आजच्या या पोस्ट मध्ये आपण एका महत्वपूर्ण अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ते विषय म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा, या पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, लायसन्स संबंधित इतर कामे जसे लायसन्स renew करणे, वाहनाची नोंद अशा अनेक गोष्टी साठी आपल्याला आरटीओ ऑफिस वर चकरा माराव्या लागत असे, परंतु आता ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित अनेक सेवा या ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या करता येणार आहे. परिवहन विभागाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सेवांविषयी माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आता ड्रायव्हिंग लायसन संबंधित सर्व कामे होणार घरबसल्या ऑनलाईन | Driving licence Services online
|
परिवहन विभागाच्या ड्रायव्हिंग लायसन्स Driving licence संबंधित 115 सेवा पैकी 80 सेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अरे वन विभागाच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स(driving licence), ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल (driving licence renewal), ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये दुरुस्ती(driving licence correction), ड्राइंग लायसन मध्ये पत्ता बदलणे, आरसी बुक, अशा अनेक महत्त्वपूर्ण अशा कार्यासाठी आता आपल्याला परिवहन प्राधिकरणाच्या आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. या सेवा पूर्वी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पुरविण्यात येत होत्या. यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये खूप चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता या सेवा ऑनलाईन पद्धतीने करता येत असल्यामुळे आपला वेळ तसेच पैसा वाचणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांनी या सेवांचे लोकार्पण केले आहे. Driving licence information in Marathi, driving licence service get online
हे नक्की आहे- Fastag काय आहे? संपूर्ण माहिती
परिवहन प्राधिकरणामार्फत घेण्यात आलेल्या या महत्वपूर्ण अशा निर्णयामुळे आता आपण ड्रायव्हिंग लायसन्स बसल्या काढू शकतो, तसेच लायसन रिन्यू करणे, लायसन मधील ॲड्रेस बदलणे, duplicate लायसन बनवणे अशा सेवा आता आपण घरबसल्या वापरू शकतो. त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स संबंधीचे अनेक व्यवहार हे पारदर्शक आणि सहज रित्या होणार आहे.
यापूर्वी केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित ११५ सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि आता आपल्या राज्याचे परिवहन मंत्री यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा 6 सुविधा ऑनलाईन सुरू केलेले आहे. या सेवेमध्ये पारदर्शकता यावी याकरिता या सेवा आधार कार्ड सोबत जोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील जवळपास 20 लाख लोकांना फायदा होणार आहे.Online application process for driving licence
हे सुद्धा वाचा;- Google Pay काय आहे , अकाऊंट कसे ओपन करावे?
ज्यांना परिवहन विभागाच्या ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित या गोष्टींसाठी अर्ज करायचा असेल ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या मध्ये अर्जदार हा ऑनलाईन अर्ज करणे, पेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु शकतो. त्या करिता आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड सोबत जे मोबाईल नंबर लिंक आहे, त्या नंबर वर otp येतो. तो तुम्हाला अर्ज करताना प्रविष्ट करावा लागतो. Otp verify झाल्या नंतर पुढील प्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे आता अशा महत्वपूर्ण कामांसाठी आता आरटीओ ऑफिस वर जाण्याची आवश्यकता नाही. घरूनच अर्ज करून तुम्ही घरबसल्या या सेवांचा लाभ घेऊ शकतात. ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज केल्या नंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हे पोस्टाने तुमच्या घरी पाठवले जाईल.
मित्रांनो अश्या पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित अनेक सेवांचा लाभ तुम्ही ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतात. जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती साठी आमच्या वेबसाईट ला आवश्य भेट देत चला.