पी एम किसान मानधन योजना आता दरमहा मिळणार 3 हजार रुपये, अशी करा नोंदणी | PM Kisan Mandhan Yojana

 

 

आपल्या देशातील केंद्र तसेच राज्य सरकार देशातील गरीब व गरजू लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. जेणेकरून या योजनांचा देशातील गरीब लोकांना फायदा होऊन त्या योजनांच्या माध्यमातून लोकांना त्यांचा विकास करता यावा. आजच्या या लेखा मध्ये आपण अशाच एका योजने विषयी माहिती पाहणार आहोत. Pm kisan mandhan yojana information in Marathi

 

पी एम किसान मानधन योजना आता दरमहा मिळणार 3 हजार रुपये, अशी करा नोंदणी | PM Kisan Mandhan Yojana

 

 

आजच्या या लेखा मध्ये आपण केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या PM Kisan Mandhan Yojana विषयी माहिती पाहणार आहोत. ह्या योजने अंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना प्रत्येक महिन्याला मानधन देण्यात येत आहे. ही योजना देशातील शेतकऱ्यांना  जेव्हा त्या शेतकऱ्याचे वय हे थकून जाते, म्हणजे जेव्हा शेतकऱ्याचे वय 60 वर्षे होते तेव्हापासून या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मानधन मिळणे सुरू होते.

 

 

 

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, आपल्या देशातील जवळपास ५५ ते ६०  टक्के इतकी लोकसंख्या ही  शेतीवर अवलंबून आहे. शेती हा प्राथमिक उद्योग आहे.    ग्रामीण भागातील लोकसंख्या ही जास्तीत जास्त शेती करत असतात. आणि या ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या वाढत्या वयात एक निश्चित पेन्शन मिळावे या उद्देशाने ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. आपल्या देशातील केंद्र सरकारच्या अंतर्गत ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या PM Kisan Mandhan योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 36 हजार रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये दिले जातात.

 

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल न मिळाल्यास अशी करा तक्रार

 

पीएम किसान मानधन योजनेची (PM Kisan Mandhan Yojana ) पात्रता :-

PM Kisan Mandhan Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील पात्रता असावी लागते.

१) या PM Kisan Mandhan Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय हे १८ वर्षे आणि ४० वर्ष पर्यंत वय असणारे शेतकरी पात्र असतात.

 

२) या योजने अंतर्गत सर्व छोटे आणि अत्यल्प शेतकरी लाभ घेऊ शकतात. 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी या योजने अंतर्गत मासिक पेन्शन मिळविण्यासाठी पात्र असतात.

 

३) या योजने अंतर्गत देण्यात येत असलेले पेन्शन फक्त कुटुंबातील पती किंवा पत्नीला लागू होईल.

 

 

 

 

पीएम किसान मानधन योजना लाभ मिळविण्यासाठी (PM Kisan Mandhan Yojana ) साठी किती पैसे भरावे लागतात:-

या पीएम किसान मानधन योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला दरमहा काही रक्कम भरावी लागते. ही रक्कम वय 60 वर्षे येईपर्यंत शेतकऱ्यांना भरावी लागते. ही रक्कम 55 ते 200 रुपयांपर्यंत भरावी लागते. वयाच्या 18 व्या वर्षी 55 रुपये आणि वयाच्या 40 व्या वर्षी 200 रुपये भरावे लागतील.

 

 

हे नक्की वाचा:- शेळी मेंढी गाई म्हशी व कुकुट पालन योजना सुरू 

 

 

पी एम किसान मानधन योजना(PM Kisan Mandhan Yojana registration) नोंदणी कशी करायची:-

PM Kisan Mandhan Yojana registration करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा csc सेंटर ला भेट द्या. त्या नंतर csc सेंटर वर तुमचा अर्ज भरून घ्या त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करा. तुमच्या बँक अकाऊंट ची माहिती द्या. तुमच्या अर्जासोबत तुमचे आधार कार्ड लिंक करून घावे लागेल. नंतर अर्ज केल्या नंतर तुम्हाला या योजने अंतर्गत पेन्शन खाते क्रमांकावर किसान कार्ड हे देण्यात येणार आहेत. How to apply for pm Kisan Mandhan Yojana

हे नक्की वाचा:- महा ग्रामीण बळीराजा तारणहार योजना

जर तुम्हाला csc सेंटर वर जाऊन नोंदणी करायची नसेल किंवा तुमच्या जवळपास csc सेंटर नसेल तर तुम्ही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर जा आणि या योजने अंतर्गत स्वतः अर्ज करू शकतात.

 

अश्या प्रकारे आपण पी एम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) अंतर्गत लाभ घेऊन प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळवू शकतात.

 

 

 

Leave a Comment