ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे?Gram panchayat Computer operator

ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे?Gram panchayat Computer operator मित्रांनो तुम्ही तुमच्या गावा मध्ये ग्रामपंचायत ऑपरेटर बनून ६००० रुपये इतके मानधन मिळवू शकता.ग्राम पंचायत मध्ये ऑनलाइन कामे करण्यासाठी ग्राम पंचायत ऑपरेटर असतो.ग्रामपंचायत ऑपरेटर ला ग्रामपंचायत मध्ये computer वर काम करायचे असते.मित्रांनो महाराष्ट्रात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये सरकारने ग्रामपंचायतीची असलेली सर्व कामे ही ऑनलाइन करण्यासाठी व शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये सहज रित्या मिळाव्या या साठी व या उद्देशाने Computer Operator (संगणक परिचालक)यालाच आपण ग्राम पंचायत ऑपरेटर असे सुद्धा म्हणतो यांची नियुक्ती केलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून नियुक्त करून यांना आता ७००० मानधन दिले जाणार आहे. यात त्यांना ग्रामपंचायतीची जी माहिती असते ती विविध सॉफ्टवेअर व वेबसाइट वर भरावी लागते.असे ऑनलाइन कार्य करायचे असते. ग्राम पंचायत ऑपरेटर. ग्रापंचायतींना ऑपरेटर असणे गरजेचे असते. कारण ग्राम पंचायत ऑपरेटर हा ग्राम पंचायत मधील सर्व ऑनलाईन ची कामे करीत असतो. ग्राम पंचायत ऑपरेटर हा ग्राम पंचायत मधील कर्मचारी असतो. तो ग्राम पंचायत आणि ग्राम सेवक यांच्या हाताखाली राहून ग्राम पंचायत ची सर्व ऑनलाईन कामे पाहत असतो. या लेखामध्ये आपण ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे? ग्राम पंचायत ऑपरेटर या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

How to Apply online for Gram panchayat Operater Online Maharashtra computer operator online application

 

 

ग्राम पंचायत ऑपरेटर चे कामाचे स्वरूप काय असते?

ग्रामपंचायत ऑपरेटर ला ग्रामपंचायत च्या मार्गदर्शनाखाली खालील कामे करावी लागतात.

ग्रामपंचायतींतर्गत चालणाऱ्या सर्व योजनांसाठी डाटा एन्ट्री काम. हे ग्राम पंचायत ऑपरेटर ला करायचे असते.

 

संगणकाशी संबंधित असलेले विविध डेटा भरणे व त्यानंतर कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवक व जी.पी. यांना सहाय्य करणे.

 

ग्रामपंचायत साठी लागणारी पत्रे टाईप करणे.

 

ग्रामपंचायत मधील सर्व रेकॉर्ड अद्ययावत(update)ठेवणे

 

ई-पीआरआय मधील सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग व डेटा प्रविष्ट करणे.

 

ई-पीआरआय प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या ग्रामसेवकाच्या निर्देशानुसार विविध कामे

 

आणखीन दुसरी ही ग्राम पंचायत च्या लेव्हल ची कामे असू शकतात.

 

 ग्राम पंचायत ऑपरेटर बनण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

ग्रामपंचायत ऑपरेटर बनण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करावे लागतात.
आधार कार्ड(आवश्यक)
 रेशन कार्ड
 पॅन कार्ड

पदवी प्रमाणपत्र(आवश्यक)

ड्रायव्हिंग लायसन्स

मतदार ओळखपत्र

पदव्युत्तर प्रमाणपत्र

बायोडाटा(Resume)(आवश्यक)

MSCIT प्रमाणपत्र(आवश्यक)

वरील कागदपत्रे तुम्हाला ऑनलाइन अपलोड करावे लागतात.वरील सर्व कागदपत्रांच्या पीडीएफ बनवून ठेवा तुम्हाला वरील सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहे.Gram panchayat vle,ग्राम पंचायत ऑपरेटर

 

 

ग्राम पंचायत ऑपरेटर संगणक परिचालक नोंदणी:How to apply for Gram Panchayat Operator Online

 

ग्रामपंचायत मध्ये कम्प्युटर ऑपरेटर संगणक परिचालक नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://mh.gov2egov.com/NewTheme/login.aspx

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक वेबसाईट ओपन होईल आणि नवीन डॅश बोर्ड  ओपन होईल त्यामधे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे जर तुम्ही आधीच केले असेल तर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. जर रजिस्ट्रेशन करायचे असेल तर रजिस्टर पर्याय वर क्लिक करा

संगणक परिचालक नोंदणी(computer operator; registration) करण्यासाठी तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर टाकून रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर sms द्वारे usrename आणि Password पाठवण्यात येईल. Gram panchayat operater,Gram panchayat computer operator

 

Gp operator Gram panchayat Operater

 

 

त्यानंतर लॉगिन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.जो एसएमएस वर username आणि password आला होता तो टाकून तसेच captcha टाकून लॉगिन करून घ्या.

Login gram panchayat Operaterग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे?Gram panchayat Computer operator

 

 

लॉगिन केल्यानंतर सर्व माहिती भरायची आहे, त्यामध्ये सर्व प्रथम General Details या पर्याया मध्ये तुमची सर्व details टाकून सेव्ह करा.

 

Csc gram panchayat Operater

 

General details सेव्ह केल्यानंतर Education details मध्ये तुमची सर्व शैक्षणिक माहिती भरा व सेव्ह करा.

