खरीप पिक विमा 2022 मंजूर; पिक विमा मंजूर यादी जाहीर | Pik Vima Manjur Yadi 2022 Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा 2022 हा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना आता खरिपाच्या पीक विम्याचे वाटप करणे सुरू झालेले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अमरावती जिल्हा विषयी अपडेट घेऊन आलेलो आहोत. अमरावती जिल्ह्यातील खरीप पिक विम्याच्या वाटपासाठी 80 मंडळ पात्र झालेले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील 80 मंडळातील पात्र पीक विमा धारकांना लवकर पिक विमा मिळत आहे. खरीप पिक विमा 2022 मंजूर झालेल्या महसूल मंडळाची माहिती जाणून घेणार आहोत, आजच्या या पोस्टमध्ये आपण खरीप पिक विमा 2022(Pik Vima Manjur Yadi 2022 Maharashtra) संदर्भातील अपडेट घेऊन आलेलो आहोत.

 

खरीप पिक विमा 2022 मंजूर; पिक विमा मंजूर यादी जाहीर | Pik Vima Manjur Yadi 2022 Maharashtra

 

 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पिक विमा अंतर्गत पिक विमा नुकसान भरपाई(pik vima manjur yadi 2022) मिळावी याकरिता ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या महसूल मंडळांना तात्काळ पिक विमा मंजूर करावा या संदर्भातील अधिसूचना अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी काढलेली आहे. त्यामुळे आता अतिवृष्टीमुळे ज्या महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्यांना आता खरीप पिक विमा 2022 मिळणार आहे. पिक विमा मंजूर यादी 2022,pik vima manjur yadi 2022,पीक विमा 2022 यादी महाराष्ट्र,पीक विमा 2022 यादी

 

महत्वाचं अपडेट: नवीन पिक विमा यादी संपूर्ण जिल्ह्यांची जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा

 

अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन पिवळे पडले होते सोयाबीन या पिकांची वाढ खुंटली होती परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्याच प्रमाणावर प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई आता पिक विमा मार्फत मिळणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी पिक विमा(pik vima yadi 2022 maharashtra) कंपनीची प्रतिनिधी शेतकऱ्यांची प्रतिनिधी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ त्याचप्रमाणे तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतलेली होती. यामध्ये अशी निर्देशनात आली की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पीक नुकसानीचा अहवाल व अधिसूचना ही जाहीर केलेली आहे. kharip pik vima 2022 maharashtra list

 

 

पिक विमा मंजूर यादी डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.

जिल्हाधिकारी यांनी पिक विमा(kharip pik vima 2022 maharashtra list) कंपनीला नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पीक विम्याची नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरिपाचा 2022 चा पिक विमा काढलेला होता आणि त्यांचे महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली होती अशा बाधित शेतकऱ्यांना आता लवकरच खरीप पिक विमा 2022 हा वितरित होणार आहे. Pik Vima Yadi 2022, Kharip Pik Vima Yadi

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना लाभार्थी यादी जाहीर 

 

ज्या शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त घट असेल तर त्या शेतकऱ्यास 25% पिक विमा हा अग्रीम स्वरूपात देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नुकसान हे 50 टक्के पेक्षा जास्त झालेले आहे अशा शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ पिक विमा मिळणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेली 25 टक्के रक्कम ही अंतिम रक्कम मध्ये समाविष्ट करण्यात येत असते.

 

 

खरीप पिक विमा 2022 कुणाला मिळणार? pik vima manjur yadi 2022

अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा खरीप पिक विमा 2022 मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 80 महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादक बाधित शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022 निधी मिळणार आहे.

पिक विमा मंजूर संपूर्ण जिल्ह्यांची यादी डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.

पिक विमा मंजूर यादी 2022 Pik Vima Manjur Yadi 2022

अमरावती जिल्ह्यातील एकूण 80 महसूल मंडळांना पिक विमा मिळणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील १२ मंडळांना खरीप पिक विमा मिळणार आहे. त्याचप्रमाणे चिखलदरा तालुक्यातील ६ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ८ महसूल मंडळांना खरीप पिक विमा मिळणार आहे. चांदूरबाजार मधील ७ महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भातकुली तालुक्यातील ६ मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे व मोर्शी मधील ६ मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे. अचलपूर ६ मंडळांना खरीप पीक विमा मिळणार आहे. त्याच प्रमाणे धामणगाव रेल्वे ७ महसूल मंडळांना खरीप पीक विमा मिळणार आहे. वरुड ७ महसूल मंडळे, चांदूर रेल्वे मधील ५ महसूल मंडळांना तर तीवसा तालुक्यातील ५ महसूल मंडळाचा समावेश आहे तसेच धारणी मधील ५ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.