नवीन मतदान कार्ड असे काढा ऑनलाईन फ्री मध्ये | New Voter ID Card Apply Online

 

मित्रांनो आपल्याला मतदान करण्याकरिता मतदान कार्ड(Matdan Card) म्हणजे वोटर कार्ड ची आवश्यकता असते. जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असेल आणि अजून पर्यंत तुम्ही मतदान कार्ड काढले नसेल तर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरून मतदान कार्ड करिता अर्ज करू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण नवीन मतदान कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रोसेस(Online Application Process for New Voter Card) जाणून घेणार आहोत.

 

नवीन मतदान कार्ड असे काढा ऑनलाईन फ्री मध्ये | New Voter ID Card Apply Online
नवीन मतदान कार्ड असे काढा ऑनलाईन फ्री मध्ये | New Voter ID Card Apply Online

 

मित्रांनो भारत सरकारने काही वर्षांपूर्वी डिजिटल इंडिया मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत सर्व कामेही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपला भारत देश हा डिजिटल साक्षर झाला पाहिजे या उद्देशाने अनेक प्रकारची शासकीय कामे शासकीय सुविधा हे आता ऑफलाइन पद्धतीने न करता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आता मतदान कार्ड करण्याची सुविधा सुद्धा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मतदान कार्ड(Matdan Card Online) आपण ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरू शकतो त्याचप्रमाणे मतदान कार्डचा उपयोग मतदान करण्याकरिता होतो.New Voter ID Card Apply Online

मतदान काढण्याकरिता तुमची अठरा वर्षे पूर्ण झालेली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण भारतीय नागरिक असायला पाहिजे. मतदान कार्डची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेली आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला मतदान कार्ड संबंधित सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने करता येत आहेत.New Voter ID Card Apply Online

हे नक्की वाचा:- व्यवसायासाठी कर्ज योजना, ऑनलाईन अर्ज सुरू

मतदान कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. The following documents are required to apply Voter card online.

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. अर्जदाराची बँक खाते
3. अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर
4. ड्रायव्हिंग लायसन्स
5. पासपोर्ट आकाराचा फोटो

वरील कागदपत्रे मतदान कार्ड(Matdan Card) काढण्याकरिता आवश्यक आहेत, तसेच मतदान कार्ड काढणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा. तसेच त्याचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.

हे नक्की वाचा:- रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? 

मतदान कार्ड करिता ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस How to Apply For Voter Card Online

मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.Matdan Card Online Kase Kadhave?.

1. सर्वप्रथम तुम्हाला Voter Portal च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. www.nvsp.in  या वेबसाईटवर जा.
2. आता तुम्हाला या फोटोवर नोंदणी करायची आहे त्यासाठी तुम्ही नवीन वापर करता म्हणून नोंदणी करून घ्यावी. तुमचा ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाकून तुम्ही नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे.
3. आता तुम्हाला तुमची माहिती द्यावयाची आहे. जसे की तुमचे आडनाव तुमचे राज्य आणि लिंग ही माहिती प्रविष्ट करा.
4. आता आपल्याला नवीन मतदान कार्ड(Matdan Card) करिता अर्ज करायचा असल्यामुळे New Voter Registration या पर्यायावर क्लिक करा.
5. जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान कार्ड काढत असाल तर त्या ठिकाणी Yes, I applying for the first time हा पर्याय निवडा.
6. त्यानंतर होय मी भारतीय नागरिक आहे या पर्यायावर क्लिक करा.
7. आता आपण मतदान काढून टाकत असलेल्या जन्म तारखेची तपासणी करण्याकरिता आपल्याला कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करावे लागते. तर आपण आधार कार्ड,पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावे.
8. आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये ज्यांच्याकडे मतदान कार्ड आधीपासून असेल त्यांची माहिती द्यावयाची आहे.
9. त्या व्यक्तीचे नाव आणि आडनाव तसेच वोटर आयडी नंबर त्या व्यक्तीची तुमच्या सोबत असलेले नाते हे सिलेक्ट करून घ्या. आणि सेव करून कंटिन्यू करा.
10. आता आपल्याला ऍड्रेस तपासणी करण्याकरिता खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आपण रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, लाईट बिल इत्यादी पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. ते अपलोड करून घ्या.
11. आता तुम्ही भरलेला फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला असेल जर त्यामध्ये तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल तर एडिट वर क्लिक करून डिलीट करू शकतात. जर सर्व माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट बटन वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर मतदान कार्ड करिता नवीन अर्ज यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल.

हे नक्की वाचा:- घरकुल योजना यादी 2022-23 यादी जाहीर

 

अश्या प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड करिता नवीन अर्ज करू शकतो. ही पद्धत अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. मोबाईल वरून सुद्धा आपण अर्ज करू शकतो. मतदान कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातील ही माहिती इतरांना नक्की शेअर करा.