पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | PVC Pipe Subsidy Yojna Maharashtra

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने योग्य वेळी अनेक पावले उचलण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या सिंचन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत. जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर शेताला पाणी देण्याकरिता पाईपलाईन करण्यासाठी शासन अनुदान देत आहे. या पाईपलाईन अनुदान योजना अंतर्गत PVC Pipe Subsidy ही वितरित करण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या योजना संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.
पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | PVC Pipe Subsidy Yojna Maharashtra
पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | PVC Pipe Subsidy Yojna Maharashtra

 

मित्रांनो शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहीर योजना तसेच ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना याविषयी तुम्ही नेहमी ऐकलेच असेल परंतु शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप वर अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी PVC Pipe Subsidy Yojna सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविणे सुरू आहे. शेतकऱ्यांना अशी योजना विषयी माहिती नसल्यामुळे त्यांना या योजना अंतर्गत लाभ मिळू शकत नाही. पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र (pipeline subsidy yojna)सरकारच्या शेतकरी पोर्टलवर सुरू असून ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करिता पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता अनुदान हवे आहे त्यांनी शासनाकडे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

पाईपलाईन योजना लाभ किती मिळतो? PVC Pipe Subsidy in Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र (PVC Pipe Subsidy Yojna) अंतर्गत जर तुम्ही लाभ मिळवून येणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असून शेतकऱ्यांना पाईपलाईन बसवण्याकरिता 50% पर्यंत अनुदानित करण्यात येत आहे. पाईपलाईन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अनुदान हे 15 हजार रुपये आहे.
त्यामुळे जर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करू इच्छिणार असाल, तर शासनाच्या योजनेअंतर्गत पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता 15000 रुपये अनुदान मिळवू शकतात.

महत्वाचं अपडेट: नावीन्य पूर्ण योजना नवीन अर्ज सुरू

पीव्हीसी पाईप करिता अर्ज कसा करायचा?

शेतकरी मित्रांनो पाईपलाईन करता पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पाईप लाईन योजना अंतर्गत PVC Pipe Anudan Yojna अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा.
2. आता या ठिकाणी शेतकरी म्हणून नोंदणी करून घ्या.
3. तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
4. या फोटोवर तुमची सर्व वैयक्तिक तसेच शेती संबंधित तसेच पिकासंबंधी सर्व माहिती प्रविष्ट करा.
5. आता अर्ज करा या पर्यायांमध्ये जाऊन पाईपलाईन हा पर्याय निवडून पाईपलाईन योजना अंतर्गत सबसिडी मिळवण्याचा अर्ज ऑनलाईन भरा.
6. अर्ज भरल्याचा एसएमएस तुमच्या मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट होईल.
अशाप्रकारे आपण पीव्हीसी पाईप करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

पाइप लाइन योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे:

मित्रांनो पीव्हीसी पाईप वर अनुदान देणाऱ्या pipeline yojana अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
3. जमिनीचा सातबारा व आठ अ
इत्यादी कागदपत्रे असल्यास आपण या योजना अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहात.

 

हे नक्की वाचा: शेळी, मेंढी व कूकुट पालन योजना 

 

पाइप लाइन योजना महाराष्ट्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया

मित्रांनो मराठी बीपी शेतकरी पोर्टलवर पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता पाईपलाईन योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या योजनेअंतर्गत तुमची निवड होण्याची वाट पाहावी लागेल. या योजनेअंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल त्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून या योजनेसंदर्भात संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर पुरोसमती मिळाल्यानंतर योजनेचे काम म्हणजेच पाईप तुम्हाला खरेदी करायचे आहे. पाईपलाईन संबंधित सर्व बिले व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.