प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण- घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहण्याची संपुर्ण प्रोसेस

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण- घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहण्याची संपुर्ण प्रोसेस ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी घर असणे म्हणजे एक फार महत्वपूर्ण गोष्ट मानल्या जाते. त्यामुळे गरिबांना प्रधानमंत्री आवास योजना ही वरदानच ठरली आहे.जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारने  साल 2021-22 मधील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.आपण  घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहेत. जसे जसे लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तशी तशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
(pm Awas labharthi yadi) Gharkul yadi 2022
 

आजच्या या लेखा मध्ये आपण ही यादी कशी पाहायची त्याची संपूर्ण पद्धत, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण काय आहे. याचीच माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहण्याची संपुर्ण प्रोसेस - प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण महाराष्ट्र
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण- घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहण्याची संपुर्ण प्रोसेस

 

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण माहिती

2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण ही भारत सरकार ने सुरू केली होती केंद्रीय मोदी सरकार च्या मार्फत राबविण्यात येणारी ही महत्वपूर्ण योजना आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत देशातल्या सगळ्या गरजू लोकांना 2 कोटी 95 लाख घरं उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.आणि तो उद्देश समोर ठेवून ही योजना राबवण्यात येत आहे.

पीएम आवास योजना नवीन अपडेट:- प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपल्या देशातील गरीब बांधवांना तसेच ज्यांच्याकडे पक्के घर नाही अशा बांधवांना स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान 2022 पर्यंत देण्यात येणार होते. परंतु आता या योजनेमध्ये बदल करण्यात  आलेला असून सदर पीएम आवास घरकुल योजना ही आता वर्ष 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

या योजने च्या माध्यमातुन(pm awas yojana) 25 स्क्वेअर मीटरचं घर बांधता येतं. तसेच भारत सरकार घर  बांधण्यासाठी महाराष्ट्रासारख्या मैदानी राज्यात 1 लाख 20 हजार रुपये दिले जातात, तर हिमाचल प्रदेशात पर्वतीय राज्यांमध्ये 1 लाख 30 हजार रुपये इतकी  मदत दिली जात असते. ही मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.बँक खाते हे आधार कार्ड शी संलग्न पाहिजे.वरील दिल्या जाणाऱ्याया अनुदान रकमेमध्ये काही कालांतराने बदल होऊ शकतो.

ही  योजना अंमलात आणण्यासाठी तसेच राबवण्यासाठी मैदानी राज्यांसाठी 60 टक्के निधी हा केंद्र शासन तर 40 इतका टक्के निधी राज्य सरकार देत असते, तर पूर्वेकडील राज्यात 90 टक्के निधी हा केंद्र सरकार देतं असते तर 10 टक्के निधी राज्य सरकार देत असते.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहण्याची संपुर्ण प्रोसेस – प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण महाराष्ट्र :-

How to view beneficiaries list of Gharkul scheme? Pradhan Mantri Awas Yojana-Rural

Pm awas Yojana  या योजने मध्ये जे लाभार्थी पात्र ठरत असतात अशा पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत असते. ही यादी कशी पाहायची याची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या ची लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला खालील  दिलेली Pradhan Mantri Awaas Yojana ची official वेबसाईट ओपन करायची आहे.

https://pmayg.nic.in/netiay/home.aspx.

आता तुमच्या समोर प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण ची वेबसाईट ओपन होईल.

  • १)आता तुम्हाला वरच्या बाजूला दिसत असलेल्या Awaassoft या पर्यायावर जाऊन त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे Report त्या Report  पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • २)त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. इथं वेगवेगळे रिपोर्ट दिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यातील सगळ्यात शेवटच्या Social Audit Reports मध्ये असणाऱ्या Beneficiary Details for Verification यावर पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • ३)त्यानंतर तुम्हाला MIS Report नावाचं एक नवीन पेज ओपन झाले असेल. यापेजवर Selection Filters या पर्यायाखालील एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
  • ४)त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचे  राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे सर्व झालं की मग तुम्हाला ज्या  वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे.
  • ५)आता आपल्याला 2021-22 या वर्षातील लाभार्थ्यांची असलेली संपूर्ण यादी पाहायची आहे त्यामुळे आता आपण 2021-22 हे वर्ष निवडलेल आहे.
  • ६)त्यानंतर तुम्हाला ज्या  कोणत्या ही  योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल  ती योजना तुम्हाला  निवडायची आहे.
  • ७)इथे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, All central schemes, All states schemes, राजीव गांधी आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना, अशा अनेक योजना दिलेल्या असतील  या योजनांपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे.
  • ८)आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या योजनेतील लाभार्थी यादी पाहायची असल्याने आपण ती योजना निवडायची आहे.
  • ९)तसेच त्या नंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.

शेवटी तुम्हाला Submit   हा  पर्याय दिसत असेल  त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण लाभार्थ्यांची यादी(pm awas Yojana benificery list) Open होईल.

Pradhan mantri घरकुल योजना लाभार्थी यादी
Pradhan mantri घरकुल योजना लाभार्थी यादी

 

या प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील घरकुल यादी पाहु शकतात, त्यामध्ये तुमच्या गावामधे कोणाला घर मिळाले व कोणत्या योजने अंतर्गत मिळाले हे सुद्धा पाहता येते.

Pm awas yojna नवीन घरकुल यादी 2022-23 जाहीर झालेली आहे. ती आपल्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत प्रपत्र ड च्या याद्या तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये लागलेल्या आहेत.  गावातील ज्या व्यक्तींचे प्रपत्र ड मध्ये नाव असेल अशा व्यक्तींना घरकुल मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन घरकुल योजना यादी 2022 पाहू शकता.gharkul yadi 2022