प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहिती मराठी | Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) Information Marathi

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना(Pradhan Mantri Matru Vandana Yojana) ही केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना गरोदर मातांकरिता राबविण्यात येत आहे. योजना प्रसुती लाभ कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5000 रुपये इतकी राशी प्रदान करण्यात येत असते. योजना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत राबविण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा ? आवश्यक कागदपत्रे, या योजनेची वैशिष्ट्ये याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहिती मराठी | Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) Information Marathi
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना माहिती मराठी | Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) Information Marathi

 

 

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना- Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)

 

ही योजना सुरुवातीला वर्ष 2010 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती तेव्हा या योजनेचे नाव हे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना असे होते. ही योजना म्हणजे भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणारा प्रसुती लाभ कार्यक्रम आहे. त्यानंतर 2017 मध्ये या योजनेला पुनर्निर्मित करून या योजनेचे नाव हे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हे ठेवण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2022 ही राबवण्यात येत आहे.

 

 

आपला भारत देश हा विकसनशील देश आहे. आजही आपल्या भारत देशातील बऱ्याच स्त्रियांना त्या गरोदर असताना सुद्धा स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. गरोदरपणामध्ये काम करण्याची शारीरिक क्षमता नसताना सुद्धा त्यांना नाईलाजाने रोज मजुरी करावी लागते. त्यामुळे या महिला कुपोषित राहू शकतात, व त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नवजात बालकावर याचा परिणाम होतो. त्यामुळे अशा दारिद्र रेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील मातांना त्यांच्या आरोग्य सुदृढ राहावे तसेच त्यांच्या होणाऱ्या बालकांचे सुद्धा आरोग्य सुदृढ राहावे याकरिता प्रयत्न करण्यात येतात. त्याचप्रमाणे बालमृत्यूच्या दरात घट झाली पाहिजे याकरिता आपल्या संपूर्ण भारत देशात ही योजना राबविण्यात येत आहे. या Pradhan Mantri Matru Vandana Yojana अंतर्गत गरोदर महिलेला पाच हजार रुपये इतकी राशी ही प्रदान करण्यात येत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अटल पेन्शन योजना अंतर्गत मिळणार 5 हजार रुपये पेन्शन

 

 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना वैशिष्ट्ये

Pradhan Mantri Matru Vandana Yojana ही केंद्र शासन आणि राज्य शासन संयुक्त विद्यमानाने राबवित असते. या योजनेमध्ये 60 टक्के सहभाग हा केंद्र शासनाचा असतो तर 40 टक्के सहभाग हा राज्य शासनाचा असतो. योजना केंद्र शासनाच्या वतीने ज्या मार्गदर्शक सूचना तसेच निकष आणि कार्यपद्धती ठरवून देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे राबविण्यात येत असते.

 

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो:-

 

1. या योजनेअंतर्गत ज्या गर्भवती महिला आणि स्तनदा माता या आपल्या पहिल्या अपत्यासाठी  1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर गरोदर असतील या महिला या योजनेअंतर्गत पात्र असतील

2. या योजनेअंतर्गत एकदाच लाभ मिळवता येईल. म्हणजेच योजना पहिल्या अपत्यापुरतीच मर्यादित आहे. या योजनेअंतर्गत महिला एकाच बाळंतपनासाठी लाभ मिळवता येणार आहे.

3. या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेच्या वरील महिला लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

4. या योजनेअंतर्गत नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास तोपर्यंत म्हणजे त्या टप्प्यापुरताच लाभ हा वितरित करण्यात येतो.

 

 

हे नक्की वाचा:- विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र

 

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज प्रक्रिया, लाभ मिळण्याची प्रक्रिया

 

या Pradhan Mantri Matru Vandana Yojana अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर पात्र महिला लाभार्थ्यांना शासनाने अधिसूचित करण्यात आलेल्या संस्थेमध्ये नोंदणी करावयाची आहे. याकरिता तुम्ही गावातील अशा सेविकांना सुद्धा भेटू शकतात. त्या तुम्हाला विस्तृत माहिती सांगून तुमच्याकडून अर्ज भरून घेतील. त्यानंतर तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये 5 हजार रुपये इतकी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यात येते. जे खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येते.

 

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभ वितरण प्रक्रिया

या PMMVY योजने अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात 5000/- रुपयांची रक्कम तीन हप्त्यात जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता हा 1000 रुपयाचा असतो. हा पहिला हप्ता लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर जमा करण्यात येत असतो. योजनेअंतर्गत दुसरा हप्ता हा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर 2000 रुपयाचा हप्ता हा लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. या योजने अंतर्गत देण्यात येत असलेला तिसरा हप्ता सुद्धा 2000 रुपयाचा असतो. तो प्रसूतीनंतर आवश्यक ते सर्व लसीकरण पूर्ण केल्यानंतर जमा करण्यात येत असतो.

 

 

हे नक्की वाचा:- संजय गांधी निराधार योजना

 

 

त्याचप्रमाणे जर लाभार्थी महिलेची प्रसूती ही ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात झाल्यास 600 रू तसेच शहरी भागातील शासकीय रुग्णालयात झाल्यास 700 रू लाभ हा जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास वितरित करण्यात येत आहे.

 

 

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आवश्यक कागदपत्रे Documents For Pradhan Mantri Matru Vandana

 

या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना(PMMVY) अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

 

1. प्रपत्र 1 अ माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र व आधार संलग्न बँक/पोस्ट खात्याची माहिती

2. प्रपत्र 1 ब माता व बाल संरक्षण प्रमाणपत्रावर ए.एन.सी ची नोंद

3. प्रपत्र 1 क जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत व बाळाला लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद असलेले प्रमाणपत्र

4. या व्यतिरिक्त काही कागदपत्रे असल्यास ती आरोग्य केंद्रामार्फत सांगण्यात येईल.

 

 

या योजने अंतर्गत करावयाचा अर्ज हा आरोग्य केंद्रामार्फत मोफत वितरित करण्यात येतो. वरील सर्व कागदपत्रे ही सादर करून लाभ मिळवता येतो.