आजच्या या पोस्ट मध्ये आपण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वट सावित्री पौर्णिमा या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपण या पोस्ट च्या माध्यमातून वट पौर्णिमा विषयी माहिती आपल्या मराठी भाषेतून जाणून घेणार आहोत. या मध्ये वट पौर्णिमा केव्हा आणि कधी आहे. वट पौर्णिमा का साजरी केली जाते? तसेच वट पौर्णिमा महत्व तसेच वट पौर्णिमा साजरी करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य या विषयी संपूर्ण माहिती साठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
वट पौर्णिमा 2022 माहिती मराठी | Vat Savitri Purnima mahiti marathi |
वट पौर्णिमा च्या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. आपल्या पती च्या दीर्घायुष्यासाठी पूजा करून मागणी करतात. वट पौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते. असे मानले जाते की, खरतर ही वट पौर्णिमा 3 दिवस असते. आपल्याकडील महिला ह्या वट पौर्णिमा च्या दिवशी पूजन करतात. तर चला पुढे आपण वट पौर्णिमा का साजरी केली जाते या विषयी माहिती पाहूया. Vat purnima information in Marathi
वट पौर्णिमा का साजरी केली जाते?:-
वट पौर्णिमा च्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, कारण सावित्रीने तिच्या पतीची सेवा ही वडाच्या झाडाखाली केली होती, आणि सत्यवानाला त्याचे आयुष्य हे यमदेवांनी परत दिले होते. त्यामुळे या वट पौर्णिमा दिवशी सुवासिनी महिला या वटाच्या झाडाची मनाभवातून पूजा करतात. आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासठी मागणी करतात.
हे नक्की वाचा:- गुरू पौर्णिमा 2022 माहिती मराठी
वटपौर्णिमा 2022 कधी आहे? Vat Savitri purnima 2022 :-
वट सावित्री पौर्णिमा 2022 खालील तारखेला आहे.
वट सावित्री पौर्णिमा 2022 ही १४ जून २०२२ रोजी आहे.
वट पौर्णिमा प्रारंभः १३ जून २०२२ रोजी उत्तर रात्री ९ वाजून ०३ मिनिटे.
वट पौर्णिमा समाप्तीः १४ जून २०२२ रोजी सायं. ०५ वाजून २२ मिनिटे
वट पौर्णिमा कश्या प्रकारे केली जाते?:-
वटपौर्णिमा ही महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण समजण्यात येते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि तिच्या पती ला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करत असतात. वटपौर्णिमेच्या दिलेल्या कालावधीत सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच वडाच्या झाडाला धागा बांधत असतात. आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. वर्षा 2022 मध्ये 14 जून रोजी वट सावित्री पौर्णिमा आहे. 14 जून रोजी मंगळवार आहे. वटपौर्णिमा हा स्त्रियांसाठी एक महत्त्वपूर्ण असा सण आहे. Vat paurnima mahiti marathi
हे नक्की वाचा:- इंटरनेट म्हणजे काय? संपूर्ण माहिती
वडाच्या झाडाच्या पारंब्या असतात त्या खूप वर्ष अस्तित्वात असतात आणि त्या मजबूत असतात. वडाचे झाड एक खूप मोठे आव्हान ठरले असल्यामुळे त्या वडाच्या झाडाखाली खूप सूक्ष्मजीव जगत असतात. तसेच वडाचे झाड हे इतर झाडांपेक्षा जास्त वर्षे अस्तित्वात राहत असते. त्यामुळे वडाच्या झाडाची एक वेगळेच महत्त्व आहे. वडाच्या झाडाच्या पूजे प्रमाणेच वडाच्या झाडांचे संरक्षण सुद्धा केले पाहिजे. हा या वटपौर्णिमा मागचा उद्देश आहे.