नारी शक्ती पुरस्कार ऑनलाईन अर्ज सुरु | Nari Shakti Puraskar Online Application Start

केंद्र शासनाचे महिला व बालविकास मंत्रालय असते.आणि हे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय नेहमी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. हे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय नेहमी आपल्या भारत देशातील महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर जाण्यासाठी मदत करत असते. आणि या केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयामार्फत ज्या महिला अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असतात अशा महिलांना नारी शक्ति पुरस्कार हा देण्यात येत असतो. हा नारी शक्ती पुरस्कार हा, नगरपालिका, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादीसाठी नारी/स्त्री शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. Nari Shakti Puraskar, Nari Shakti Puraskar 2021

नारी शक्ती पुरस्कार ऑनलाईन अर्ज सुरु | Nari Shakti Puraskar Online Application Start

 

वर्ष 2021 मध्ये ज्या महिलांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे अशा महिलांना नारी शक्ति पुरस्कार 2021 साठी ऑनलाइन पद्धतीने नामांकन अर्ज करावयाचे आहे. आणि हे अर्ज पाठवण्यासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालया मार्फत अर्ज पाठवण्याचे सांगण्यात आलेले आहे.

हे नक्की वाचा:- महिलांसाठी महा समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना संपूर्ण माहिती

 

ज्या महिला सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असतात अशा महिलांना या पुरस्कारासाठी अर्ज हा करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज किंवा नारीशक्ती पुरस्कारासाठी नामांकन हे 31 जानेवारी 2022 पर्यंत करता येणार आहे.

 

 

हा देण्यात येणारा नारी शक्ती पुरस्कार 2021 मिळवण्यासाठी वैयक्तिक तसेच संस्था यांना अर्ज करता येणार आहे. महिला व बाल विकास मंत्रालया अंतर्गत देण्यात येणाऱ्या नारीशक्ती पुरस्कारांची संख्या 15 इतकी असू शकते. परंतु या देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या संख्येमध्ये वाढ करण्याचे अधिकार हे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एक निवड समिती नेमण्यात आलेली होती. त्या समितीच्या द्वारे हे पुरस्कार वाढ करण्यात येऊ शकते.

हे नक्की वाचा:- महिलांसाठी खास काय आहे लक्ष्मी मुक्ती योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

 

नारी शक्ती पुरस्काराचे स्वरूप कसे आहेत:-

ज्या महिलांची या नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असते अशा महिलांना रुपये दोन लाख आणि प्रमाणपत्र हे देण्यात येत असते. ज्या महिला महिला सक्षमीकरण यासाठी कार्य करत असतात. तसेच उपेक्षित महिलांना मदत करत असतात अशा महिला महिला व बाल विकास मंत्रालया मार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ति पुरस्कार साठी पात्र असतात.

 

 

नारी शक्ती पुरस्कार २०२१ तारीख :-

महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या महिलांना हा नारीशक्ती पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षीचा म्हणजेच वर्ष 2021 चा नारी शक्ति पुरस्कार हा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त 8 मार्च 2022 रोजी प्रदान करण्यात येणार आहे. नारी शक्ती पुरस्कार-2021, या नारी शक्ती पुरस्कार विषयी आणखीन माहिती मिळविण्याकरिता महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.Nari Shakti Puraskar, Nari Shakti Puraskar 2021

 

 

हे सुध्दा वाचा:- विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र कसा करायचा अर्ज, कागदपत्रे संपूर्ण माहिती

 

नारीशक्ती पुरस्कारासाठी अर्ज कसा करायचा:-

महिला व बालविकास मंत्रालय मार्फत देण्यात येणाऱ्या नारीशक्ती पुरस्कार साठी नामांकन अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने http://www.awards.gov.in/ या वेबसाईट वर करता येणार आहे.

 

शासनाने दिलेल्या सूचनेनुसार नारी शक्ति पुरस्कार साठी अर्ज हा आवश्यक कागदपत्रे जोडून आँनलाईन पद्धतीने केंद्र सरकारच्या www.awards.gov.in या वेबसाईट वर फक्त ऑनलाईन पद्धतीने च करावयाचे आहे.

 

 

नारी शक्ती पुरस्कार साठी पात्रता:-

ज्या महिला महिला व बालविकास मंत्रालय मार्फत देण्यात येणाऱ्या नारीशक्ती पुरस्कार साठी अर्ज करणार आहे,  या पुरस्कारासाठी लाभार्थ्यांचे वय 1 जून 2021 रोजी 25 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे लागते.

जर संस्थेमार्फत अर्ज केला असेल तर नारी शक्ती पुरस्कार मिळिण्याकरिता संस्थेस महिलासंबंधी कामकाजाचा किमान 5 वर्षाचा अनुभव असावा लागतो. तसेच

अर्जदारास यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार हा प्राप्त झालेला नसावा.

हे नक्की वाचा:- विधवा महिला तसेच अनाथ मुलांसाठी नवीन योजना सुरू

 

नारी शक्ती पुरस्कार 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख:-

नारी शक्ती पुरस्कार 2021 साठी नामांकन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2022 आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच संस्थांनी आपले अर्ज  www.awards.gov.in  या वेबसाईट वर 31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावयाचे आहे.