वृद्ध कलाकार मानधन योजना काय आहे? | vrudh kalakar mandhan yojana कसा करायचा अर्ज

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील संस्कृती ही वारकरी संप्रदायातील संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फार पूर्वी पासूनच भजन, कीर्तन या गोष्टी अस्तित्वात आहे. आपला महाराष्ट्र राज्य हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांच्या पावन स्पर्श आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील कलावंताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मानधन देण्यात येणार आहे.

वृद्ध कलाकार मानधन योजना काय आहे? | vrudh kalakar mandhan yojana कसा करायचा अर्ज,vrudh kalakar mandhan yojana

 

आजच्या या लेखा मध्ये आपण वृद्ध कलाकार मानधन योजना काय आहे? | vrudh kalakar mandhan yojana कसा करायचा अर्ज याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक , किर्तनी व्यक्ती, गोंधळी, आराधी , तमाशा, साहित्यिक, गायक , वादक, कवी तसेच लेखक आहेत अशा विविध कला क्षेत्रात काम करणारे लोक आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत, अशा वृद्ध कलाकार, महिला, विधवा, दिव्यांग कलाकार यांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने वृध्द कलाकार मानधन योजना (vrudh kalakar mandhan yojana) अंतर्गत ग्रामीण भागातील कलाकारांना मासिक 2250 रुपये इतके मानधन या वृध्द कलाकार मानधन योजना अंतर्गत देण्यात येणार आहेत. तसेच राज्य स्तरावरील कलाकारांना 2700 रुपये या वृध्द कलाकार मानधन योजना अंतर्गत देण्यात येणार आहेत.

हे सुध्दा वाचा:- मिशन वात्सल्य योजना काय आहे?

ही वृध्द कलाकार मानधन योजना(vrudh kalakar mandhan yojana) आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय विभाग मुंबई यांच्या हस्ते राबविण्यात येत आहे.

 

 

वृध्द कलाकार मानधन योजना अर्ज कसा करायचा (vrudh kalakar mandhan yojana arj):-

या वृध्द कलाकार मानधन योजना साठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागते. शासनाने यासाठी मुदत तसेच अर्ज हे ठरवून दिले होते, परंतु आत्ता पर्यंत जास्त अर्ज म्हणजे अपेक्षित असेल एवढे अर्ज प्राप्त झाले नाही. म्हणून या vrudh kalakar mandhan yojana ला सन 2021-22 या वर्षासाठी वृध्द कलावंताचे अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.

हे नक्की वाचा:- कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५०,००० रुपये मदत असा करा अर्ज

तरी ज्यांनी अजून पर्यंत वृध्द कलाकार मानधन योजना साठी अर्ज केला नसेल अशा आपल्या महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक व वृध्द कलावंतानी दिनांक 15 जानेवारी 2022 पर्यत अर्ज हे गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.

 

 

 

वृध्द कलाकार मानधन योजना निकष, अटी , पात्रता व कागदपत्रे:-

या वृध्द कलाकार मानधन योजना साठी अर्ज करताना वृध्द कलावंताना अर्ज परिपूर्ण भरलेला स्वाक्षरीसह अर्ज असावा लागतो. ही वृध्द कलाकार मानधन योजना ही वृध्द लोकांसाठी असल्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय हे 50 वर्षा पेक्षा जास्त असावे लागते. वृध्द कलाकार मानधन योजना साठी अर्ज करायचा असल्यास तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असले पाहिजे आणि त्यावर 48 हजार रुपये पर्यंतच उत्पन्न हे नमूद असावे. Vrudh kalakar mandhan yojana साठी अर्ज करायचा असल्यास जन्म तारखेचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला/वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र) असावे लागते. अर्ज करण्यासाठी कोणत्या गावचे रहिवासी आहेत या बाबतचे रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागते.

तुम्ही. या कला साहित्य क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षापासून योगदान केल्याचे पुरावे जोडावे. तसेच शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे शपथपत्र नोटरी केलेले असावे लागते.

वृध्द कलाकार मानधन योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अशा पद्धतीने तुम्ही वृध्द कलाकार मानधन योजना साठी अर्ज करू शकतात.