शेतकरी मित्रांनो पिक विमा योजना अंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकाचा पिक विमा काढत असतात. पिक विमा कंपनीकडे शेतकरी त्यांच्या हिश्यावर येणारी प्रीमियमची रक्कम भरत असतात. जर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई करिता दावा दाखल करावा लागत असतो. त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणी करतात. आपल्या महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 24 लाख सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहेत. त्यापैकी 94 हजार सूचनांसाठी 34 कोटी 46 लाख रुपयांची पिक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे ही रक्कम पिक विमा नुकसान भरपाई म्हणून वितरित करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा नुकसान भरपाई रक्कम मिळणार आहे. Pik Vima Yojana Maharashtra Nuksan Bharpai
या शेतकऱ्यांना मिळणार 34 कोटींची पिक विमा नुकसान भरपाई | Pik Vima Yojana Maharashtra Nuksan Bharpai |
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वर्ष 2022 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्याच अनुषंगाने पिक विमा कंपनीकडे शेतकरी बांधवांनी पिक विमा नुकसान भरपाई चे दावे दाखल केलेले होते. 24 लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलेले आहे. आणि उर्वरित शेतकऱ्यांची लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे सर्वेक्षण झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. आणि उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी याकरिता सुद्धा कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच 34 कोटी रुपयांचा पिक विमा मिळणार आहे. Pik Vima Nuksan Bharpai 2022 Maharashtra
34 कोटी पिक विमा नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
शेतकरी मित्रांनो पिक विमा कंपनीच्या नियमानुसार जर एखाद्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याला नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करावा लागत असतो. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे क्लेम केलेला आहे, अशा पात्र शेतकरी बांधवांना 34 कोटी रुपये पिक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. pik vima nuksan bharpai list maharashtra, pik vima nuksan bharpai list 2022 maharashtra
या कारणांमुळे पिक विमा नुकसान भरपाई मिळत असते
शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेताचा पिक विमा(Pik Vima Yojana Maharashtra) काढल्यानंतर केवळ अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपल्याला पिक विमा नुकसान भरपाई मिळते असे नाही तर गारपीट, विज कोसळणे किंवा नैसर्गिक आग लागणे तसेच ढगफुटी होणे किंवा भूस्खलन होणे या कारणांमुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान झाल्यास शेतकरी हा पिक विमा कंपनीकडून पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र असतो. फक्त शेतकरी बांधवांनी पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्याकरिता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची दावे दाखल करणे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी झाल्यानंतर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळते. Pik Vima Nuksan Bharpai Yadi Maharashtra, Pik Vima Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra
महत्वाचे अपडेट:- 50,000 अनुदान योजना नवीन यादी आली, लगेच डाऊनलोड करा
प्रधानमंत्री पिक विमा योजने(Pik Vima Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत आत्तापर्यंत शेतकरी बांधवांनी खरिपाचा पिक विमा करिता पिक विमा कंपन्याकडे 656 कोटी रुपये भरलेले आहे. त्यानंतर राज्य सरकार त्यांचा हप्ता भरते आणि केंद्र सरकार त्यांचा हप्ता भरते. ही सर्व रक्कम एकत्रित करून पिक विमा कंपनीला दिली जाते, त्यानंतर पिक विमा कंपन्या नुकसान भरपाईच्या दाव्यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई वितरित करत असतात.
त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच 34 कोटी रुपये इतका पिक विमा वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शेतकऱ्याला किती पिक विमा मिळणार यासंबंधी सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच याद्या सुद्धा प्रसिद्ध नाहीत, परंतु पिक विमा वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
पिक विमा नुकसान भरपाई संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशीच माहिती वेळेवर हवी असल्यास या वेबसाईटवर भेट देत राहा.