गुरु पौर्णिमा 2022 माहिती मराठी Guru Paurnima 2022 Mahiti Marathi

 

गुरु पौर्णिमा माहिती आणि महत्व(guru purnima in marathi) गुरु पौर्णिमा 2022 माहिती आणि महत्व Guru Paurnima 2022 Mahiti Marathi आपली भूमी ही संतांची भूमी आहे. आपल्या देशा मध्ये गुरु ला ब्रह्मा, विष्णु, महेश म्हणजेच देवांची उपमा दिली जाते. आपल्या जीवनात चांगला गुरू लाभणे हे एक चांगले कर्म समजण्यात येते. गुरू आपल्याला जीवनात प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करत असतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण गुरु पौर्णिमा 2022(Guru Paurnima 2022 mahiti marathi) पाहणार आहोत. गुरू पौर्णिमा हा एक महत्वपूर्ण असा सण आहे.Guru Paurnima information Marathi गुरु म्हणजे अशी व्यक्ती जी दगडा सारख्या माणसाला मूर्ती बनविण्याचे कार्य करते.

 

गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:

गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:

 

guru paurnima marathi speech information of guru purnima in marathi guru purnima marathi bhashan guru purnima information in marathi गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा भाषण गुरु पौर्णिमा sms गुरु पौर्णिमा माहिती गुरु पौर्णिमा मराठी गुरु पौर्णिमा 2022
गुरु पौर्णिमा 2022 माहिती आणि महत्व Guru Paurnima 2022 Mahiti Marathi

 

 

Table of Contents

 

संपूर्ण भारत देशामध्ये ‘गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ या पवित्र महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा हा सण साजरा केला जाते. आपण ज्या भारत भूमीत राहतो त्या भारत संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरू पौर्णिमे च्या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये गुरु चे पूजन केले जाते. आपल्या भारत देशामध्ये अनेक शासकीय तसेच खाजगी शाळा, college आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा ही मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी केली जाते. गुरू पौर्णिमा 2022 माहिती मराठी,गुरू पौर्णिमा माहिती मराठी

 

 

 

गुरू पौर्णिमेचा इतिहास काय आहे (Guru Purnima History In Marathi)

 

(गुरु पौर्णिमा माहिती मराठी)आपण साजरी करत असलेल्या गुरु पौर्णिमा चा इतिहास हा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. गुरू पौर्णिमा लाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. कारण फार वर्षा पूर्वी महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले होते. आणि हे वेेेद आताही आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात. आपली भारतीय संस्कृती ही समृद्ध संस्कृती आहे. या संस्कृतीला अनेक महान गुरु लाभले आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये व्यासांना आद्यगुरू असे समजले जाते. व्यासांनी महाभारत हा ग्रंथ लिहीला आहे. व्यासांनी लिहिलेल्या महाभारतातून त्यांनी धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन आपल्याला घडवून आणले आहे. त्या मुळे व्यास यांना महत्व प्राप्त झाले आहे. तिथीनुसार गुरू पौर्णिमा हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे गुरु पौर्णिमा या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. guru purnima in marathi म्हणूनच गुरू पौर्णिमा या दिवशी व्यासपूजन देखील करण्यात येत असते.(guru purnima quotes in marathi)

 

 

कधी आहे गुरूपौर्णिमा(Guru Purnima 2022 Date)गुरु पौर्णिमा 2022

गुरु पौर्णिमा 2022 ही आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला ‘गुरूपौर्णिमा’ साजरी केली जाते. या वर्षी ‘13 जुलै’ ला बुधवार या दिवशी गुरूपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.(guru purnima 2022)

 

 

हे नक्की वाचा:- रक्षाबंधन 2022 माहिती मराठी

 

 

 

गुरूपौर्णिमेचे महत्त्व (Importance of Guru Purnima In Marathi)

 

guru purnima marathi speech

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु ला अनन्य साधारण महत्त्व आहे.  भारत देशामध्ये शाळा, कॉलेज, या मधील शिष्य गुरु पौर्णिमा या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. गुरू आपल्याला वर्षभर ज्ञान देत असतात. गुरूंकडून वर्षभर मिळालेल्या ज्ञाना मुळे शिष्य घडत असतात. गुरू हे साक्षात ईश्वराचे रूप आहे. ज्या शिष्याची गुरू विषयी आदर भावना असते. त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होत असते. शिष्य नेहमी गुरूंनी शिष्याला दिलेले ज्ञान हे सतत च्या दैनंदिन जीवनात अमलात आणत असतात. त्या मुळे आपल्याला आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे एक प्रकारे भाग्याचं लक्षण समजलं जातं. कारण ज्याच्या ज्यांच्या आयुष्यात गुरू असतो त्यांना त्याच्या गुरूकडून जीवनात चांगल्या तसेच वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्यासाठी बळ मिळत असत. त्यामुळे शिष्य नेहमी गुरूंच्या कृपाशीर्वादाने आपली प्रगती करत राहतात. एकंदरीतच गुरु मुळे त्यांच्या शिष्याचे आयुष्य घडत असते. त्यामुळे गुरू हा आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात.

 

गुरूपौर्णिमा हा सण साजरा करण्याचा उद्दिष्ट (Guru Purnima in marathi)

guru purnima 2022 

गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’( गुरु आपल्याला नेहमी मार्ग दाखवत असतात) आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश होय. गुरू कडून जे ज्ञान मिळत असते त्या मिळालेल्या ज्ञानाने शिष्याचे जीवन हे प्रकाशमय होत असते. एकंदरीत च गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जीवनामध्ये सर्वांच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे आपली ‘आई’ होय. आई आणि बाबा हे आपले सर्वात पहिले गुरु असतात. आपल्या आयुष्यात सर्वात पहिली संगत ही आपल्याला आईची लाभते. आणि आपली आई ही आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. आई ही प्रथम गुरु आहे. कारण आई ही आपल्याला सर्व प्राथमिक गोष्टी शिकवत असते. एवढेच नाहीतर आई ही आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. म्हणजेच ज्यांच्या कडून आपल्याला ज्ञान भेटते, ज्यांच्या कडून आपल्याला मार्गदर्शन मिळत असते, जे आपल्याला योग्य दिशा दाखवतात त्यांना आपण गुरु म्हणू शकतो. या मुळेच भारतात गुरूपौर्णिमा ही आजही मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे.

 

 

 

गुरुपौर्णिमा माहिती मराठी (Guru Purnima Information In Marathi)

 

भारत देशामध्ये (guru purnima in marathi) ‘गुरूपूजन’ करण्याची पद्धत आहे. आता आपल्या मना मध्ये नेमके गुरुपुजन म्हणजे काय असते हा प्रश्न निर्माण झाला असेल. गुरूपूजन म्हणजे गुरूंची पूजा करणे. परंतु गुरूपूजन म्हणजे केवळ गुरूची पूजा करणे अथवा गुरूला वाकून नमस्कार करणं इतकेच महत्वाचे नाही. गुरु पौर्णिमा मध्ये नमस्कार करणे अथवा गुरूंचा आदर राखणे हे जरी महत्त्वाचं असलं तरी सुधा हे खरं गुरूपूजन नक्कीच मानण्यात येणार नाही. कारण खऱ्या गुरूला दिखाव्याची कधीच गरज भासत नसते.आपला गुरु हा आपल्या पेक्षा लहान ही असू शकतो. जो आल्याला चांगले मार्गदर्शन करतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो तो आपला गुरु असतो. एकंदरीतच गुरूपूजनाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या गुरूने आपल्याला दिलेलं ज्ञान हे आत्मसात करणं. (guru purnima in marathi)तसेच जे ज्ञान गुरूंकडून मिळवलेलं ते स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं. कारण गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे च आपलं आयुष्य हे यशस्वी होत असते. म्हणजेच सतत गुरू बद्दल प्रामाणिक,कृतज्ञ असणं होय. या भावनेतून आपल्या गुरूंची सतत सेवा आणि आदर करणं म्हणजे खरं गुरूपूजन.पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या आई वडील जे आपले पहिले गुरू आहेत. त्यांना एक जबाबदार मुलगा असल्याची जाणीव करून देऊन. त्यांचे विचार आत्मसात करून, आणि त्यांचे आपल्याकडून जे मागणे आहे ते पूर्ण करून एक प्रकारे त्यांची पूजा केली पाहिजे. असे केल्यास आपल्या गुरु ला खरी गुरु दक्षिणा मिळेल. व आपण एक प्रामाणिक शिष्य म्हणून आचरणात राहाल.  गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

 

गुरूचे कार्य काय आहे

गुरूचे कार्य हे अत्यंत महान कार्य आहे. गुरूने नेहमी शिष्यांच्या भल्याचा विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक शिष्य आपल्या गुरु वर डोळे बंद करून विश्वास ठेवत असतो. त्यामुळे गुरूंनी आपल्या शिष्याला नेहमी चांगले ज्ञान देऊन त्यांना आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून वावरता येईल असे तयार केले पाहिजे.

 

 

 

गुरु प्रती शिष्याची वागणूक कशी असावी

आपल्या गुरु कडून मिळालेले ज्ञान हे शिष्याला आयुष्यभर कमी पडत असते. त्यांच्या शिकवणीतून शिष्य घडत असतात. त्यामुळे शिष्याने नेहमी गुरु चा आदर केला पाहिजे. आणि गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. Guru Paurnima 2022 information in marathi गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करून त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपल्या गुरूंना त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करून खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतो.

 

 

 

गुरू व शिष्याचे आदर्श उदाहरण 

आपल्याला आदर्श गुरु व शिष्य यांचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतील त्या पैकी काही महत्त्वपूर्ण उदाहरणे

आपल्या भारत देशामध्ये प्राचीन काळापासून गुरू-शिष्य ही परंपरा आहे. (information of guru purnima in marathi)अर्जून- द्रोणाचार्य, कृष्ण-अर्जुन, एकलव्य- द्रोणाचार्य, चाणक्य- चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे आपल्या भारतीय संस्कृतीत सापडतात. (गुरु पौर्णिमा 2022)असे म्हटले जाते की, अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता की त्याच्या अंगातील केसांमधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येत असे. त्यामुळेच भगवान श्री कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पाच पांडवांचा विजय झाला. त्यामुळे जर आपल्याला चांगला गुरु लागला तर आपण आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्या गुरुप्रमाणे चांगले कार्य करू शकतो. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला महत्त्व आहे.

 

आपल्या सर्व मराठी बांधवांना गुरू पौर्णिमेच्या(Guru Purnima 2022) हार्दिक शुभेच्छा. आपल्या गुरू प्रती आपण निष्ठा बाळगून आणि त्यांच्या विषयी आदर नेहमी मनात बाळगून आपण आपल्या गूरूना खऱ्या अर्थाने गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतो. Guru Paurnima 2022 विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अशाच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

 

 

आमचे इतर लेख:- 

 

कोणाचीही तक्रार ऑनलाईन कशी करायची

 

माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज कसा करायचा