तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन

तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन मित्रांनो आजचे युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये सर्व गोष्टी या ऑनलाईन उपलब्ध आहे.सर्वच गोष्टी आपण ऑनलाईन करू शकतो. आजकाल सर्वच बाबी ऑनलाईन झालेल्या आहे अशाच एका महत्वपूर्ण विषयावर आपण माहिती पाहत आहो. मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण आपल्या गावातील तहसील मार्फत जमिनीचे तसेच इतर ही जे व्यवहार तलाठी यांच्या मार्फत होत असते हे सर्व व्यवहार तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.

 

तलाठ्याचे जमिनीचे सर्व फेरफार आणि तुमच्या गावातील जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन कसे पाहायचे या विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत.एकंदरीतच गावामध्ये घडलेले जमिनीचे सर्व व्यवहार तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. तुमच्या गावामध्ये कोण कोणाच्या जमिनीची खरेदी-विक्री करतो, त्याचप्रमाणे कधी खरेदी करतो, तसेच तुमच्या गावामधे कोणी जमिन मोजणीसाठी नोटीस पाठवली आहे, तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीने फेरफार नमुन्यात वारस नोंदी केली आहे, त्याचप्रमाणे तुमच्या गावामध्ये कोणाच्या शेतजमिनीवर बोजा लावला गेला अशा फेरफार नोंदीची आणि त्याच्या बदलांची सविस्तर माहिती आता आपण या लेखाच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन पाहत आहोत.(jaminiche vyavahar online)

 

आपली चावडी तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन ,apali chavdi

तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन

 

 

आपल्या गावामध्ये फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 हा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जातो कारण प्रत्येक व्यक्ती च्या जमीन अधिकार अभिलेखा मध्ये जे बदल होत असतात त्याची नोंद या फेरफारा मध्ये ठेवण्यात येत असते.त्या मुळे तुमच्या गावात जमिनीचे कोणते फेरफार झाले हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक असते.या सााठी आपली चावडी हे आपल्याला मदत करते.

तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन ऑनलाईन व्यवहार फेरफार apali chavdi

 

 

आता तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन:(apali chawdi)

तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार ऑनलाईन पाहण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

 

आपल्या जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे सर्व व्यवहार ऑनलाईन पाहण्याठी सर्वात पहिल्यांदा “आपली चावडी” ही ओपन करा. किंवा गूगल वर जाऊन आपली चावडी टाकून सर्च करा तुम्हाला खालील लिंक मिळेल त्या लिंक वर क्लिक करा व ती वेबसाईट ओपन करा. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi हि वेबसाईट ओपन करायची आहे.

 

आता वरील वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण इथे आपल्या गावातील सर्व फेरफार नोंदी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.

 

 

 

सर्व प्रथम या ठिकाणी जिल्हा निवडा हा पर्याय आहे. आता त्या खाली दिसत असलेल्या जिल्हा या रकान्यासमोर तुम्हाला आपला जिल्हा निवडायचा आहे, तालुका या रकान्यासमोर क्लिक करून तुम्हाला तालुका निवडायचा आहे, तर गावाच्या समोर क्लिक करून रकाण्या समोर गावाचं नाव निवडायचं आहे.

 

वरील संपूर्ण माहिती भरल्या नंतर आता तुम्हाला “आपली चावडी पहा” हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर आता आपल्यासमोर आपल्या गावातील संपूर्ण फेरफाराच्या नोंदी open होतील.

 

Apali chavdi ferfar तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार पहा आता ऑनलाईन
गावातली संपूर्ण फेरफार

 

 

असे मिळवा आपले सरकार सेवा केंद्र (सेतू केंद्र) ऑनलाईन 

 

आपली चावडी हा एक महत्वपूर्ण असा उपक्रम असून या आपली चावडी च्या अंतर्गत नागरिकांना खालील 3 प्रकारच्या डिजिटल सुविधा नागरिकांना ऑनलाईन पाहता येत असतात.

 

फेरफाराची नोटीस:

फेरफाराची स्थिती:

मोजणीची नोटीस

 

1) फेरफाराची नोटीस:-

मित्रांनो फेरफराची नोटीस मध्ये जे जमिनीचे व्यवहार झाले आहेत त्या व्यवहाराची माहिती ही आपली चावडी वर प्रकाशित करण्यात येत असते त्या मध्ये फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर तुमच्या गावा मध्ये जो फेरफार झाला आहे म्हणजेच जो बदल झाला आहे उदाहरणार्थ; फेरफाराचा प्रकार म्हणजे शेतमजिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, वारस नोंद केली आहे काय, जमीन खरेदी केली आहे काय, या प्रमाणे जे जमिनीचे विविध प्रकारे जे व्यवहार नोंदवलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा दिनांक ज्या दिवशी फेरफार करण्यात आला त्या दिवसाचा फेरफार चा दिनांक,आणि जर तुम्हाला या फेरफार मध्ये जर काही आक्षेप असेल तर हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांकशी हा संबंधित जमिनीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे त्या जमिनीचा सर्वे किंवा गट नंबर यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते जर कुणाला गावामधे जो जमिनीच्या व्यवहार झाला म्हणजेच फेरफार झाला याच्यावर काही आक्षेप असेल तर फेरफार ज्या दिवशी नोंदविला जातो त्या दिवसापासून १५ दिवसा पर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता.

2) फेरफाराची स्थिती:

तुमच्या गावात जर काही फेरफार झाला असेल तर त्या फेरफाराची नोंद झाल्या नंतर तुम्हाला त्या फेरफाराची स्थिती ही पाहता येते आणि या मध्ये कुणी आक्षेप घेतला का हे सुध्दा समजते त्या मध्ये हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील हा दिलेला असतो.जर कुणाला आक्षेप असेल तर त्या वर आक्षेप घेण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला जातो. या कालावधी मध्ये जर कुणी आक्षेप घेतला नसेल तर फेरफारावरील नोंद ही प्रमाणित करण्यात येते आणि मग ती संबंधीत सातबाऱ्यावर यशस्वी पने नोंदवली जाते.

 

3) मोजणीची नोटीस:

मित्रांनो जमिनीचे व्यवहार हे होत असताना बऱ्याच वेळा जमीन ही शासकीय अधिकारी यांच्या मार्फत मोजण्याची गरज पडते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जमीन मोजायची असते अशा शेतकरी जमीन मोजण्या साठी अर्ज करून जमीन ही शासकीय पद्धतीने मोजू शकतात त्यानंतर ही जमीन मोजणी ची नोटीस या आपली चावडी वर ऑनलाईन लावण्यात येते आणि तुम्ही तुमच्या गावा मध्ये कुणी जमीन ही शासकीय मोजणी साठी अर्ज केला हे पाहु शकता. त्यानंतर जमीन मोजणी नोटीस लावण्यात येत असते. मोजणीची नोटीस ह्या पर्यायामध्ये तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये जमीन मोजणीचा प्रकार, मोजणीचा Registration क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो. ह्या सर्व बाबी त्या जमीन मोजणी नोटीस मध्ये पाहायला मिळतात.यानंतर शेतजमिनीचे लागून असलेले खातेदार आणि सहधारक यांची माहिती ही या ठिकाण नमूद केलेली असते.

 

मित्रांनो तुम्ही ही अशा पद्धतीने तुमच्या गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार व जमिन मोजणीचे व्यवहार हे अशा पद्धतीने ऑनलाईन पाहू शकता.

 

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

हे सुध्दा वाचा:- ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे