नवरात्र उत्सव मराठी माहिती; नवरात्रीचे महत्व व पौराणिक कथा | Navratri Information In Marathi

 

आपल्या भारत देशत अनेक प्रकारचे सण उत्सव साजरे करण्यात येत असतात. श्रावण महिना सुरू झाल्यापासून अनेक हिंदू सण येत असतात. श्रावण महिना हा सणांचा महिना असतो त्या महिन्यापासून आपल्या हिंदू सणांना सुरुवात होते. आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव हा एक महत्त्वपूर्ण सण आहे, नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. नवरात्री उत्सव नऊ दिवस चालतो. आपल्या अनेक हिंदू सण आणि उत्साहाने पैकी नवरात्री या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नवरात्री उत्सव मराठी माहिती व नवरात्रीचे महत्व त्याचप्रमाणे नवरात्रीची पौराणिक कथा? याविषयी विस्तृत माहिती (Navratri Information In Marathi) जाणून घेणार आहोत.

 

नवरात्र उत्सव मराठी माहिती; नवरात्रीचे महत्व व पौराणिक कथा | Navratri Information In Marathi
नवरात्र उत्सव मराठी माहिती; नवरात्रीचे महत्व व पौराणिक कथा | Navratri Information In Marathi

 

 

 

नवरात्री म्हणजे काय? Navratri Information In Marathi

नवरात्री(Navratri) चा संस्कृत भाषेत नऊ रात्री असा अर्थ होतो. नवरात्री उत्सव हा दुर्गा मातेचा उत्सव असतो. नवरात्री मध्ये दुर्गा माता चे आपल्या पृथ्वीवर नऊ दिवसासाठी आगमन होत असते. नवरात्री हा उत्सव संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात येतो. Navratri 2022 in Marathi

 

 

 

नवरात्री 2022 माहिती मराठी  Navratri 2022 Information in Marathi

आपण साजरा करत असलेल्या इतर सणांपेक्षा शारदीय नवरात्री या सणाला खूप महत्त्व प्राप्त आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने शारदीय नवरात्रौत्सव ( Navratri In Marathi) साजरा करीत असतो. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्री उत्सवामध्ये(Navratri Information Marathi) अनेक जण उपवास पकडतात. त्याचप्रमाणे काही जण नऊ दिवस चप्पल घालत नाही. नऊ दिवस मोठ्या आनंदाने दुर्गा मातेची पूजन करतात. नवरात्र मध्ये असणाऱ्या नऊ दिसायला खूप महत्व आहे. या दिवसांना माळ असे म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या नऊ माळी असतात. प्रत्येक महिला प्रत्येक दिवसाला वेगळा रंग असतो. नवरात्रीच्या नऊ दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात. नवरात्री(Navratri) हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वपूर्ण असा उत्सव आहे. Navratra 2022 in Marathi, Navratri Mahiti,नवरात्र उत्सव मराठी माहिती

 

 

नवरात्र उत्सव 2022 तारीख Navratri Festival 2022 Date

नवरात्र उत्सव 2022(Navratra Festival 2022) हा 26 सप्टेंबर 2022 ला सुरू होत आहे, आणि 05 ऑक्टोबर 2022 ला नवरात्री उत्सव 2022 समाप्त होणार आहे. नवरात्री उत्सव नऊ दिवस चालत असतो. दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असते.

 

 

हे नक्की वाचा:- घटस्थापना 2022 माहिती मराठी

 

नवरात्रीचे महत्त्व Importance Of Navratri in Marathi

आता आपण नवरात्रीला(Navratri) असलेले महत्त्व  जाणून घेत आहोत. नवरात्र हा सण भारतीय सणांपैकी महत्त्वपूर्ण असा सण आहे. त्यापैकी शारदीय नवरात्र हा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात येतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मोठमोठे मंडप टाकण्यात येतात देखावे सादर करण्यात येतात, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दुर्गा मातेने महिषासुर या अक्षराचा वध केला होता. तसेच दुर्गा मातेचे पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील खराब काळ नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत शुभ दिवस असतात. या दिवसांमध्ये देवीची पूजन करणे उपासना करणे देवीच्या नावाचा जप करणे हे आपल्याला लाभदायक ठरते. आपल्या देशात अनेक काळापासून नवरात्र हा सण साजरा करण्यात येत आहे. Importance Of Navratri In Marathi

 

 

 

नवरात्र(Navratra Mahiti Marathi) उत्सवामुळे महाराष्ट्रातील शक्तिपीठांना सुद्धा खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे अनेक भक्त देवींचे दर्शन घेण्याकरिता या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. दुर्गा माता पृथ्वीवर नऊ दिवस राहतात आणि दहाव्या दिवशी दुर्गा माता च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. नवरात्रीच्या नऊ दिवसांना सुद्धा खूप महत्त्व आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी म्हणजेच नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या दिवशी आपण दुर्गा मातेच्या वेगळ्या रूपाची पूजा करत असतो. Shardiya Navratri, Navratri Mahiti In Marathi

 

 

नवरात्री माळ:-

नवरात्र उत्सव(Navratra) हा 9 दिवसांचा असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ माळी असतात. म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला पहिली माळ म्हणतात. अश्या 9 माळी असतात. नवरात्रीच्या नववा दिवस म्हणजे नववी माळ होय. प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ कलर असतात. त्याच प्रमाणे आपण नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो. जसे की पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी ची पूजा करतो. तर दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी ची पूजा केल्या जाते तर चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी ची पूजा तर सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करण्यात येते तर सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करण्यात येते तर आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री या देवीची पूजा करण्यात येते. Navratri 2022 Mahiti Marathi, Navratri 2022 Information Marathi

 

 

हे नक्की वाचा:- जाणून घ्या; यावर्षीचे नवरात्रीचे नऊ कलर  लिस्ट तारखे सहित!

 

 

नवरात्र पौराणिक कथा  Navratri Story in Marathi

मित्रांनो आपल्या प्रत्येक हिंदू सणांमध्ये कोणती ना कोणती पौराणिक कथा असते. आपल्या प्रत्येक हिंदू सणाला कथा आहे. आणि केव्हापासून हे सण आपल्या पृथ्वीवर साजरे करण्यात येत आहेत. आता आपण Story Of Navratri In Marathi जाणून घेणार आहोत.

 

 

महिषासुर नावाचा एक राक्षस म्हणजेच दैत्य होता. हा महिषासुर राक्षस दैत्य जरी असला तरी सुद्धा तो ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते, त्याने ब्रह्मदेवाला वरदान मागितले होते. पृथ्वीवर वास्तव करणारा अस्तित्वात असणारा कोणताही मानव, देव किंवा मनुष्य किंवा दानव यापैकी कोणीही महिषासुराला मारू शकणार नाही असे वरदान हे महिषासुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून मागितले होते. आता महिषासुराला हे वरदान प्राप्त झाल्यामुळे त्याला कोणीही मारू शकणार नाही म्हणून त्याने पृथ्वीवर तसेच स्वर्गात आणि पातळावर खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता, महिषासुर या राक्षसाने जिकडे तिकडे हाहाःकार माजवला होता. या राक्षसाला पृथ्वीवरील तसेच इतरही ठिकाणावरील सर्व लोके घाबरू लागली. महिषासुराची दहशत आता वाढतच गेली होती. त्यामुळे आता महिषासुर या राक्षसाचा वध करण्याकरिता कुणीही सामोरे जात नव्हते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांनी दुर्गा मातेला महिषासुराचा वध करण्यासाठी साकडे घातले होते. तेव्हा दुर्गा मातेने नऊ दिवस महिषासुरासी लढाई केली त्यानंतर दहाव्या दिवशी महिषासुराचा दुर्गा मातेने वध केला. त्यामुळे दुर्गा मातेला  ‘महिषासुर मर्दिनी’ असेही म्हणतात. त्यामुळे आपण नऊ दिवस वाईट गोष्टींची लढा देण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत असतो. ज्याप्रमाणे मा दुर्गा ने महिषासुराचा वध केला, त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट विचारावर वाईट कृत्यावर विजय मिळवण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा करत असतो. नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची मनाभावातून पूजा केल्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदते.

 

अशाप्रकारे महिषासुराच्या वधापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण दरवर्षी आनंदाने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करीत असतो.

 

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे?

 

नवरात्र पूजा विधी | Navratri Puja Vidhi

नवरात्र उत्सव हा घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होत असतो. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये घटस्थापना करण्यात येते. दुर्गा मातेचे आगमन झाल्यानंतर दुर्गा मातेची पूजा करण्यात येते, दुर्गामाता ही ऊर्जा आणि शक्तीची देवता आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यात येते. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवातील नऊ दिवसांना नऊ माळी असे म्हणतात. नवरात्र उत्सवात नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्यात येत असतात. दुर्गा माते समोर फळ आणि फुल ठेवण्यात येत असते. आरती आणि भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो.

 

 

 

नवरात्री उत्सव कसा साजरा करतात How Navratri is celebrated

नवरात्र उत्सव(Navratra Utsav) हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वपूर्ण असा मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येत असते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करून देवीची पूजा करण्यात येत असते. नवरात्र हा सण खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे तसेच देखाव्यांचे आयोजन करण्यात येत असते. आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या आकाराचे मंडप बांधण्यात येत असतात.

 

नवरात्र उत्सवामध्ये गरबा आणि दांडिया हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळण्यात येत असतो. नवरात्रीच्या वेळी देवीच्या मंडपामध्ये संध्याकाळच्या वेळी सर्वजण मिळून आणि मिसळून हा खेळ मोठ्या उत्साहात खेळत असतात. विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. त्यामध्ये पहिला नंबर येणाऱ्यास बक्षीस वितरण करण्यात येत असते.

 

 

दुर्गा माता चे 9 अवतार कोणते आहेत?

दुर्गा माता चे 9 आवतार हे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री हे आहेत.

 

 

भारतातील नवरात्रीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

कोलकत्ता

 

महाराष्ट्रात नवरात्रीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

यवतमाळ

 

भारतात नवरात्रीसाठी प्रसिद्ध राज्य कोणते?

गुजरात

 

अश्या प्रकारे संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने नवरात्री हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण नवरात्री Navratri 2022 संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती इतरांना देखील शेअर करा.