आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपले सरकार वर नागरिक लॉगिन करून तुम्ही विविध सेवा मिळविण्यासाठी लांब रांगा टाळून,आपल्या स्वतःच्या सोयीनुसार ‘आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि विविध प्रकारचे ऑनलाईन कामे घरबसल्या स्वतः करू शकता व त्यासाठी तुम्हाला आपले सरकार पोर्टल वर नागरिक नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही विविध प्रकारचे ऑनलाईन कामे घरबसल्या स्वतः करू शकता.  या मध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखला,वय अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व,जातीचे प्रमाणपत्र या प्रकारचे सर्व कामे ऑनलाईन करू शकता त्याच बरोबर आणखीन ही बरीच कामे तुम्ही या आपले सरकार च्या नागरिक लॉगिन करून स्वतः करू शकता या साठी तुम्हाला कोणत्याही सेतू केंद्र मध्ये जाण्याची गरज नाही.

 

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आजच्या या लेखा मध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? या विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत.

 

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी apale sarkar seva kendra,csc center,csc id
 आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी

 

 

 

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती:

 

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया:

आपले सरकार पोर्टलवर नवीन नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करावी.

 

आता तुमच्या समोर आपले सरकार महाराष्ट्र ची वेबसाईट ओपन होईल, त्याच आपले सरकार च्या वेबसाईट मध्ये उजव्या बाजूला तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, त्यामध्ये मराठी भाषेचा पर्याय तुम्ही निवडून घ्या. आता आपल्या समोर वेबसाईट ही मराठी भाषेमध्ये ओपन होईल.

 

आता तुम्हाला पुढील लिंक वर क्लिक करून  “नवीन वापरकर्ता? येथे नोंदणी करा” (“New User? Register Here). हा पर्याय दिसेल त्या  पर्यायावर क्लिक करायचे आहे.

 

 

Aaple sarkar login आपले सरकार सेवा केंद्र लॉगिन

 

 

 

 

आता तुम्हाला खालील दोन पर्याय दिसतील त्यामध्ये आपण या ठिकाणी पहिला पर्याय निवडणार आहोत. ज्या मध्ये आपण otp च्या माध्यमातून आपण नोंदणी करणार आहोत.

 

त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा.

 

स्वत:ची संपूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करा व आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी द्वारे पडताळणी करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवून घेऊ शकता.नंतर तुम्हाला अर्ज करताना जास्त कागदपत्रे अपलोड करायची गरज पडत नाही.

 

 

तुमचा मोबाईल नंबर आणि युजरनेम पडताळणी:

 

आता इथे तुमचा जिल्हा निवडून मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक OPT येईल तो One Time Password (OTP) बॉक्स मध्ये टाईप करा आणि Username पर्यायामध्ये युजरनेम टाका, नंतर पुढे Password सेट करण्यासाठी तिथे Password टाका.

 

 

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी, Apale Sarkar Seva kendra

 

 

 

 

 

वरील सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्या तुमच्या रजिस्टर मोबाईल वर username येईल, तो username आणि तुम्ही सेट केलेला password टाईप करून आपले सरकार पोर्टल मध्ये लॉगिन करून घ्या.

 

लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन झाल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला पाहिजे त्या सेवेचा पर्याय निवडून अर्ज करू शकता व विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवा उपलब्ध करून घेऊ शकता.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपले सरकार सेवा पोर्टल साठी नागरिक लॉगिन करून तुम्ही विविध सेवा ऑनलाइन मिळवू शकता. या सर्व बाबी तुम्ही ऑनलाईन घरबसल्या करू शकता.

 

 

अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा.

 

 

आणखी वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र(सेतू केंद्र)असे मिळवा

आणखी वाचा:- ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे असा करा अर्ज

Leave a Comment