शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त | Big Decision of Shinde- Fadnavis Government Maharashtra

 

मित्रांनो महाराष्ट्रात नुकतेच शिंदे – फडणवीस सरकार आलेले आहेत. आणि या Shinde- Fadnavis Government Maharashtra ने नुकतेच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणारे काही निर्णय घेतलेले आहे. हे निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितलेले आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले तसेच डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याच प्रमाणे इतर ही काही महत्वपूर्ण अशी निर्णय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले आहे. त्याविषयी विस्तृत माहिती आपण आता खाली पाहणार आहोत.

 

 

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त | Big Decision of Shinde- Fadnavis Government Maharashtra शिंदे सरकार निर्णय Shnide government Maharashtra
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त | Big Decision of Shinde- Fadnavis Government Maharashtra

 

 

 

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस(Devendra Fadnavis) सरकारने घेतलेला सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे.(cm eknath shinde and devendra fadnavis press conference reduces tax on petrol and diesel) पेट्रोलवर (Petrol) लागणाऱ्या एकूण Vat ( value added tax)  मध्ये ₹5 ची कपात केली तर डिझेल (Diesel) वर लागणाऱ्या एकूण Vat ( value added tax)  मध्ये 3 रुपयांची कपात केलेली आहे. त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्याने सरकारी तिजोरीवर ६००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण जनतेसाठी आणखीन असे बरेच काही निर्णय घेणार आहोत असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितलेले आहे.(Petrol and Diesel rates reduces in Maharashtra)

 

 

हे नक्की वाचा:- महा विकास आघाडी सरकार कोसाळण्यापूर्वी घेतला होता, हा महत्वपूर्ण निर्णय

 

यापूर्वी देशातील केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यावेळी केंद्राने सर्व राज्य सरकारांना आवाहन केले होते की त्यांनी राज्यांमार्फत लावण्यात येणारा कर कमी करावा. आणि पेट्रोल डिझेलचा दरात कपात करून(Reduces Tax On Petrol And Diesel) सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. परंतु त्यावेळेस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारची कपात  करण्यात आलेली नव्हती. परंतु आज आमच्या सरकारने केंद्र सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद घेऊन आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये बोलले होते.

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहे. Big Decision of Shinde- Fadnavis Government Maharashtra :-

 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 

 

1. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आलेली आहे

2. आपल्या महाराष्ट्र राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 राबवण्यात येणार आहे

3. नगर परिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेमधून होणार आहे.

4. केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान योजना 2.0 आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे.

5. आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ही आता थेट जनतेमधून होणार आहे.

6. बाजार समित्यांमध्ये शेतकरी बांधवांना थेट मतदानाचा अधिकार

7. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा कालावधी हा तीन महिन्यांपर्यंत वाढविण्यात आलेला आहे.

8. आणीबाणीच्या काळात ज्या व्यक्तींनी तुरुंगवास भोगला, अशा लोकांना पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे.

 

 

हे नक्की वाचा:- स्वयंपाकाचा घरगुती गॅस सिलेंडर महागला

 

ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment