मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना 4 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू | Manarega Magel Tyala Vihir Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या या करिता मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना ही राबविण्यात येणार आहे. या मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना लाभ देण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणार आहे. Manarega Magel Tyala Vihir Yojana Maharashtra अंतर्गत लाभार्थ्यांना विहीर बांधकाम करण्याकरिता 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. मागेल त्याला विहीर योजना विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना 4 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू | Manarega Magel Tyala Vihir Yojana Maharashtra
मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना 4 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू Manarega Magel Tyala Vihir Yojana Maharashtra

 

 

मागेल त्याला विहीर योजना Magel Tyala Vihir Yojana -Manarega

शेतकरी मित्रांनो मनरेगाच्या अंतर्गत यापूर्वीसुद्धा अनेक प्रकारच्या सिंचन विहीर योजना राबवण्यात येत होत्या. परंतु त्या योजनांमध्ये अनेक प्रकारच्या जाचक अटी व शर्ती होत्या त्यामुळे या विहीर योजना(Vihir Yojana) अंतर्गत त्या गावातील जास्तीत जास्त लोक हे या अटी व शर्ती मध्ये बसत नव्हते त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळता येत नव्हता. परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नवीन शासन निर्णय काढून नवीन पद्धतीने अनेक प्रकारच्या अटी रद्द करून मागेल त्याला विहीर योजना सुरू केलेली आहे. मनरेगाच्या अंतर्गत ही मागेल त्याला विहीर योजना (Manarega Magel Tyala Vihir Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहिरीचे बांधकाम करण्याकरिता चार लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारे ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असावी लागते.

मनरेगा मागेल त्याला विहीर योजना कागदपत्रे Required Documents For Magel Tyala Vihir Yojana

1. डिजिटल सातबारा
2. डिजिटल आठ अ
3. मनरेगा जॉब कार्ड
4. सामूहिक विहीर असल्यास समोप चाराने पाणी वापरण्याबाबत करार पत्र
5. सामूहिक विहीर हवी असल्यास 0.40 पेक्षा अधिक जमीन असल्याबाबत पंचनामा
6. प्रपत्र अ सिंचन विहीर मंजूर करण्याबाबत अर्ज
7. प्रपत्र ब संमती पत्र

मनरेगा मागेल त्याला विहीर योजना अर्ज प्रक्रिया  Application Process for Magel Tyala Vihir Yojana

शेतकरी मित्रांनो मनरेगाच्या मागील त्याला विहीर योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे त्यांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे. वरील सर्व कागदपत्रे व अर्ज व्यवस्थित रित्या भरून तो मागेल त्याला विहिरीचा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज स्वीकारण्यात येईल. ग्रामपंचायत तुमच्याकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारतील व ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर ते अर्ज शासनाकडे ऑनलाईन उपलब्ध करून देतील. ग्रामपंचायत मध्ये अर्ज स्वीकारण्याकरिता एक अर्ज पेटी लावण्यात येणार आहे आणि ती दर सोमवारी उघडण्यात येईल. Vihir Anudan Yojana Maharashtra

मागेल त्याला विहीर योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख

शेतकरी मित्रांनो मनरेगाच्या अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना (Magel Tyala Vihir Yojana) ही नव्या रूपाने राबविण्यात येत आहे. मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत 01 डिसेंबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज प्रक्रिया ही जुलै महिन्यापर्यंत चालणार आहे.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना दुसरी यादी जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा.

मागेल त्याला विहीर योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे का?

मनरेगाच्या मागेल त्याला विहीर योजना(Manarega Magel Tyala Vihir Yojana) अंतर्गत सध्या अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. परंतु लवकरच मागील त्याला विहीर योजना(vihir yojana) अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मागील त्याला विहीर योजना च्या शासन निर्णयामध्ये मागेल त्याला विहीर योजना अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून देण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे. मागेल त्याला विहीर योजना(vihir anudan yojana) अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध झाल्यानंतर अर्जदारांना अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.

