ऑनलाईन शाॅपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी

ऑनलाईन शाॅपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी आपला भारत देश हा समृद्ध देश असून या भारत देशात विविध जातीचे, विविध पंताचे लोकं राहतात, अनेक संस्कृती चे लोकं इथे राहतात. ‘भारत सणांचा देश आहे.’ आपल्या देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात कोणता ना कोणता सण व उत्सव साजरा केला जात असतो, मग तो धार्मिक असो वा राष्ट्रीय.असे अनेक प्रकारचे सन आपल्या देशात साजरे केले जातात. अश्या अनेक प्रकारच्या सणांचा फायदा हा online  shopping साइट्स पण मोठ्या प्रमाणात  आणि अनेक प्रकारचे ‘फेस्टिवल सेल’ आयोजित करतात.

 

ई-काॅमर्स साइट Amazon आणि Flipkart पण ‘रिपब्लिक सेल’ ची सुरवात केली आहे कि ज्या सेल मध्ये अनेक प्रकारच्या आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे भारतात अनेक प्रकारच्या ऑनलाईन शॉपिंग साईट ह्या वास्तवात आहे.  भारत देशातील अनेक प्रकारची लोकं  च्या माध्यमातूून  नवीन Product (वस्तू) विकत घेण्याची तयारी जोमाने करत असतात. अनेक लोकं या ऑनलाइन शॉपिंग वरील सेल ची वर्षभर वाट पाहत असतात. परंतु जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला काही महत्वूर्ण अशा गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, नाही तर तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक पण होऊ शकते. खालील महत्वपूर्ण गोष्टी चा अवलंब जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही ऑनलाइन शॉपिंग पासून होणाऱ्या fraud पासून स्वतःचा बचाव करू शकाल.

Flipkart Amazonऑनलाईन शाॅपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी, ऑनलाइन शॉपिंग पासून होणाऱ्या धोक्यापासून सावध रहावे online shopping sites
ऑनलाईन शाॅपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी

 

 

 

 

ऑफर काय आहे ते समजून घ्या

मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग वरून होणाऱ्या धोक्या पासून वाचण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जेव्हा ऑनलाइन शॉपिंग करता तेव्हा जर एकाधी ऑफर चालू असेल आणि तुम्ही त्या ऑफर मधुन वस्तू खरेदी करत असाल तर ती ऑफर पूर्णपणे समजून घ्या.

 

जेव्हा तुम्ही शाॅपिंग साइटचे Home पेज ओपन करताच तुमच्या समोर येतो 90 टक्के पर्यंतचा डिस्काउंट किंवा 20000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक. अश्या प्रकारच्या ओळी वाचून लोक अत्यंत उत्साहित होतात आणि शक्य तितक्या लवकर ते सामान खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी इथे ‘UP To’(पर्यंत)  या अक्षरावर(शब्दावर) वर लक्ष न देणे मोठे हे तुमच्यासाठी फार नुकसानदायक ठरू शकते. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा इतर काही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म वरून अशाप्रकारची शाॅपिंग करताना कोणताही प्रकारचे product हे ‘कार्ट’ मध्ये टाकण्याच्या आधी त्यावर जी ऑफर मिळत आहे ती नीट समजून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या बॅंक कार्ड, वाॅलेट व यूपीआई पेमेंट वर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे तसेच डिस्काउंट मिळतात, त्यामुळे खरेदी करण्याच्या आधी या सर्व ऑफर्स नीट तपासून घ्या व मगच पुढे जा.

 

अटी व शर्ती ओळखा

 

मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जी ऑफर असतात त्या प्रत्येक ऑफर ला काही अटी व शर्ती(term and condition) ह्या असतात तर तुम्हाला त्या सर्व अटी व शर्ती नीट पने वाचून घ्यायच्या आहे.

 

ऑनलाईन शॉपिंग साईट वर मोठा डिस्काउंट किंवा कॅशबॅक बघून लोक शाॅपिंग सुरु तर करतात

 

परंतु त्या बेनिफिटसाठी आवश्यक ‘Terms & Conditions’ कडे ते दुर्लक्ष करतात, ज्याचे मोठ्या प्रमाणात होणारे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. उदाहरणार्थ; फोन पे यूपीआय मधून पेमेंट केले तर 30 टक्के कॅशबॅक मिळत असेल आणि त्याची एक कंडिशन अशी असेल कि, यूपीआय आयडी ही मॅन्युअली submit करायची नाही. त्याचप्रमाणे जी एक्सचेंज ऑफर असते त्या एक्सचेंज ऑफर मध्ये कुठलाही जुना फोन 9000 रुपयांमध्ये जात असेल पण त्याची कंडिशन

असेल कि त्या मोबाईल क्या बाॅडी वर डेंट नसावा, आणि जर असे असले तर 9000 रुपये हे मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या अटी व शर्ती ह्या ऑनलाईन शाॅपिंग मध्ये प्रकाशित केल्या जातात ज्या शाॅपिंगच्या आधी बारकाईने वाचणे आणि समजणे आवश्यक आहे. असे नाही केल्यास तुम्ही त्या ऑफर पासून किंवा cash back पासून वंचित राहणार आहे.

