अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत या अपात्र शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार लाभ; निकषात बदल | Ativrushti Nuksan Bharpai Important Changes

 

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या निकषात महाराष्ट्र शासनाच्या वतीने काही महत्वपूर्ण असे बदल केले आहेत, त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना आता Ativrushti Nuksan Bharpai मिळणे सुलभ होणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यापासून अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. आजच्या या पोस्टमध्ये  आपण अतिवृष्टीच्या कोणत्या निकषात बदल केलेले आहेत, त्या संबंधित माहिती जाणून घेऊया.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत या अपात्र शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार लाभ; निकषात बदल | Ativrushti Nuksan Bharpai Important Changes
अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत या अपात्र शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार लाभ; निकषात बदल | Ativrushti Nuksan Bharpai Important Changes

 

 

Ativrushti Nuksan Bharpai वितरणाच्या अनेक प्रकारच्या अटी व निकष यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी पात्र असूनही अपात्र ठरले होते. आता या निकषात बदल केल्यामुळे काही शेतकरी पात्र ठरतील. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतेही नैसर्गिक आपत्ती आल्यास जसे की पूर परिस्थिती निर्माण होणे तसेच अतिवृष्टी व गारपीट अशा वेळेस बाधित झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता केंद्र शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहेत. त्या निकषाच्या आधारे आपतग्रस्त व्यक्तींना नुकसान भरपाई चे वितरण करण्यात येत असते. Ativrushti Nuksan Bharpai Nikash

 

 

Ativrushti Nuksan bharpai 2022 चे वितरण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर निकषांमध्ये बदल केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी ग्रस्त नागरिकांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी दुप्पट रकमेने निधी वितरणाचा निर्णय घेतला आहे.

 

हे नक्की वाचा:- पीक विमा यादी 2022 जाहीर. आत्ताच तुमचे नाव चेक करा.

नुकसान भरपाई वितरणासाठी केंद्र शासनाचे निकष Nuksan Bharpai Maharashtra

केंद्र शासनाच्या निकषानुसार दोन हेक्टर जमीन धारणेच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई वितरित करण्याची तरतूद आहे. डोंगराळ शेत जमिनीवर साठवलेला मातीचा ढिगारा काढण्याकरिता तसेच मत्स्य शेती दुरुस्ती करण्याकरिता व शेत जमिनीतील गाळ काढण्याकरिता प्रतिहेक्टर 12,200 प्रमाणे भरपाई देण्याची तरतूद आहे. त्याकरिता संबंधित लाभार्थ्यांनी शासनाच्या या संबंधित योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्याचप्रमाणे जमीन खरडून जाणे, दरड कोसळने, जमीन खचणे तसेच जमीन वाहून जाणे इत्यादी बाबी करता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 37,500 रुपये मदत देण्याची तरतूद आहे. वरील मदत ही अल्पवअकल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंतच देण्यात येते. दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या निकषानुसार कोणताही लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे आता या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

 

 

नुकसान भरपाई वितरणाचे नवीन निकष Nuksan Bharpai 2022

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत जमिनीचे नुकसान झाल्यास बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Nuksan Bharpai Maharashtra)वितरित करण्याकरिता खालील प्रमाणे निकषांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा निधी वितरीत; याद्या जाहीर आत्ताच डाऊनलोड करा.

केंद्र शासनाच्या निकषानुसार दोन हेक्टर पर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद होती परंतु आता ती बदलून दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा किंवा आपत्तीग्रस्तांना सुद्धा आता लाभ मिळवता येणार आहे. त्यामुळे आता विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन धारणा असले तरी सुद्धा नुकसान भरपाई मिळवता येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या नुकसान भरपाई करता ई पीक पाहणीचा आधार घेण्यात येणार आहे.