मनरेगा मागेल त्याला विहीर योजना लाभार्थी निवडीची प्रक्रिया

ग्रामपंचायत मध्ये प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामसभेमध्ये हे अर्ज मांडण्यात येतील. ग्रामसभेमध्ये मागेल त्याला विहीर योजना vihir anudan yojana अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता ही गट विकास अधिकारी देतील. त्यानंतर तांत्रिक मान्यता ही तांत्रिक सहाय्यक देखील. एक महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात येईल तसेच पंधरा दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सर्व गोष्टीची पाहणी केल्यानंतर लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

हे नक्की वाचा:- पीक विमा यादी 2022 महाराष्ट्र जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा

.

मागेल त्याला विहीर अनुदान योजना अंतर्गत पूर्वीच्या योजनेमध्ये करण्यात आलेले बदल

शेतकरी मित्रांनो मनरेगाच्या अंतर्गत विहिरीचा लाभ घेण्यात येण्याकरिता पूर्वी अनेक प्रकारच्या जाचक अटी होत्या. त्यामुळे शासनाने ठरवलेला विहिरीच्या लक्षांक पूर्ण होत नव्हता म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे या योजनेअंतर्गत आतापर्यंत जास्त विहिरी बांधण्यात आलेल्या नाही. याच बाबीचा विचार करता महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून जुन्या काही अटी रद्द केलेले आहे त्याचप्रमाणे अनुदानाची रक्कम ही 2.50 लाख रुपयावरून 4 लाख रुपये करण्यात आलेली आहे. यापूर्वी मनरेगाच्या अंतर्गत विहीर योजना अंतर्गत गावाच्या लोकसंख्येनुसार विहिरी देण्यात येत होत्या. परंतु आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे. जर एखाद्या गावाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या गावाला जास्त विहिरी मिळत होत्या आणि लोकसंख्या कमी असेल तर त्या गावाला कमी विहिरी मिळत होत्या परंतु आता ही अट रद्द केल्यामुळे गावातील गरजेनुसार विहिरी वितरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात येत आहे.

विहीर अनुदान योजना अंतर्गत अर्ज कोण करू शकतो?

शेतकरी मित्रांनो मागेल त्याला विहीर योजना(Manarega Vihir Yojana Maharashtra) अंतर्गत खालील प्रवर्गातील व्यक्तींना अर्ज करता येतो. खाली दिलेल्या लिस्ट प्रमाणे म्हणजेच प्राधान्य क्रमाने लाभार्थ्याची निवड करण्यात येत असते.

1. अनुसूचित जाती
2. अनुसूचित जमाती
3. भटक्या जमाती
4. विमुक्त जाती
5. दारिद्र रेषेखालील व्यक्ती
6. स्त्री कर्ता असलेले कुटुंब
7. शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती
8. जमीन सुधारणांचे लाभार्थी
9. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
10. अल्पभूधारक शेतकरी
11. सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती

वरील सर्व घटकांतील व्यक्तींना तसेच जात प्रवर्गातील व्यक्तींना मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज करता येतो.

मागेल त्याला विहीर योजना अर्ज कुठे मिळेल?

नवीन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या मनरेगाच्या अंतर्गत येणाऱ्या मागेल त्याला विहीर अनुदान योजना(Vihir Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला प्रपत्र अ, प्रपत्र ब तसेच वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे. आम्ही खाली मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत करायचा अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून डाऊनलोड करू शकतात. मागेल त्याला विहीर योजना अर्ज डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक चा वापर करावा.

विहीर योजना अर्ज डाऊनलोड करा

वरील लिंक वर क्लिक करून मागेल त्याला विहीर योजना(Vihir Yojana) अंतर्गत नवीन शासन निर्णय तसेच अर्जाचा नमुना तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.

विहीर अनुदान योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा. या योजने संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू.