शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 अर्ज सुरू | Sharad Pawar Gram Samruddhi Yojana Arj Suru

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने “शरद पवार ग्राम समृद्धी योजना” ही राबविण्यात येत आहे. ही Sharad Pawar Gram Samruddhi Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 योजना ह्या राबविण्यात येत आहे. शरद पवार ग्राम योजना ही 3 फेब्रुवारी 2021 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवण्याकरिता नवीन शासन निर्णय काढून मान्यता देण्यात आलेली होती. आणि आता पुन्हा एकदा ही Sharad Pawar Gram Samruddhi Yojana सुरू करण्यात आलेली आहे.

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 अर्ज सुरू | Sharad Pawar Gram Samruddhi Yojana Arj Suru
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 अर्ज सुरू | Sharad Pawar Gram Samruddhi Yojana Arj Suru

 

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 अंतर्गत खालील वैयक्तिक लाभाच्या 4 योजनाचा समावेश हा करण्यात आलेला आहे.

 

1. गाय म्हैस पालन शेड योजना

2. शेळी पालन शेड योजना

3. कुक्कुट पालन शेड योजना

4. नाडेप कंपोस्टिंग योजना

 

वरील रोजगार हमी(rojgar hami yojana-manarega) योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या चार योजनाचा लाभ हा या योजने अंतर्गत देण्यात येत आहे.

 

 

हे नक्की वाचा:-:शेळी पालन शेड बांधकाम योजना अर्ज सुरू

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत मिळणारे अनुदान

 

1. गाय म्हैस पालन शेड योजना:- 

या गाय म्हैस पालन शेड योजना अंतर्गत गाय म्हैस करिता गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 2 ते 6 गुरे असल्यास 77,188 रुपये पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. गुरे ही 6 ते 12 आल्यास अनुदान हे दुप्पट मिळते, गुरे ही 12 ते 18 असल्यास अनुदान हे तिप्पट मिळणार आहे.

 

2. शेळीपालन शेड बांधकाम योजना:-

या शेळीपालन शेड बांधकाम योजना अंतर्गत 2 ते 10 शेळ्या साठी 49,284 अनुदान देण्यात येणार आहे. शेळ्या जर 10 ते 20 असल्यास अनुदान दुप्पट मिळते, तसेच शेळ्या ह्या 30 आल्यास तिप्पट अनुदान या योजने अंतर्गत देण्यात येणार आहे.

 

3. कुक्कुटपालन शेड बांधकाम योजना:-

या कुक्कुटपालन शेड बांधकाम योजना अंतर्गत 99 कुक्कुट  पक्षासाठी 49, 760 रुपये पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. जर पक्षी यापेक्षा जास्त असल्यास अनुदान जास्त.

 

4. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग योजना:-

या भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग योजना अंतर्गत कंपोस्ट खत तयार करण्यात येत असते, शेतातील कचरा एकत्र करण्यात येऊन त्यापासून नाडेप कंपोस्टिंग युनिट बनविण्यात येत असते. या योजने अंतर्गत 10,537 रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येत आहे.

 

 

 

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया?

 

या Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2023 अंतर्गत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  या योजने अंतर्गत तुम्हाला ग्राम पंचायत मध्ये विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे. आम्ही खाली दिलेल्या लिंक वर या योजने अंतर्गत करावयाचा अर्ज हा डाऊनलोड करून घ्या. त्यांनतर तुम्हाला त्या अर्जातील विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज तुमच्या ग्राम पंचायत मध्ये सादर करायचा आहे. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे मनरेगा चे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. अर्ज केल्या नंतर तुम्हाला पोच पावती सुद्धा देण्यात येते.

 

 

हे नक्की वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट भेट देत चला.