकारच्या पशुसंवर्धन योजना राबविण्यात येत असून या योजना अंतर्गत पशुपालकांना शेळी मेंढी तसेच गाय म्हैस व कुक्कुटपालन यांचा गट वाटप करण्यात येत असतो. अशाच प्रकारची महत्वपूर्ण अशी पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राबविण्यात येणारी योजना या योजनेअंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत या pashu samvardhan Yojana 2023 Maharashtra संदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

पशुसंवर्धन विभाग योजना 2023 महाराष्ट्र | pashu samvardhan Yojana 2023 Maharashtra
पशुसंवर्धन विभाग योजना 2023 महाराष्ट्र | pashu samvardhan Yojana 2023 Maharashtra

 

पशुसंवर्धन योजना 2023 Pashu Samvardhan Yojana :

मित्रांनो maharashtra shasan pashusavardhan yojana यांच्या वतीने आपल्या राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत सन 2022-23 करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशींचे वाटप तसेच तसेच 1000 मांसल कूकुट पक्षी वाटप तसेच दहा शेळ्या व एक बोकड वाटप करण्यात येत आहे.

पशुसंवर्धन योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ Benefits under Animal Husbandry Scheme Maharashtra:

पशुसंवर्धन विभागाच्या या योजनेअंतर्गत वरील प्रमाणे पशुंचे वाटप करण्यात येत असून अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

महत्वाचं अपडेट: पाईप लाईन योजना नवीन अर्ज सुरू 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत एक वेळा अर्ज केल्यानंतर पाच वर्षे तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे जर या maharashtra shasan pashusavardhan yojana योजनेअंतर्गत तुम्ही मागील वर्षी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला आता नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यावर्षी अर्जाची निवड होण्याकरिता तुमचा अर्ज पात्र ठरणार आहे. यावर्षी तुमच्या अर्जाची निवड न झाल्यास तुमचा अर्ज प्रतीक्षा यादी मध्ये ठेवण्यात येऊन पुढच्या यादीमध्ये तुमच्या अर्जाचा विचार करण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन विभाग योजना 2023 महाराष्ट्र | pashu samvardhan Yojana 2023 Maharashtra

50,000 अनुदान योजनेच्या सर्व याद्या तसेच कर्जमाफी योजनेच्या याद्या व सर्व योजनांचे अपडेट What’s App वर मिळवा. येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा.

पशुसंवर्धन योजना अर्ज कधी व कसा करायचा?

महाराष्ट्र शासन पशु संवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना सध्या सुरू आहे. जर तुम्हाला या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल तर 11 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नवीन पूर्ण योजना अंतर्गत अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ah mahabams या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा त्यांचे मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची वेबसाईट

अर्ज करताना सर्वात पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्या. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या pashu samvardhan yojana अंतर्गत तुम्हाला ज्या घटकाकरिता अर्ज करायचा आहे तो निवडून अर्ज सादर करा.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना ही राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करताना संबंधित अर्जदाराने तुमच्या जिल्ह्याकरिता असलेला लक्षांक पाहून त्यानुसार अर्ज करावा.

पशुसंवर्धन योजना 2023 लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया Selection Process of Animal Husbandry Scheme 2023 Beneficiaries:

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत सर्वप्रथम अर्ज केलेले आहेत त्यांची छाननी करण्यात येते. मागील वर्षीच्या प्रतीक्षा यादीत जे अर्ज आहेत, त्यांची निवड पहिल्यांदा करण्यात येते त्यानंतर या योजनेचा लक्षांक तुमच्या जिल्ह्याकरिता शिल्लक राहिल्यास यावर्षी अर्ज केलेल्या नवीन अर्जदारांना लाभ देण्यात येतो.

नावीन्य पूर्ण योजना असा करा ऑनलाईन अर्ज 

योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येते त्यांना याच पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध पशुसंवर्धन योजना(pashu samvardhan yojana) राबविण्यात येत आहेत. त्यापैकी आपण नावीन्यपूर्ण योजना याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. या योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारा तुम्हाला असलेल्या प्रश्नांची नक्कीच उत्तर आम्ही देऊ. ही माहिती तुमच्या जवळील सर्व शेतकऱ्यांना शेअर करा.

Leave a Comment