ई पीक पाहणी विमा भरताना सक्तीची नाही | E Pik Pahani 2022 Important Upadte

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात खरीप पीक विमा 2022 चे अर्ज सुरू आहेत. त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या मनात एक विषय हा खूप संभ्रमात होता. तो म्हणजे ई पीक पाहणी ( E Pik Pahani ). विमा भरताना ई पीक पाहणी करावीच लागेल, अथवा विमा भेटणार नाही, पीक विमा भरण्याच्या आधी ई पीक पाहणी करावी लागते, नाहीतर पीक विमा भेटणार नाही अशा बातम्या शेतकऱ्या पर्यंत आलेल्या होत्या. त्यामुळे सर्व शेतकरी हे ई पीक पाहणी विषयी चिंतेत होते. ई पीक पाहणी (E Pik Pahani) बऱ्याच लोकांनी अजून केलेली नाही. परंतु आता या ई पीक पाहणी (e pik pahani) बातम्या ला पूर्ण विराम भेटला आहे. राज्याचे कृषीआयुक्त धीरज कुमार यांनी पीक विमा अर्ज करताना ई पीक पाहणी (E Pik Pahani) सक्तीची नसल्याचे कळविले आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. e Pik Pahani 2022 important update

 

 

ई पीक पाहणी विमा भरताना सक्तीची नाही | E Pik Pahani 2022 Important Upadte
ई पीक पाहणी विमा भरताना सक्तीची नाही | E Pik Pahani 2022 Important Upadte

 

 

Table of Contents

 

ई पीक पाहणी 2022(E Pik Pahani 2022 Maharashtra) :-

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात तहसीलदारांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्या संदर्भात नोटीस ह्या जारी करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये ई पीक पाहणी केल्या शिवाय पीक विमा अर्ज करू नये. अथवा पीक विमा भेटणार नाही. अश्या माहिती आपल्या शेतकऱ्या समोर आलेल्या होत्या, त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा अर्ज केव्हा करावा , ई पीक पाहणी विमा भरण्याच्या आधी करावी की नंतर या विषयी संभ्रम होता. त्यामुळे या ई पीक पाहणी संदर्भात अनेक तक्रारी शेतकरी बांधवांनी कृषी विभाग यांना केल्या होत्या. त्यामुळे आता जर तुम्ही पीक विमा अर्ज करणार असाल तर करून घ्या पीक पाहणी नंतर केली तरी सुद्धा चालेल.

 

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर

 

 

ई पीक पाहणी संदर्भात नवीन अपडेट:-

 

आता pik vima अर्ज करताना ई पीक पाहणी करणे सक्तीचे नाही.E Pik Pahani 2022. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषीआयुक्त धीरज कुमार यांनी प्रेस नोट काढली आहे, त्या प्रेस नोट मध्ये असे नमूद आहे की, पीक विमा अर्ज करण्यासाठी ई पीक पाहणी करणे सक्तीचे नाही. शेतकरी आधी पीक विमा काढू शकतात. नंतर ई पीक पाहणी ( E pik pahani) करू शकतात. या निर्णयामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की ई पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांनी अद्याप पीक विमा भरलेला नव्हता.

 

तसेच खरीप पीक विमा योजना ची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही जवळ येत होती. पीक विमा अर्ज हे 31 जुलै पर्यंत करता येणार आहे. त्यामुळे अंतिम तारीख जवळ आली की पीक विमा ची वेबसाईट ही स्लो चालते. त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा भरणे होईल की नाही, या विषयी काळजी होती.

 

 

 

 ई पीक पाहणी 2022 अंमलबजावणी कधी पासून होणार आहे:-

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात E pik pahani project 2022 ची सुरुवात ही 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सध्या ई पीक पाहणी संदर्भात कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना पिक विमा भरायचा असेल, त्यांनी पीक विमा अर्ज करून घ्यायचा आहे. शेतकरी बांधवांनी पीक विमा योजना स्वघोषणा पत्र जोडून पीक विमा अर्ज करायचा आहे. आणि ज्या वेळेस ई पीक पाहणी करणे सुरू होईल, त्यावेळेस ई पीक पाहणी करून घ्यायची आहे.

 

 

 

ई पीक पाहणी करताना आणि पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची दक्षता:-

 

जर तुम्ही पीक विमा अर्ज केला असेल किंवा करणार असाल तर, तुम्ही ज्या प्रमाणे पीक विमा अर्ज केला त्याच प्रमाणे ई पीक पाहणी करा. म्हणजेच ई पिक पाहनी ( E pik pahani) आणि पीक विमा भरलेले पीक व शेतातील पीक हे साम्य असावं लागणार आहे. जर असे नसेल तर पीक विमा क्लेम करताना तुम्हा अडचण जाऊ शकते. जर तुम्ही ई पीक पाहणी केलेलं पीक आणि विमा भरलेले पीक यामध्ये तफावत दिसून आल्यास शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यापासून वंचित ठेवल जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ई पीक पाहणी मध्ये आणि पीक विमा मध्ये सारखेच पीक टाका.

 

 

 

हे नक्की वाचा:- पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू

 

 

त्यामुळे जर तुम्ही आधीच पीक विमा अर्ज केला असेल तर, तुम्ही तुमच्या पीक विम्यात ज्या क्षेत्रात ज्या पिकांचा समावेश केला सेम त्याच पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करताना तीच पिके ई पीक पाहणी मध्ये नमूद करा. त्यामुळे तुम्हाला पीक विमा क्लेम करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. परंतु ई पीक पाहणी ही करावीच लागणार आहे.

 

 

मित्रांनो अशा करतो की, ई पीक पाहणी संदर्भातील ही अपडेट आवडली असेल, ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.