पी एम किसान योजना चे 2000 रू आले का असे करा चेक | Pm Kisan Yojana Installment Check Online

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना देण्यात येणारे सन्मान निधीची 2000 ₹ तुमच्या बँक खात्यात आली की नाही, हे आपण अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकतो. शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आत्तापर्यंत दोन हजार रुपयांचे अकरा हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 2 हजार रुपये मिळवत असाल तर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आले किंवा नाही, ते चेक करता आले पाहिजे.

पी एम किसान योजना चे 2000 रू आले का असे करा चेक | Pm Kisan Yojana Installment Check Online
पी एम किसान योजना चे 2000 रू आले का असे करा चेक | Pm Kisan Yojana Installment Check Online

 

Pm kisan yojna अंतर्गत मिळणारे पैसे आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतो. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आता लवकरच बाराव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. जर तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजना च्या यादी मध्ये नाव असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र आहात. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आलेली असेल.

हे नक्की वाचा:- पी एम किसान योजना या तारखेला येणार 12 वा हप्ता

पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत गावानुसार पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ह्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे. त्या यादी मधील तुमचे नाव चेक करण्याची लिंक या पोस्टमध्ये खाली दिलेली आहे.

हे नक्की वाचा:- पी एम किसान योजना अशी करा ई केवायसी ऑनलाईन घरबसल्या

pm kisan yojana अंतर्गत आता ई केवायसी करणे बंधनकारक असल्यामुळे, सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान योजना ई केवायसी पूर्ण केलेली आहे किंवा नाही ते चेक करून घ्या. आता इथून पुढे पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत पुढील हप्ते मिळवण्याकरिता ई केवायसी बंधनकारक असल्याने ज्यांची kyc पूर्ण आहे अशाच लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 2000 रुपये आले की नाही, ते चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.