‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’

 ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’ मित्रांनो महाराष्ट्र राज्यांमधे महाराष्ट्र शासनातर्फे ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत यावर्षी येणाऱ्या जागतिक महिला दिनापासून म्हणजेच ८ मार्च रोजी होणाऱ्या जागतिक महीला दिनांकापासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे, या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजने अंतर्गत महिलांना सक्षम बनविण्यात येणार आहे त्याच प्रमाणे महीला वर होणारे अत्याचार कमी करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

 

एकंदरीतच महिलांना सक्षम बनविण्यात येणार आहेत,आणि ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’ या अंतर्गत महिलांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहेे.

maha Samruddhi Mahila sakshmikaran ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’ Maharashtra Yojna
 ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’

 

 

 

 

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना:(mahasamruddhi Mahila Sakshmikaran Yojana)

 

मित्रांनो महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना च्या माध्यमातून खालील बाबी करण्यात येणार आहे.

 

१)महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यात येणार आहे आणि  महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत दोघांचे, घर दोघांचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.या नुसार सातबाऱ्यावर पत्नीचे नाव येणार आहे.(महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान)

 

२)प्रदर्शने,यांमध्ये तसेच कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचतगटांना उत्पादन विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.(महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान)

महा डी बी टी योजना लॉटरी लागली

३)महिलांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण सुध्दा देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती इत्यादी साठी जनजागृती करण्यात येणार आहे.

 

४)समाजामध्ये महिलांवर होत असलेला कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्यांबाबत मार्गदर्शन

या अभियान काळात शासनाच्या विविध योजना असतात त्या सर्व शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्याचा महिलांना लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.

 

 

५)या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजनेमध्ये प्रामुख्याने जे  महिला बचत गट असतात अशा महीला बचतगटांना प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्यामुळे महीला सक्षम होऊ शकेल,त्याचप्रमाणे महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यात येणार आहे व त्यासाठी म्हणजेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी शेत दोघांचे (7/12 वर पती व पत्नीचे नाव लावणे) आणि घर दोघांचे (नमुना नंबर 8 वर पती व पत्नीचे नाव लावणे) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे आणि या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे दोघांचे सुध्दा नाव लावणे, त्याचप्रमाणे महिलांचे हिमोग्लोबिन व BMI तपासणी करुन महिलांना पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, महिलांमधील  असलेली तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीर मुक्ती आदीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, महिलांचे जे उपजीविकेचे स्त्रोत असतात ते उपजीविकेचे स्त्रोत सुध्दा वाढविण्यात येणार आहे त्यामुळे महीला ह्या आत्मनिर्भर बनतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, महिलांना सर्वच दृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य व विकासाचे प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम हे या योजने अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहेत, असेह ग्रामविकास  मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

 

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान

 

Maha samrudhhi mahila sakshmikaran yojana महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ हे म्हणाले की, ग्राम स्तरावर वेगवेगळ्या विकासाच्या शासकीय योजना या राबविण्यात येत असतात आणि या गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या अनेक प्रकारच्या योजनांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग हा वाढविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येईल. शासनाच्या असलेल्या सर्व संबंधित  विभागांचा यात सहभाग घेतला जाईल. या राबविण्यात येत असलेल्या अभियानात विविध उपक्रम राबविण्यात येतील.त्यामध्ये बचतगट, ग्रामसंघ आणि प्रभागसंघ यांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम अश्या संस्था निर्माण करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविण्यासाठी महिलांना निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत करण्यात येणार आहे, व महिला बचत गटामार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या विवध प्रकारच्या वस्तू असतील अशा वस्तूचे  मार्केटिंग सुध्दा करण्यात येणार आहे आणि करण्यासाठी आकर्षक ब्रँडींग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल. यासाठी प्रशिक्षणे व अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाईल. त्याच प्रमाणे शासनाचे असलेले विविध प्रकारचे विभाग, कार्यालये, संस्था, पंचायतराज संस्था यांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी ही महिला मार्फत चालविण्यात येणाऱ्या बचतगटांकडून होण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असून यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जे कार्यालये शासकीय आहेत अशी कार्यालये आणि आवारामधील उपहारगृहे ही आता महीला मार्फत चालविण्यात येणाऱ्या महीला बचतगटांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे,महीला मार्फत चालविण्यात येणाऱ्या महीला बचतगटांना उद्योग आधार व अन्न परवाना मिळवून देण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. महीला मार्फत चालविण्यात येणाऱ्या महीला बचतगटांना उपजिविकेचे स्त्रोत आवश्यक आहेत अशे स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरु करण्यात येतील, महिलां साठी गवंडी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे, विविध प्रकारच्या स्वास्थ्य आणि विमा ह्या योजनांमध्ये महिलांचे रजिस्ट्रेशन करणे यासाठी सुध्दा आवश्यक ते कार्यक्रम घेतले जाणार आहेत, महिलां वरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्यांबाबत मार्गदर्शन करणे व कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.जे महीला घरकुल लाभार्थी असतील अश्या महिला लाभार्थ्यांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करुन बांधकाम सुरु करण्यात येणार आहे आणि अस्मिता योजनेंतर्गत महिलांना सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येणार आहे.या सर्व बाबीं सोबतच नुकतीच महाराष्ट्रामध्ये ग्राम पंचायत ची निवडणूक झाली होती आणि त्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ज्या महिला  निवडून आलेल्या आहेत अशा ग्रामपंचायत मधील महिला सदस्यांना पंचायतराजविषयक विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येणार आहे. असे अनेक प्रकारचे विविध उपक्रम या ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजना’ अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्राचे मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.तसेच महिलांचा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव/सत्कार सुध्दा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येणार आहे.

 

 

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान(Maha samrudhhi mahila sakshmikaran abhiyan) या अभियान संदर्भातील एक मह्त्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला असून आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग जो संसर्ग वाढत आहे तो वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवून तसेच शासनाना द्वारे देण्यात येणाऱ्या विविध शासकीय निर्देशांचे पालन करीत, काळजी घेत हे एक महत्वपूर्ण शासकीय अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. अशा सूचना शासनातर्फे सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या आहेत. येत्या 8 मार्च 2021 रोजी राज्यस्तरावर या अभियानाचा श्रीगणेशा करण्यात येईल व त्याचवेळी महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरही महिला मेळावे, प्रदर्शने आदींचे आयोजन करण्यात येणार असून या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

 

या महत्वपूर्ण अशा महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन  होण्याच्या दृष्टीने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्या आलेल्या आहेत आणि या महत्वपूर्ण अशा अभियानात उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे जिल्हे, तालुके अशा विविध घटकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव(सत्कार) करण्यात येणार आहे.मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यात शासनातर्फे महासमृद्धी महीला सक्षमीकरण योजना राबविण्यास येणार आहे. अशा या अभियाना विषयी आणखीन काही अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या वेबसाईट च्या माध्यमातून कळविण्यात येईल.

 

मित्रांनो अशा करतो की, तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा 

 

हे सुध्दा वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू 

हे सुध्दा वाचा:- प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल ची नवीन यादी पहा ऑनलाईन