 

Apply for computer operator Gram panchayat online

 

 

Education details सेव्ह केल्या नंतर Adress या पर्यायावर क्लिक करून तुमचा सर्व adress टाकून सेव्ह करा.

 

How to apply for Gram panchayat Operater Online Maharashtra

 

वरील तिन्ही बाबी सेव्ह केल्या नंतर तुम्हाला career या पर्यायावर क्लिक करून apply for Vacancy या पर्यायावर क्लिक करायचे आहे.जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये vacancy असेल तर च तुम्ही apply करू शकता.

Apply for computer operator online gram panchayat

 

त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी apply करायचे आहे त्या ठिकाणचे state, district,taluka,Gram Panchayat निवडून घ्यायचे आहे.

 

जर तुमच्या ग्राम पंचायत ला vacancy asel तर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये vacancy असल्यास तुम्हाला तेथे apply करण्यासाठी खालील ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Gram panchayat Operater computer operator online

 

क्लिक केल्यावर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे pdf मध्ये अपलोड करावी लागेल  ज्या कागदपत्रांसमोर लाल कलरचा स्टार मार्क असेल ती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावीच लागते.आणि यामध्ये तुम्हाला आधार कार्ड,पदवी प्रमाणपत्र,mscit प्रमाणपत्र,resume(बायोडाटा) इत्यादी कागदपत्रे ही तुम्हाला कम्पल्सरी अपलोड करावीच लागेल.बाकीचे कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता.जेवढी जास्त कागदपत्रे अपलोड करता येईल तेवढे अपलोड करा.अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या सबमिट होऊन जाईल ज्या .त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचे चे स्टेटस चेक करायचे असेल तर तुम्हाला करिअर ऑप्शन मध्ये Applications Status या पर्यायावर क्लिक करून तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दिसेल.

 

अशा प्रकारे तुम्ही ग्राम पंचायत ऑपरेटर साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.वरील सर्व ऑनलाईन ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवक यांच्याशी भेटायचे आहे आणि त्यांना तुम्ही अर्ज केल्याची संपूर्ण माहिती सांगायची आहे आणि त्यांना तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड देऊन समोरील प्रोसिजर पूर्ण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते तुमची ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून निवड करतील.तुम्हाला ग्रामपंचायत मधील रूम मध्ये कम्प्युटर ऑपरेटर या पदाची जबाबदारी देतील. ग्राम पंचायत ऑपरेटर

 

मित्रांनो आपल्या गावात कम्प्युटर ऑपरेटर gram panchayat computer operator च्या जागा असतात, जर तुमच्या गावातील कम्प्युटर ऑपरेटर चे पद खाली असेल तरच तुम्हाला कंप्यूटर ऑपरेटर करिता अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर तुमची निवड झाल्यास, शासनातर्फे तुम्हाला मानधन देण्यात येते. ग्रामपंचायत मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर बनवून आपण गावातल्या गावात ग्रामपंचायत संबंधित कामे करून शासनाचे मानधन मिळवू शकतो. ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर चे काम अतिशय सोपे आणि कमी असते. त्यामुळे जर तुमच्या गावामध्ये vacancy असेल तर तुम्ही अर्ज करायला पाहिजे.

 

ग्राम पंचायत ऑपरेटर म्हणून निवड झाल्यानंतर ची प्रोसेस

तुमची तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्राम पंचायत ऑपरेटर म्हणून निवड झाल्यास तुमचे CSC Registration करून देण्यात येते. नंतर तुम्हाला ग्राम पंचायत मधील विविध कामे करण्यासाठी CSC ID तयार करून देण्यात येतो. त्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर महाराष्ट्र शासनाचा Mahaonline id देण्यात येतो. त्याच प्रमाणे महा ऑनलाइन वर्व जर तुम्ही कामे जास्त करत असाल म्हणजेच transaction जास्त असल्यास पात्र व्यक्तींना आधार सुविधा केंद्र आयडी वितरित करण्यात येतो. त्यामुळे आपण गावातील ग्राहकांना आधार कार्ड संबंधित सुविधा पुरवून अधिकचे पैसे कमवू शकतो. ग्रामपंचायत संगणक परिचालक gram panchayat computer operator, gram panchayat operater

 

ग्रामपंचायत संगणक परिचालक (Gram Panchayat Operater) चे वेतन कोण करते?

ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक(Gram Panchayat Operater) चे वेतन हे CSC Spv ही कंपनी करते.

 

ग्रामपंचायत संगणक परिचालक हे पद पर्मनंट आहे की तात्पुरते ?

सध्या तरी हे ग्राम पंचायत परिचालक पद खाजगी आहे. भविष्यात शासकीय मान्यता मिळाल्यास ते पर्मनंट होऊ शकते. पण याची शास्वती नाही.

ग्राम पंचायत ऑपरेटर बरोबरच ग्राम पंचायत मध्ये अनेक प्रकारची पदे आहेत. त्याकरिता सुद्धा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतो. Gram Panchayat Operater हे सुद्धा ग्राम पंचायत मधील एक महत्वाचे पद आहे.

 

मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा.

 

 हे सुध्दा वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र असे मिळवा

हे सुध्दा वाचा:- तुमच्या गावांमध्ये पंचायत समितीचे योजनांचा लाभ कोणी कोणी घेतला पहा ऑनलाईन संपूर्ण माहिती

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.