शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(Nanaji Deshmukh krishi sanjivani yojana) म्हणजेच पोखरा योजना ही राबविण्यात येत आहे. जे शेतकरी या पोखरा योजनेअंतर्गत लाभ मिळवू इच्छित होते, किंवा पोकरा योजनेअंतर्गत त्यांनी अर्ज केला होता, परंतु पोखरा योजनेचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नव्हती, अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने पोखरा योजना 2022 करिता अनुदान वितरित केलेले आहे. त्यामुळे पोखरा (Pocra Yojana 2023 Maharashtra) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणे सुरू झालेली आहे.
पोक्रा योजना 2022 निधी वितरित; अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा | Pocra Yojana 2022 Nidhi Vitarit |
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत पोखरा योजना सन 2022-23 करिता अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करण्याचे आदेश दिलेले आहे. योजना वर्ष 2022 23 मध्ये राबवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. पोखरा योजना निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Nanaji Deshmukh krishi sanjivani yojana
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोखरा योजना अंतर्गत 200 कोटी रुपयांचा निधी हा खालील बाबींकरिता वितरित करण्यात येत आहे. पोखरा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये ठिबक सिंचन, वैयक्तिक शेततळे, फळबाग लागवड योजना, इलेक्ट्रिक मोटर खरेदी अनुदान योजना, डिझेल पंप खरेदी अनुदान योजना इत्यादी तर शेतकरी गटांसाठी कृषी प्रक्रिया उद्योग, तसेच मृदा व जलसंधारणाची कामे अशा अनेक बाबींकरिता अनुदानित करण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023, Pocra Yojana 2022 Maharashtra
हे नक्की वाचा:- खरीप पीक विमा 2023 पाहिजे असल्यास, हे काम नक्की करा
यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोखरा योजना 2021- 22 राबवण्याकरिता सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला होता. त्याचप्रमाणे पोखरा योजना 2022 23 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेऊन योजनेची कामे पूर्ण केलेली असेल, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोखरा(Pocra Yojana Maharashtra) योजनेचा निधी तात्काळ जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील हवामान बदलास अति संवेदनशील असलेल्या 5142 गावांमध्ये ही पोखरा योजना(Pocra 2023 Maharashtra) राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील आणि विदर्भातील गावांचा समावेश या पोखरा(Pocra 2023 Maharashtra) योजनांमध्ये करण्यात आलेला आहे. योजना सहा वर्षाकरिता राबवण्यात येणारा आहे. आणि या योजनेअंतर्गत जवळपास चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हे नक्की वाचा:- या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मंजूर केले; 755 कोटी रुपये
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक योजने करिता लाभ देण्यात येतो तसेच शेतकरी गटांना लाभ देण्यात येतो. पोखरा योजना(Pokhara Yojana Maharashtra) ही जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील गावांमध्ये राबविण्यात येत आहे. ज्या गावांचा समावेश हा पोकरा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्या गावातील शेतकऱ्यांना पोखरा योजने(Pocra Yojana) अंतर्गत विविध योजनांकरिता लाभ देण्यात येत आहे. पोखरा योजनेअंतर्गत विहीर अनुदान योजना, शेततळे, पंपसंच, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर अशा प्रकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे.
त्यामुळे आता या योजनेअंतर्गत अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. लवकरच निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. पोखरा योजने संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईटवर भेट देत राहा.