Online shopping sites ऑनलाईन शाॅपिंग करत असाल तर फसवणुकीपासून वाचवतील या 5 गोष्टी फ्लिपकार्ट अमेझॉन ऑनलाईन शॉपिंग

 

 

ऑनलाईन शॉपिंग साईट वरील सूट आणि डिस्काउंट किती योग्य, किती चुकीची

 

मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग साईट वर अनेक प्रकारच्या सूट तसेच डिस्काउंट हे मिळत परंतु हे मिळत असताना तुम्हाला काही गोष्टींचा विचार करूनच ऑनलाईन शॉपिंग करायची असते.

 

ऑनलाईन शॉपिंग साईट वर ऑनलाईन सेल मध्ये सर्वात जास्त कोणती गोष्ट आकर्षित करत असेल तर ती गोष्ट असते डिस्काउंट तसेच कॅश बॅक ऑफर अमेझॉन असो वा फ्लिपकार्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन शॉपिंग साईट असो या शाॅपिंग साइट्स वर कोणताही प्रोडक्ट जुन्या किंमतीत दाखवला जातो आणि त्यानंतर त्या सोबत प्रोडक्ट वर मिळणारी सूट आणि नंतर डिस्काउंट नंतरची किंमत ही दाखवली जात असते. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची वास्तविक किंमत 30000 सांगण्यात आली आहे आणि त्यावर 10000 रुपयांची सूट दिल्यानंतर सेल प्राइस 20000 सांगण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी जी लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती म्हणजे खरोखरच त्या वस्तूची किंमत 30000 रुपयेच आहे का. अश्यावेळी लोकांचे लक्ष फक्त 10000 रुपयांची डिस्काउंट वर जाते आणि त्या प्रोडक्टची जी खरी मूळ ओरिजनल किंमत चेकच केली जात नाही. कदाचित त्या वस्तूची खरी किंमत 25000 रुपये असावी 30000 रुपये नसेल. त्यामुळे इतर website व मार्केट प्लॅटफॉर्म वर जाऊन त्या वस्तूची जी खरी किंमत आहे ती तपासून पाहणे आवश्यक आहे.

 

 

वस्तू विकणारा सेलर कोण आहे हे पहा

 

 

मित्रांनो तुम्हीही अशा ऑनलाईन शॉपिंग साईट वरून एकाध प्रोडक्ट खरेदी करत असाल तर त्या वस्तू विकणारा सेलर कोण आहे याकडे सुध्दा लक्ष देणे आवश्यक आहे.

 

चला तर आता आपण थेट मोबाईल फोन विकत घेण्याचे उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईट वरून Redmi किंवा Apple कंपनी चा एखादा नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल.तर तुम्ही त्या फोनची मिळत असलेली नवीन ऑफर आणि तुम्हाला त्या ऑफर मधुन मिळत असलेला मोठा डिस्काउंट वाचता, पण यावर लक्ष देत नाही कि तो फोन नेमक कोण विकत आहे. ऑनलाईन शाॅपिंग सेल मध्ये Apple चा फोन आहे Apple विकत नाही आणि Redmi असेल तर Redmi च विकत नाही. ह्या वस्तू सेलर विकत असतात. व अमेझॉन तसेच फ्लिपकार्ट सारख्या शाॅपिंग साइट्स वर स्वतः कंपनी आपले स्वतःचे सामान विकत नाही तर वस्तू विकणारे ‘Seller’ हे वेगळे असतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग साईट वरून फक्त मोबाईल फोनच नाही तर इतर कोणतेही product विकत घेण्याआधी सेलर कोण आहे ते पाहून घ्या तसेच त्या सेलर ने विकलेल्या वस्तुवरचा review तसेच feedback हे नक्की पहा व त्या वस्तूचे ratings पाहा व नंतर खात्री झाल्यानंतरच वस्तू विकत घ्या.

 

 

 सुरक्षित पेमेंट करा

 

मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग साईट वरून वस्तू खरेदी केल्यानंतर सुरक्षित रित्या पेमेंट केले पाहिजे.

मित्रांनो तुम्ही खरेदी केलेली वस्तू ही 1000 रुपयांचे असो वा 100000 चे. ऑनलाईन शाॅपिंग करताना याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कि तुमच्याद्वारे केलेले पेमेंट पूर्णपणे सिक्योर असेल. बॅंक ची कार्ड्स, तुमचा upi id आणि wallet इत्यादी पूर्णपणे सुरक्षित ठेवा आणि तुमची बँकेची पर्सनल माहिती कुणालाही शेअर करू नका. जर तुम्ही cash on delivery (cod) अंतगर्त product विकत घेतले असेल तर डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला पण पेमेंट करताना आपले बॅंकिंग चे डिटेल देऊ नका. जर तुम्हाला कोणतीही पेमेंट रिक्वेस्ट आली असेल तर ती पेमेंट रिक्वेस्ट घाई घाईत स्वीकारू नका एकदा payment ची अमाउंट पण चेक करा. व नंतर खात्री करूनच पेमेंट करा.

 

मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा 

हे सुध्दा वाचा:- पॅन कार्ड आधार कार्ड सोबत असे लिंक करा