आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा सतत च्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेला आहे, आणि अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना ही सुरू केली आहे. Mahagramin Baliraja Taranhar Yojana
या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या Mahagramin Baliraja Taranhar Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या थकित कर्जावर व्याज मध्ये सवलत ही देण्यात येणार आहे.
जानेवारी २०२२ पासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत आकर्षक व्याजात सवलत देण्यात येणार आहे.
हे सुध्दा वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना
“ महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना” योजना 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यत सुरू राहणार आहे. ही योजना दिलेल्या कालावधी पर्यंतच सुरू राहणार आहे. या “महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना” मुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. या योजने मुळे शेतकरी कर्ज मुक्त होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोअर सुद्धा सुधारण्यास मदत होणार आहे.
ही योजना मर्यादीत काळातच सुरू राहणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत या योजने चा लाभ सर्व खातेदार शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहेत.
या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना मध्ये ज्यांचे कर्ज हे थकित आहे, अशा थकीत कर्ज व्याजात ६० ते ७५ टक्के अशी घसघसीत सूट देण्यात येणार आहे तसेच त्याचे थकीत कर्ज परतफेड
महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत राबविल्या या “ महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना” योजनेचे वैशिष्ट म्हणजे थकीत कर्ज व्याजात ६० ते ७५ टक्के अशी घसघसीत सूट देण्यात येणार आहे . तसेच ज्या थकित कर्ज दाराने त्याचे थकीत कर्ज परतफेड केल्यावर त्यांना नवीन कर्ज देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- वृध्द कलाकार मानधन योजना
निश्चितच ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत राबविण्यात येत असलेली एक खूप महत्वपूर्ण योजना आहे Mahagramin Baliraja Taranhar Yojana. महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना” ही शेतकरी बांधवांना एक संजीवनी देणारी योजना आहे. ही योजना पारदर्शक पणे राबविण्यात येत आहे. जे कर्ज दार थकित आहे अशे शेतकरी या योजने अंतर्गत लाभ घेऊन कर्ज मुक्त होऊ शकतात.
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जवळच्या बँक शाखेस संपर्क करून या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.