संजय गांधी निराधार योजना मित्रांनो आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्र राज्यात असे अनेक लोक आहेत जे निराधार आहेत त्यांना कोणाचाच आधार नाही त्यांना आपुलकीची माणसे नाहीत.त्यांना आडोसा देणारे कोणतेही लोकं नाहीत अशा लोकांना आधाराची नितांत गरज असते. अशा गरजू लोकांसाठी शासनाच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्ती वृद्ध व्यक्ती. अंध व्यक्ती, अपंग व्यक्ती, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला त्याच प्रमाणे घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) 1980 पासून राबविण्यात येत आहे.
आणि या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अशाच गरीब व गरजू लोकांना शासनातर्फे एक मदत ही पुरविली जाते.त्यांना दरमहा ठराविक रक्कम देण्यात येत असते.
संजय गांधी निराधार योजना |
संजय गांधी निराधार अनुदान योजना:
संजय गांधी निराधार योजनेचा प्रकार: ही योजना राज्य पुरस्कृत योजना
संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश:
राज्यातील जे निराधार व्यक्ती आहे अशा निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन किंवा पगार.
ही संजय गांधी निराधार योजना समाजातील ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव: सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी अटी:
मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत त्या खाली दिलेल्या आहेत.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ ज्या व्यक्तीला घ्यायचा आहे त्यांना लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती खालील गोष्टीत मोडणारी पाहिजे. निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी, परित्यक्त्या असणे गरजेचे आहे.
तसेच ती व्यक्ती जी व्यक्ती लाभ घेणार आहे ती व्यक्ती किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
तसेच लाभ जी व्यक्ती घेत आहे त्या व्यक्तीचे वय- ६५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न जास्तीत जास्त प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंतच पाहिजे
सदर संजय गांधी निराधार या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे.
अशा व्यक्तीच या योजनेसाठी पात्र असू शकतात.
संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
या योजनेसाठी खालील कागदपत्रे लागतात
रहिवासी दाखला
वयाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला-दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा पाहिजे.
अपंगत्व दाखला सर्जन/ सरकारी हॉस्पिटलच्या रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला पाहिजे.
Sanjay Gandhi Niradhar Scheme
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाचे स्वरूप:
संजय गांधी निराधार योजना मध्ये जे लाभार्थी पात्र असतात अशा योजनेच्या लाभार्त्यांस दरमहा रुपये 600/- इतके अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत असते.
तसेच जर एकाच कुटुंबा मध्ये जर एकापेक्षा अधिक लाभार्थी असेल तर त्या कुटुंबाला रुपये 900/- प्रतिमाह अनुदान शासनातर्फे देण्यात येत असते.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा मिळवता येईल त्यासाठी संपर्क साधन्याचे ठिकाण:-
अर्जदार ज्या भागात राहत असेल त्या भागातील जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये.
तहसलिदार संजय गांधी योजना,तहसील कार्यालय मध्ये तालुक्याच्या ठिकाणी.
तलाठी कार्यालय,तलाठी ऑफीस तालुका ठिकाण
अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ :- https://sjsa.maharashtra.gov.in/mr
अर्ज कसा करायचा:-
वरील संजय गांधी निराधार योजना चा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालय मध्ये भेटायचे आहे.व तेथे ऑफलाईन पद्धतीने अर्जाला सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज जमा करायचा आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र असाल तर लाभ देण्यात येईल.
अर्जाचा नमूना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
हे सुध्दा वाचा:- पवार ग्राम समृद्धी योजना असा करा अर्ज
टीप: मित्रांनो वरील संजय गांधी निराधार योजनेच्या नियमात काही बाबींमध्ये बदल असू शकतात. ही माहिती आपण शासनाच्या वेबसाईट वरून प्राप्त केली आहे.तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.तसेच वेळेनुसार या योजने मध्ये बदल सुध्दा होऊ शकतात.
मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल आवडल्यास नक्की शेअर करा
हे सुध्दा वाचा:- ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे