राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, प्रत्येक महिन्याचे रेशन त्याच महिन्यामध्ये न घेतल्यास पुढील महिन्यामध्ये रेशन मिळणार नाही, अन्न व नागरी पुरवठा विभागा अंतर्गत ज्या महिन्यातील धान्य त्याच महिन्यांमध्ये घेण्याची शक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पूर्वी मात्र रेशन कार्ड धारकांना महिन्यातील धान्य त्याच महिन्यात न घेतल्यास पुढील महिन्याच्या सात दिवसापर्यंत धान्य घेता येत होते परंतु आता होणारा काळाबाजार टाळण्यास मदत होईल.
शिधापत्रिका धारक नागरिकांना शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य हे अगदी वेळेवर घेऊन यावे लागणार आहे मात्र पूर्वी नागरिक वेळेचे बंधन न राखता मोठ्या कालावधी पर्यंत त्यांना धान्य स्वस्त धान्य दुकानातून घेता येत होते, त्यामुळे वेळेचे भान त्यांना राहत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदाराकडून अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात होता, व अशा प्रकारचा काळाबाजार टाळता यावा यामुळे जर ज्या महिन्यातील धान्य त्याच महिन्यामध्ये देण्यात आले तर नागरिकांना एक प्रकारची सवय सुद्धा वेळेवर धान्य घेण्याची लागेल.
ज्या महिन्यातील धान्य त्याच महिन्यांमध्ये देण्यात यावे अशा प्रकारच्या निर्णयाची कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्यात यावी या कारणाने सप्टेंबर महिन्यामध्ये अंमलबजावणी चालू झालेली आहे, व यासंबंधीचे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे, त्यामुळे शिधापत्रिका धारक नागरिकांना प्रत्येक महिन्याची धान्य त्याच महिन्यांमध्ये घ्यावे लागेल व स्वस्त धान्य दुकानदाराकडून जी काळाबाजार होत होती ती सुद्धा आता टाळता येणे शक्य होईल.
बायकोच्या नावावर घर घेतल्यास 2 लाख रुपये सुट, ही आहे योजना, संपूर्ण माहिती वाचा