राज्यामध्ये जून महिन्यामध्ये पावसाचे उशिरा आगमन झाले तसेच त्यामुळे शेतकऱ्यांच्या उशिरा पेरण्या झाल्या परंतु जुलै महिन्यात आणि भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणता एक महिन्याचा पावसाचा खंड पडलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः कोळपून गेलेली होती.
शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक विमा मिळावा या उद्देशाने राज्यातील 24 जिल्ह्यांना पिक विमा व 11 जिल्ह्यांना नुकसान भरपाई रक्कम देण्यात येणार आहे. पिकविण्यासाठी 24 जिल्ह्यातील महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे.
राज्य शासन अंतर्गत एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात आलेली आहे,व त्या अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे, व हाच राज्य शासनाचा हिस्सा विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे.
राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांचा समावेश अग्रीम पीक विमा मध्ये करण्यात आलेला आहे त्यामध्ये नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, बीड, लातूर, अमरावती, धाराशिव, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, नागपूर, अकोला, तसेच चंद्रपूर या 24 जिल्ह्यांचा समावेश आहे.
अकरा जिल्ह्याचा समावेश नुकसान भरपाई मध्ये करण्यात आलेला आहे त्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते व त्यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यात अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर अशा अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 71 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वाटप केले जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी रक्कम जमा केली जाऊ शकते मध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम ही 12 ते 13 ऑक्टोबर पासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाटप केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जर हे रक्कम वितरित केली गेली तर दिवाळी सना निमित्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो.