मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासकीय वस्तीगृहे चालविण्यात येत असतात. यालाच आपण Government Hostel किंवा समाज कल्याण होस्टेल असे नाव आहे. शासकीय समाज कल्याण हॉस्टेलकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज आता सुरू झालेले आहे. Government Samaj kalyan hostel Admission 2022 विषय संपूर्ण प्रोसेस आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समाज कल्याण हॉस्टेल करिता अर्ज कसा करायचा? कागदपत्रे, पात्रता याविषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
शासकीय समाज कल्याण हॉस्टेल ऑनलाईन अर्ज सुरू | Government Samaj kalyan hostel Online Admission 2022 |
मित्रांनो समाज कल्याण च्या होस्टेलमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करायचा असतो. यापूर्वी समाज कल्याण हॉस्टेल मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येत होते. परंतु आता Samaj Kalyan Hostel Admission 2022 करिता अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या गव्हर्मेंट होस्टेलमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. Samaj kalyan hostel Admission information Marathi. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मुलांचे तसेच मुलींची शासकीय वस्तीगृह आहेत. या वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाल्यानंतर मोफत राहण्याची तसेच जेवणाची सोय त्याचप्रमाणे निर्वाह भत्ता, ड्रेस कोड, स्टेशनरी, जिम, लायब्ररी अशा अनेक फॅसिलिटी या मोफत पुरवण्यात येत असतात. Government Samaj kalyan hostel Online Admission 2022,samaj kalyan hostel admission form online 2022-23
समाज कल्याण हॉस्टेल ऑनलाईन अर्ज कसा करायचा How to apply for Social Welfare Government Hostel online
मित्रांनो यावर्षीची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या शासकीय वस्तीगृहांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना Government Hostel Maharashtra मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी खालील लिंक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. Samaj Kalyan hostel online application process, Government Hostel Maharashtra Online Application Process
http://www.hostel.mahasamajkalyan.in या लिंक करून विद्यार्थ्यांना होस्टेलमध्ये ऍडमिशन घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन पूर्ण करून नंतर उर्वरित प्रोसेस पूर्ण करायची आहे.samaj kalyan hostel online application form
समाज कल्याण हॉस्टेल अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अभ्यासक्रम Samaj Kalyan Hostel Admission Form Online 2022-23 Last Date
1. शालेय विद्यार्थी – अंतिम तारीख दि.17.07.2022 पर्यंत
2. इ.10 वी 11 वी नंतरचे विद्यार्थी :- अंतिम तारीख दि.30.07.2022 पर्यंत
3. पदवी नंतरचे पदव्युत्तर,पदवी,पदवीका- अंतिम तारीख दि.24.08.2022 पर्यंत
4. व्यावसायिक अभ्यासक्रम- अंतिम तारीख दि.30.09.2022 पर्यंत
समाज कल्याण वस्तीगृहामध्ये अर्ज करताना लक्षात ठेवायच्या बाबी:-
समाज कल्याण हॉस्टेल मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी(How to Apply For Samaj Kalyan Hostel Online) नवीन लेटेस्ट गुगल क्रोम ब्राउझर चा वापर करावा.
ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी गुणदान पद्धतीमध्ये ग्रेड सिस्टम असेल त्यांना संबंधित शाळेमध्ये जाऊन ग्रेडचे रूपांतर हे अंकामध्ये म्हणजेच मार्क करून आणायचे आहे. व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ज्या वस्तीगृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहात त्या वस्तीगृहामध्ये असलेल्या रिक्त जागांचा तपशील पाहून घ्यावा. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम व अटी शर्ती विद्यार्थ्यांनी वाचून घ्याव्या.
समाज कल्याण वस्तीगृहात प्रवेश कोणत्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतो:-
Government Samaj Kalyan Hostel
विद्यार्थी आठवी त्याचप्रमाणे अकरावी त्याचप्रमाणे पदवी आणि पदविका म्हणजेच बीए, बी कॉम, बी एस सी सारखे कोर्स मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्याचप्रमाणे बऱ्याच कोर्समध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळत असल्यामुळे थेट द्वितीय वर्षांमध्ये ऍडमिशन केलेल्या मुलांना सुद्धा प्रवेश मिळतो.