महाराष्ट्र शासनाच्या वतीने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना हे सुरू केलेली आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांकडे नऊ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. संध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट आहे त्यामुळे महावितरण ला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तसेच या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केलेली आहे. या योजने अंतर्गत वीज पुरवठा खंडित असणाऱ्या महावितरणच्या वीज ग्राहकांना 1445 कोटी रुपयांची वीज सवलत मिळत आहे.
विलासराव देशमुख अभय योजना काय आहे | Vilasrao Deshmukh Abhay Yojana
|
महावितरण च्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच प्रमाणे महावितरणची ग्राहकांकडे असणारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महावितरण ची आर्थिक परिस्थिती ही दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे महावितरण ला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ग्राहकांकडे असलेले थकित रकमेची वसुली करणे कठीण काम झाले आहे. महावितरण ची ग्राहकांकडे एकूण थकबाकी ९ हजार ३५४ कोटी रुपये इतकी झाली आहे.
विलासराव देशमुख अभय योजना उद्देश:-
या योजनेमुळे ग्राहकांकडून थकबाकी वसूल होईल त्यामुळे थकबाकी वसूल झाल्यामुळे महावितरण कडे पैसा आल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारेल. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांचा घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे बंद झालेली व्यवसाय तसेच उद्योग पुन्हा चालू होईल त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास होईल तसेच लाखो लोकांना रोजगार मिळेल. याच उद्देशाने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहेत.
विलासराव देशमुख अभय योजना कालावधी:-
या विलासराव देशमुख अभय योजना चा कालावधी हा १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे.
विलासराव देशमुख अभय योजना लाभ कोण कोण घेऊ शकतो:-
विलासराव देशमुख अभय योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असेल. परंतु ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. या योजनेअंतर्गत लाभ हा कृषी ग्राहकांना घेता येणार नाही. उर्वरित सर्व लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
vilasrao deshmukh abhay yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी थकबाकीदार असलेल्या ग्राहकांना त्यांच्या असलेल्या थकबाकीची रक्कम ही एकाच वेळेस म्हणजेच एक रक्कम भरावी लागेल. तेव्हा या ग्राहकांना त्यांच्या थकबाकी वर असलेले व्याज व विलंब आकार हे संपूर्ण माफ करण्यात येईल. जर ग्राहकांनी एकरकमी रक्कम भरल्यास त्यांना अतिरिक्त सवलत देण्यात येईल.