या वर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी बांधवांसाठी बाईची योजना असेल त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना संबंधी सुद्धा अनेक निर्णय घेण्यात आलेले आहे. दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत कर्जमुक्ती पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची ठरविण्यात आलेले आहे. Shetkari karj mafi yojna maharashtra, Mahatma jyotirav fule shetkari karj mafi yojana
आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा होता. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत उर्वरित सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचा लाभ देण्यासाठी अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे असे सांगण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यातील 54 हजार शेतकऱ्यांना तब्बल 200 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत करण्यात येणार असलेली कर्जमाफी ही मार्च महिन्याच्या शेवट पर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्ज परत फेड करत होते अश्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर राशी म्हणून देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती
आता या आपल्या राज्यातील कर्जमाफी योजनेपासून वंचित असलेले शेतकरी यांना दिलासा मिळालेला आहे. आता महाराष्ट्र राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच 200 कोटी रुपये इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. shetakari karj mafi maharashtra
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत राज्यातील 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर 20 हजार 250 कोटींचा अतिरिक्त भार पडला होता. त्यामुळे उर्वरित 54 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी ची प्रक्रिया रखडलेली होती. तसेच इतर नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर राशी म्हणून देण्यात येणार होते. हे सुद्धा रखडले होते. त्यामुळे आता या वर्षीच्या अर्थसंकल्पात उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर राशी देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- obc कर्ज योजना संपूर्ण माहिती
अश्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना कर्ज माफी योजना अंतर्गत लाभ देण्याचे ठरवले आहे.